Divyang ST Scheme: बनावट दिव्यांग ओळखपत्रांच्या आधारे सवलतीचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांना ST चा दणका; FIR दाखल होणार

गेल्या कालावधीत एस.टी महामंडळाची सवलत मिळविण्यासाठी काहीनी बनावट किंवा दुसऱ्यांच्या नावावरील यूडीआयडी कार्ड वापरल्याचा प्रकार समोर आला आहे
ST Bus
ST Bus Pudhari
Published on
Updated on

पिंपरी : राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसगाडयांमध्ये महिलांना ५० टक्के तर विविध गटांसाठी सवलती दिलेल्या आहेत. एसटी प्रवासात काहीजण दिव्यांग ओळखपत्रांच्या आधारे सवलतीचा गैरफायदा घेतात. अशा पध्दतीच्या बोगसगिरीला आळा घालण्यासाठी एसटी प्रशासने कडक निर्णय घेतले आहे. इथून पुढे प्रत्येक दिव्यांग प्रवाशांच्या यूडीआयडी कार्डची ऑनलाइन तपासणी केली जाणार आहे. प्रवाशांकडून जर बनावट किंवा गैरप्रकार आढळल्यास संबंधित प्रवाशांवर गुन्हा दाखल करण्यात येईल, त्यामुळे बनावट दिव्यांग ओळखपत्रांचा आधार घेताय तर सावधान प्रशासनाकडून कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

ST Bus
Karjat ST Bus Car Accident: कर्जत-चौक मार्गावर एसटी बस-कारची भीषण धडक; बांधकाम व्यावसायिक गंभीर जखमी

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाडयामध्ये विविध गटाकरिता सवलती दिलेल्या आहेत. महिलांना ५० टक्के सूट, विद्यार्ध्यांसाठी ६६.६६ पर्यंत आणि जेष्ठ नागरिक , दिव्यांग, पुरस्कार विजेते तसेच आजाराने पिंडीत असलेल्या रुग्णांना ५० टक्के सवलत मिळत. त्यासह विविध मासिक पास ( जसे की विद्यार्थी आणि नोकरदार ) फिरस्ती पास यासारख्या योजना व विविध योजना परवडणाऱ्या असल्यामुळे एसटीकडे प्रवाशांचा ओढा वाढतो.

ST Bus
Rajmata Jijau ST bus news | एसटीच्या ताफ्यात लवकरच 'राजमाता जिजाऊ' बस होणार दाखल

मात्र गेल्या कालावधीत एस.टी महामंडळाची सवलत मिळविण्यासाठी काहीनी बनावट किंवा दुसऱ्यांच्या नावावरील यूडीआयडी कार्ड वापरल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे खऱ्या आणि गरजूवंताचा हक्क डावलला जात आहे. त्यामुळे एसटी प्रशासनाचे देखील आर्थिक नुकसान होत आहे. तसेच दिव्यांग बनावट ओळख पत्रे वापरणे हा कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे अशा पध्दतीने फसवणूक करणाऱ्यांवर गुन्हा दाखल होणार आहे.

ST Bus
ST bus stop issue : प्रवासी शेडच्या परिसरात गुरांचा वावर

ॲपदवारे विशेष तपासणी

धावत्या बसमध्ये तपासणी दरम्यान संशयास्पद ओळखपत्र आढळल्यास ते जागीच जप्त करण्यात येणार आहे. तसेच एसटी महामंडळाच्या सर्व वाहक, पर्यवेक्षक आणि तपासणी पथकांकडून ॲपदवारे तपासणी केली जाणार आहे. कर्मचाऱ्यांकडून यूडीआयडी कार्डच्या क्रमांक किंवा क्यूआरकोड स्कॅन केल्यास संबंधीत प्रवाशांची संपुर्ण माहिती तात्काळ कळणार आहे. तपासणी दरम्यान फोटो आणि माहिती नाही जुळली तर बनावट असल्याचे स्पष्ट होताच जागीच जप्त केले जाणार आहे. जप्त केल्यानतंर या कार्डांची स्वतंत्र नोंद ठेवण्यात येणार आहे. या व्यक्तीला भविष्यात कोणत्याही प्रकारच्या शासकीय सवलतीचा लाभ घेता येणार नाही.

ST Bus
Ratnagiri ST bus : बसेसवरील नावाचे फलक झाले धुसर!

फसवणूक करणाऱ्यांवर गुन्हा दाखल

बनावट व दिव्यांग ओळखपत्रे वापरणे हा कायद्याने गुन्हा आहे. असे असताना, अनेकजण याकडे दुर्लक्ष करतात. मात्र अशा पध्दतीने सुरु असणारी बनावटगिरी थांबविण्यासाठी ही मोहिम राबविली जाणार आहे. या दरम्यान वैध किंवा आधिकृत यूडीआयडी कार्ड असणाऱ्या प्रवाशांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही.

ST Bus
ST Bus New Rules : बसेस उशिरा सोडल्यास होणार कारवाई

एसटी महामंडळाच्या बसगाडयांमध्ये दिव्यांगांना तिकीट दरात ७५ ते १०० टक्यांपर्यंत सवलत दिली जाते. त्यामुळे प्रवाशांचा एसटीकडे ओढा वाढतो. मात्र वाढलेल्या गर्दीमधून तिकीट दरात सवलत मिळविण्यासाठी दिव्यांग आणि बनावट ओळखपत्र वापरतात. मात्र हा कायद्याने गुन्हा आहे. असे असताना काही प्रवाशांकडून असे प्रकार घडत असल्यामुळे तपासणी दरम्यान कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे.

पल्लवी पाटील, आगारप्रमुख वल्लभनगर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news