Karjat ST Bus Car Accident: कर्जत-चौक मार्गावर एसटी बस-कारची भीषण धडक; बांधकाम व्यावसायिक गंभीर जखमी

ओव्हरटेकच्या प्रयत्नात अपघाताची शक्यता; 27 प्रवाशांसह बसचा समोरील भाग चक्काचूर, चालक स्वतः पोलिसांत हजर
Karjat ST Bus Car Accident
Karjat ST Bus Car AccidentPudhari
Published on
Updated on

खोपोली : कर्जत-चौक मार्गावर बुधवारी (11 फेब्रुवारी) दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास एसटी बस आणि कारमध्ये समोरासमोर भीषण धडक झाली. यामध्ये कारचालक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. अपघातानंतर बसचालक घटनास्थळावरून निघून गेला.

Karjat ST Bus Car Accident
BJP Mayor of Mumbai: भाजपचा मुंबई महापौर पहिला की दुसरा ?

पनवेलहून कर्जतकडे येणाऱ्या एसटी बसमध्ये तब्बल 27 प्रवासी होते. त्याचवेळी नेरळ येथील बांधकाम व्यावसायिक रिंकू सिंग हे आपल्या मित्रासह खासगी कारने कर्जतकडे निघाले होते. भिसेगाव खिंड परिसर ओलांडल्यानंतर चौक पोलीस ठाणे हद्दीत वळणावर बसचालकाने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जात असून त्याचवेळी समोरून येणाऱ्या कारला जोरदार धडक बसली.

Karjat ST Bus Car Accident
Women Mayors of Mumbai: 138 वर्षांचा इतिहास; मुंबईला लाभल्या केवळ 8 महिला महापौर; भाजपच्या रितू तावडे ठरल्या अष्टकातील आठव्या महिला महापौर

धडकेनंतर कारचा समोरील भाग तर बसचा देखील दर्शनी भाग चक्काचूर झाला आणि चालक रिंकू सिंग कारमध्ये अडकून गंभीर जखमी झाले. त्यांचा साथीदारही जखमी झाला. बसमधील एका महिला प्रवाशाच्या हनुवटीला किरकोळ दुखापत झाली. अपघातानंतर काही काळ रस्त्यावर वाहतूक कोंडी निर्माण झाली व नागरिकांची मोठी गर्दी झाली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना तातडीने कर्जत-भिवपुरी येथील रायगड रुग्णालयात हलविण्यात आले असून रिंकू सिंग यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

Karjat ST Bus Car Accident
Worli SRA stay: वरळीतील संक्रमण शिबिराच्या बांधकामाला उच्च न्यायालयाची तात्काळ स्थगिती

दरम्यान, बस चालक अपघातानंतर पळाल्याची चर्चा रंगली असतानाच कर्जत डेपो अधिकारी अशोक पालवे यांनी स्पष्टीकरण देत संबंधित चालक संजय भिकाजी भोकरे हा फरार नसून खालापूर चौक पोलीस ठाण्यात स्वतः हजर झाल्याचे सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news