Lonavala Bungalow Assault Case: लोणावळ्यात बंगल्यात घुसून महिलांना मारहाण; २८ जणांवर गुन्हा, माजी नगरसेवकाला दमदाटी

रायवुडमधील ‘लाल चिमणी’ बंगल्यात धुडगूस; साहित्याची फेकाफेक, पाण्याची मोटर व झाडांचे नुकसान, महिला बाउन्सरांचाही समावेश
Dispute
DisputePudhari
Published on
Updated on

लोणावळा: शहरातील रायवुड परिसरातील एका बंगल्यात बेकायदेशीरपणे घुसून महिलांना मारहाण करणे, घरातील साहित्यांची फेकाफेक करून मालमत्तेचे नुकसान करणे आणि मध्यस्थीसाठी आलेल्या माजी नगरसेवकाला दमदाटी करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी लोणावळा शहर पोलिस ठाण्यात तब्बल 28 व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये काही महिला बाउन्सर यांचादेखील समावेश आहे.

Dispute
Pimpri Chinchwad Potholes: पिंपरी-चिंचवडमधील खड्ड्यांवर उपमुख्यमंत्री शिंदेंचे तातडीचे आदेश; उर्वरित खड्डे युद्धपातळीवर बुजवा

लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सोमवारी (दि. १७) सकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. कुरवंडे ते जुना खंडाळा जाणाऱ्या रस्त्याच्या कोपऱ्यावर असलेल्या रायवुड येथील 'लाल चिमणी' बंगल्यातील माळी रूमसमोर हा प्रकार घडला. याबाबत मनीषा मनोहर देशमुख (वय ५२, रा. लाल चिमणी बंगला, रायवुड, लोणावळा) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

Dispute
Pimpri Stolen Bike Racket: ‘ऑक्शनच्या’ नावाखाली चोरीच्या महागड्या बाईकची विक्री; २२ दुचाकी जप्त, २२ गुन्हे उघडकीस

तक्रारदार मनीषा देशमुख आणि त्यांची जाऊ राजश्री राजू देशमुख या माळी रूममध्ये असताना आरोपी राजू नागनाथ विरकर, साईनाथ सुनील धोत्रे, आम्रपाली राम सूर्यवंशी, भाग्यश्री श्रीमंत कसबे, आयोध्या सुभाष कांबळे, हमा किसन गोसावी, सोनाली विजय तुपसुंदर, पल्लवी प्रसाद सोहणे, कामेश्वरी माधवन आरमुगम, पंकज साहेबराव शिंदे, सनी अरुण भसे, अनिता विकी भडकवाड, मंदाकिनी शिवाजी पवार, कल्पना प्रमोद सोनकांबळे, वर्षा राजेंद्र लोखंडे (सर्व रा. पुणे) आणि इतर १० ते १२ अनोळखी इसमांनी बेकायदेशीर टोळके जमवून घरात घुसखोरी केली. या सर्वांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी मनीषा देशमुख व त्यांच्या जावेला हाताने जबर मारहाण केली. तसेच, रूममधील भांडी बाहेर फेकून दिली. बंगल्याच्या अंगणातील पाण्याच्या टाकीचे पाईप, पाण्याची मोटर, केळीची झाडे व इतर झाडे तोडून मोठे नुकसान केले.

Dispute
Pimpri Chinchwad Nag Panchami: पिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमीचा उत्साह; महिलांनी फुगड्या, झिम्मा, फेर धरत साजरा केला सण

नगरसेवकाला दमदाटी

घटना घडत असताना मारहाणीचा आवाज ऐकून मदतीसाठी धावून आलेले स्थानिक नगरसेवक धनंजय वसंत काळोखे (रा. ठोंबरेवाडी, लोणावळा) यांनाही आरोपींनी आरेरावीची भाषा वापरून दमदाटी केली व त्यांचा अपमान केला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर नगर परिषदेचे नगराध्यक्ष व दहा ते पंधरा नगरसेवक तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने पोलिस ठाण्यामध्ये दाखल झाले. दमदाटी अरेरावी व शिवीगाळ करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी केली. मात्र, पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यासाठी टाळाटाळ केली जात होती. अखेर दुपारी 12:30 नंतर नगरसेवकांनी पोलिस ठाण्याच्या पायऱ्यांवर ठिय्या आंदोलन चालू केले.

Dispute
PFI Cyber Fraud: ‘पीएफआय’च्या नावाने अटकेची भीती; सेवानिवृत्त बँक अधिकारी दाम्पत्याची २.१४ कोटींची सायबर फसवणूक

पोलिस व लोकप्रतिनिधींमध्ये वाद

या वेळी पोलिस व लोकप्रतिनिधी यांच्यामध्ये शाब्दिक वाददेखील झाले. त्यानंतरदेखील गुन्हे दाखल होत नव्हते. अखेर जोपर्यंत गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत पोलिस ठाण्याबाहेर आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा सर्व लोकप्रतिनिधींनी दिला. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ लागल्याने प्रशिक्षणासाठी बाहेर गेलेले पोलिस निरीक्षक सचिन पाटील हे तातडीने दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास पोलिस ठाण्यामध्ये आले. घटनेचा सर्व घटनाक्रम त्यांनी समजून घेऊन सायंकाळी साडेसहानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३३३, १८९, १९०, ११५(२), ३५२, ३५१ (२) (३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक शेखर कुलकर्णी करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news