Lonavala Tourist Crowd: लोणावळा–खंडाळ्यात पर्यटकांची प्रचंड गर्दी; महामार्गावर वाहतूककोंडी

थंड हवामानामुळे पर्यटकांचा ओढा वाढला; राजमाची, लायन्स पॉईंटसह विविध ठिकाणी गर्दीचे चित्र
Lonavala Tourist Crowd
Lonavala Tourist CrowdPudhari
Published on
Updated on

लोणावळा: लोणावळ्यात पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे. पर्यटकांच्या या गर्दीमुळे मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर दुतर्फा मोठी वाहतूककोंडी झाली आहे. सकाळपासूनच लोणावळा शहरात वाहनांची गर्दी वाढण्यास सुरुवात झाली. दिवसभर ही गर्दी कायम होती.

Lonavala Tourist Crowd
Government Vehicle Fuel Waste: पिंपरी-चिंचवडमध्ये इंधन बचतीकडे दुर्लक्ष; शासकीय वाहनं पार्किंगमध्ये सुरूच

मिसिंग लिंकमुळे खंडाळा घाटातील वाहतूककोंडी सुटली आहे. त्यामुळे लोणावळा, खंडाळा शहरात येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली आहे. घाटातील कोंडी कमी झाल्यामुळे कोकण परिसरात जाणारे पर्यटक आता थंड हवेच्या ठिकाणांना पसंती देऊ लागले आहेत.

Lonavala Tourist Crowd
Share Market Scam: किवळे शेअर मार्केट घोटाळा; 1.22 कोटींची फसवणूक करून आरोपी फरार

मुंबईपासून जवळचे पर्यटनस्थळ व थंड हवेचे ठिकाण म्हणून लोणावळा, खंडाळा या शहरांना पर्यटक पसंती देत आहेत. राज्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात उष्णता वाढली आहे. या जीवघेण्या गर्मीपासून थोडासा दिलासा मिळावा, याकरिता पर्यटक आपल्या कुटुंबासह थंड हवेच्या ठिकाणी येत आहेत.

Lonavala Tourist Crowd
Kute Memorial Hospital: आकुर्डीतील कुटे मेमोरियल रुग्णालयात सुविधांचा अभाव; रुग्ण त्रस्त

लोणावळा शहरातदेखील यावर्षी गरमीचे प्रमाण अधिक आहे. दुपारच्या वेळेस कडक ऊन असले तरी सकाळ व संध्याकाळ लोणावळ्यातील वातावरण थंड व अल्हाददायी असल्यामुळे पर्यटक लोणावळ्याकडे आकर्षित होत आहेत.

Lonavala Tourist Crowd
Ravet Firing Case: रावेत गोळीबारानंतर शहरात गँगस्टर नेटवर्कच्या सावटाची चर्चा

या पॉइंटवर होतेय गर्दी

खंडाळ्यातील राजमाची पॉइंट, ड्युक्स नोज पॉइंट, खंडाळा बोटिंग या ठिकाणी पर्यटक सकाळ, संध्याकाळ मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. लायन्स पॉईंट, आई एकवीरा देवी मंदिर, तुंगार्ली तलाव, भाजे लेणी, पवना धरण परिसर या भागात पर्यटक मोठ्या संख्येने जात आहेत. तेथील निसर्ग व थंड हवेचा आनंद घेत आहेत. पर्यटकांच्या वाढत्या गर्दीमुळे अंतर्गत लहान रस्ते व मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर वाहतूककोंडी होत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news