Land Scam
Land ScamPudhari

Lonavala Land Fraud Case: कुरवंडे येथील ५३ एकर जमिनीवर बनावट कागदपत्रांचा प्रकार; ९ जणांवर गुन्हा

१९९८ च्या स्टॅम्पवर खोटे खरेदीखत तयार केल्याचा आरोप; लोणावळा शहर पोलिसांकडून तपास सुरू
Published on

लोणावळा: कुरवंडे (ता. मावळ, जि. पुणे) येथील एका जागेचे बनावट कागदपत्रांच्या आधारे हक्क दाखवण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत वारसदाराने लोणावळा शहर पोलिस ठाण्यात समक्ष हजर राहून फिर्याद दिली असून, 9 जणांवर फसवणूक व बनावट दस्त तयार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Land Scam
Purandar Airport Project: पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाला गती; भूसंपादनासाठी ₹6 हजार कोटींच्या कर्जास मंजुरी

याप्रकरणी हर्ष प्रवीणचंद्र परमार (वय 42, रा. मुंबइ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, एकनाथ शंकर जांभुळकर, शैलेश सुरेश ओव्हाळ, शंकर भागुजी ओव्हाळ, अनिकेत ओव्हाळ, बुवा ऊर्फ गुलाब जाधव, ऋषिकेश ओव्हाळ (रा. कुरवंडे), गौतम देवराम सपकाळ (रा. खंडाळा), नासीर आरकाटी (रा. लोणावळा) तसेच शेखर पटेल (पूर्ण पत्ता अज्ञात) यांच्याविरुद्ध लोणावळा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Land Scam
PMRDA River Improvement Project: इंद्रायणी-पवना नदी सुधार प्रकल्पासाठी लवकरच निविदा; 27 गावांसाठी ₹976 कोटींचा एसटीपी उपक्रम

फिर्यादीत म्हटले आहे, की फिर्यादी यांचे वडील प्रवीणचंद्र वीरजीभाई परमार यांचे 18 डिसेंबर 2024 रोजी निधन झाले. त्यांच्या नावे कुरवंडे येथील गट क्रमांक 111, 112, 120, 122, 259, 264 ते 272 असे एकूण 53 एकर क्षेत्रफळाची जमीन होती. सदर मालमत्तेचे वारस म्हणून फिर्यादी व त्याच्या दोन बहिणी श्वेता प्रवीणचंद्र परमार व सुरुची प्रविणचंद्र परमार हे तिघे आहेत. फिर्यादीने लोणावळा पोलिस ठाण्यामध्ये दिलेल्या माहितीनुसार, कुरवंडे येथील एकनाथ शंकर जांभुळकर हे त्यांच्या वडिलांच्या मैत्रीच्या संबंधातून परिचित होता. वडिलांच्या निधनानंतर त्यांनी संबंधित जमिनीवर हक्क दाखवून बनावट नोटरी दस्त तयार करून सरकारी कार्यालयात वापरल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

Land Scam
Pimpri Chinchwad Property Tax Collection: मालमत्ताकर जप्ती मोहिम सुरू

1998 सालच्या शिक्क्यावर खोटे खरेदीखत?

फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, एप्रिल 2025 मध्ये हॉटेल कैलास पर्वत, लोणावळा तसेच इतर ठिकाणी काही व्यक्तींनी कट रचला. उल्हासनगर येथून 1998 सालचा 100 रुपयांचा कोरा स्टॅम्प पेपर 55 हजार रुपयांना खरेदी करण्यात आला. त्या स्टॅम्पवर किल्ला कोर्ट, मुंबई येथील टायपरायटरवर गट नंबर 267 संदर्भात खोटे खरेदीखत टंकलिखित करण्यात आल्याचा आरोप आहे. यानंतर कुरवंडे येथील एका घरात एकत्र येऊन बनावट खरेदीखतावर फिर्यादीच्या दिवंगत वडिलांची खोटी सही करण्यात आली. तसेच, खरेदी घेणाऱ्या कोंडाबाई भागुजी ओव्हाळ यांचा अंगठा बनावटरीत्या उमटविण्यात आल्याचा दावा आहे. साक्षीदार म्हणून मृत व्यक्तींचेही बनावट अंगठे व सह्या करण्यात आल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे.

Land Scam
Pimpri Chinchwad Census 2026: पिंपरी-चिंचवडची लोकसंख्या किती ?

शासनाची दिशाभूल करून शुल्क भरल्याचा आरोप

सदर बनावट दस्त नोंदणीसाठी सह. जिल्हा निबंधक वर्ग-1, पुणे कार्यालयात चलन क्रमांक जीआरएन एमएच 008328886202526 इ द्वारे 49 हजार 500 रुपये मुद्रांक शुल्क भरल्याचे ऑनलाइन पडताळणीत फिर्यादीला आढळून आले. त्यानंतर संबंधित दस्त दुय्यम निबंधक कार्यालय, लोणावळा व तळेगाव येथे नोंदणीसाठी सादर करण्यात आला. मात्र, अद्याप तो नोंदणीकृत झालेला नसल्याची माहिती आहे. फिर्यादीत म्हटले आहे, की ज्या खरेदीखताचा उल्लेख करण्यात आला आहे, त्यातील खरेदी घेणारी व साक्षीदार दोन्ही व्यक्ती मृत असून त्यांच्या नावाने अंगठे व सह्या बनावट केल्याचा गंभीर आरोप आहे. या प्रकरणाचा तपास लोणावळा शहर पोलिस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news