Pimpri Stolen Bike Racket: ‘ऑक्शनच्या’ नावाखाली चोरीच्या महागड्या बाईकची विक्री; २२ दुचाकी जप्त, २२ गुन्हे उघडकीस

गुन्हे शाखा युनिट एकची कारवाई; १२.९० लाखांचा मुद्देमाल हस्तगत, चोरीच्या गाड्या खरेदी करणाऱ्या सात जणांवरही कारवाई
Bike
BikePudhari
Published on
Updated on

पिंपरी: चोरीच्या मोटारसायकली ॲाक्शन किंवा बँकेच्या फायनान्समधून आणल्याचे भासवून ‘स्वस्तात’ विकणाऱ्या ३३ वर्षीय तरुणाला गुन्हे शाखा युनिट एकने अटक केली. त्याच्याकडून २२ महागड्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून, पिंपरी-चिंचवड, पुणे शहर आणि पुणे ग्रामीणमधील २२ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. १२ लाख ९० हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

Bike
Pimpri Chinchwad Nag Panchami: पिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमीचा उत्साह; महिलांनी फुगड्या, झिम्मा, फेर धरत साजरा केला सण

सचिन पांडुरंग मरळे (३३, रा. रुई, ता. बारामती सध्या रा. जुनी सांगवी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पिंपरी पोलिस ठाण्यात वाहनचोरीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांच्या पथकाने समांतरपणे तपास सुरू केला. पोलिसांनी २५० ते ३०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. मुख्य रस्ते टाळून मार्ग बदलणाऱ्या आरोपीचे तांत्रिक विश्लेषणातून नाव निष्पन्न झाले. तो चोरीच्या मोटारसायकलीवरून जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर सापळा रचून त्याला वाहनासह पकडण्यात आले.

Bike
PFI Cyber Fraud: ‘पीएफआय’च्या नावाने अटकेची भीती; सेवानिवृत्त बँक अधिकारी दाम्पत्याची २.१४ कोटींची सायबर फसवणूक

चौकशीत मरळे याने २२ मोटारसायकली चोरल्याचे निष्पन्न झाले. इलेक्ट्रिशियनचा कोर्स करताना झालेल्या ओळखीतील व्यक्तींना या गाड्या ऑक्शन किंवा बँकेच्या फायनान्समधून ओढून आणल्याचे सांगून त्याने विकल्या. सांगोला, अहिल्यानगर, शिरूर, बीड आणि रायगड येथील व्यक्तींना काही गाड्या विकल्याचे तपासात समोर आले. कागदपत्रांची खातरजमा न करता चोरीच्या गाड्या खरेदी करणाऱ्या सात जणांवरही कारवाई करण्यात आली आहे.

Bike
Pimpri Chinchwad Pay and Park: पिंपरी-चिंचवडमध्ये पुन्हा ‘पे अ‍ॅण्ड पार्क’; दुचाकीसाठी तासाला १० रुपये, चारचाकीसाठी ४० रुपये

पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, सहपोलिस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलिस आयुक्त सारंग आवाड, पोलिस उपायुक्त रोहिदास पवार आणि सहायक पोलिस आयुक्त डॉ. सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

Bike
Pimpri Chinchwad Crime: पिंपरी-चिंचवडमध्ये गुन्हेगारीला ऊत; घरात घुसून महिलेला मारहाण, जुगार अड्ड्यावर छापा

लपवून ठेवलेल्या दुचाकीही जप्त

खरेदीदार न मिळाल्याने लपवून ठेवलेल्या सहा मोटारसायकलीही पोलिसांनी जप्त केल्या आहेत. संत तुकारामनगर, पिंपरी, चतु:शृंगी, हिंजवडी, सांगवी, दापोडी, शिरूर आणि भोसरी पोलिस ठाण्यांतील वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. आणखी सहा वाहनांबाबत तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news