Share Market Scam: किवळे शेअर मार्केट घोटाळा; 1.22 कोटींची फसवणूक करून आरोपी फरार

दरमहा 5% परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक; देहूरोड पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू
Share Market Fraud
Share Market FraudPudhari
Published on
Updated on

पिंपरी: शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास दरमहा पाच टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवत गुंतवणूकदारांची एक कोटी 22 लाख 75 हजार 900 रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार 3 एप्रिल 2024 ते 15 मे 2026 या कालावधीत एनबीएम ट्रेडर्स, किवळे येथे घडला.

Share Market Fraud
Kute Memorial Hospital: आकुर्डीतील कुटे मेमोरियल रुग्णालयात सुविधांचा अभाव; रुग्ण त्रस्त

या प्रकरणी नितीन भास्कर माने (रा. मंगलविश्व सोसायटी, किवळे) याच्याविरुद्ध देहूरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सध्या फरार असून, रावेत येथील एका पुरुषाने फिर्याद दिली आहे.

Share Market Fraud
Ravet Firing Case: रावेत गोळीबारानंतर शहरात गँगस्टर नेटवर्कच्या सावटाची चर्चा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी नितीन माने याने फिर्यादीसह अनेक गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन केला होता. शेअर मार्केटमधून मोठा नफा मिळवून देण्याचे आश्वासन देत त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात पैसे घेतले होते.

Share Market Fraud
Pimpri Lawrence Bishnoi Gang Firing: पिंपरी-चिंचवडमध्ये फर्निचर मॉलवर गोळीबार; लॉरेन्स बिष्णोई गँगच्या नावाने धमकी

फिर्यादीकडून 15 लाख रुपये घेतल्यानंतर त्यापैकी केवळ 9 लाख रुपये परत करण्यात आले. उर्वरित 5 लाख 91 हजार रुपये तसेच इतर 11 गुंतवणूकदारांचे 1 कोटी 16 लाख 84 हजार रुपये आरोपीने परत केले नाहीत.

Share Market Fraud
Pimpri Crime: पिंपरीत गांजा जप्त; बावधनमध्ये कामगारांना लाकडी बांबूने बेदम मारहाण

पैशांची मागणी सुरू होताच आरोपीने मोबाइल बंद करून संपर्क तोडला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर गुंतवणूकदारांनी पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक वाघमारे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news