PFI Cyber Fraud: ‘पीएफआय’च्या नावाने अटकेची भीती; सेवानिवृत्त बँक अधिकारी दाम्पत्याची २.१४ कोटींची सायबर फसवणूक

बनावट पोलिस कागदपत्रे दाखवून खात्यातील रक्कम वळवली; पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांकडून राजस्थानमधून मुख्य आरोपीला अटक
Cyber Fraud
Cyber FraudPudhari
Published on
Updated on

पिंपरी: ‘तुमच्या बँक खात्यात पीएफआयशी संबंधित पैसे जमा झाले असून, तुम्हाला अटक होऊ शकते,’ अशी भीती दाखवून सेवानिवृत्त बँक अधिकारी आणि त्यांच्या पत्नीची दोन कोटी १४ लाख ७० हजार ३५८ रुपयांची फसवणूक करण्यात आली. दरम्यान, यातील मुख्य आरोपीला पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी राजस्थानमधून अटक केली आहे. राजेंद्र गणराज नागर (३२, रा. जलखोडा, ता. नैनवा, जि. बूंदी, राजस्थान) असे अटक आरोपीचे नाव आहे.

Cyber Fraud
Pimpri Chinchwad Pay and Park: पिंपरी-चिंचवडमध्ये पुन्हा ‘पे अ‍ॅण्ड पार्क’; दुचाकीसाठी तासाला १० रुपये, चारचाकीसाठी ४० रुपये

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी पोलिस अधिकारी असल्याचे भासवून पती-पत्नीच्या बँक खात्यांची माहिती मिळवली. खात्यात पीएफआयशी संबंधित रक्कम जमा झाल्याचे सांगून अटकेची भीती दाखवली. बनावट पोलिस कागदपत्रे आणि नोटिसा दाखवून खात्यातील रकमेची पडताळणी करून ती परत केली जाईल, असे सांगण्यात आले. त्यानंतर विविध खात्यांतून दोन कोटी १४ लाखांहून अधिक रक्कम वळवून घेण्यात आली. याप्रकरणी १७ नोव्हेंबर २०२५ रोजी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

Cyber Fraud
Pimpri Chinchwad Crime: पिंपरी-चिंचवडमध्ये गुन्हेगारीला ऊत; घरात घुसून महिलेला मारहाण, जुगार अड्ड्यावर छापा

दरम्यान, तपासात फसवणुकीची रक्कम स्वीकारण्यासाठी सहा बँक खात्यांचा वापर झाल्याचे स्पष्ट झाले. ‘एम/एस सुलतान कन्स्ट्रक्शन अँड मटेरियल सप्लायर्स’च्या आयसीआयसीआय बँक खात्यात ४९ लाख २० हजार २०० रुपये जमा झाले होते. त्यापैकी ३८ लाख रुपये दुसऱ्या खात्यात वर्ग करून दुसऱ्याच दिवशी धनादेशाद्वारे काढण्यात आले. हे खाते नागरच्या नावावर असल्याचे तपासात निष्पन्न झाले.

Cyber Fraud
Moshi Buffer Zone Illegal Construction: मोशी कचरा डेपोच्या बफर झोनमधील अतिक्रमणांवर महापालिकेचा हातोडा; ८ अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त

पोलिसांनी चौकशीसाठी नोटीस बजावल्यानंतर नागर हजर झाला नाही. त्याने मोबाईलही बंद केला. बँकेचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता तो स्वतः पैसे काढताना दिसला. मोबाईल सीडीआर आणि तांत्रिक विश्लेषणातून त्याचे राजस्थानमधील बुंदी येथील ठिकाण निष्पन्न झाले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने ८ ऑगस्ट रोजी त्याला अटक करण्यात आली. चौकशीत नागरने अरविंद ऊर्फ राजा याच्या मदतीने बँक खात्यांमध्ये पैसे स्वीकारून त्यांची विल्हेवाट लावल्याचे सांगितले. या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध सुरू आहे.

Cyber Fraud
Pune Nashik Highway Traffic: पुणे-नाशिक महामार्गावर दोन तासांची कोंडी; २५ वर्षे घोषणाच, चाकणकरांचा संताप

या पथकाने केली कामगिरी

पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे, सहपोलिस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलिस आयुक्त सारंग आवाड, पोलिस उपायुक्त रोहिदास पवार आणि सहायक पोलिस आयुक्त रोहिणी बानकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक रविकिरण नाळे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news