Pimpri Chinchwad Potholes: पिंपरी-चिंचवडमधील खड्ड्यांवर उपमुख्यमंत्री शिंदेंचे तातडीचे आदेश; उर्वरित खड्डे युद्धपातळीवर बुजवा

२,२४७ पैकी १,७३३ खड्डे बुजवल्याचा महापालिकेचा दावा; नागरिकांना ‘स्मार्ट सारथी’ ॲपवर तक्रार नोंदवण्याचे आवाहन
Road Potholes
Road PotholesPudhari
Published on
Updated on

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे योग्य प्रकारे तातडीने दुरुस्त करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना सोमवारी (दि.१७) दिले आहेत. खड्डे दुरुस्त करून वाहनचालकांना सुरक्षित रस्ते उपलब्ध करून द्यावेत. त्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात, असेही निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.

Road Potholes
Pimpri Stolen Bike Racket: ‘ऑक्शनच्या’ नावाखाली चोरीच्या महागड्या बाईकची विक्री; २२ दुचाकी जप्त, २२ गुन्हे उघडकीस

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी राज्यातील सर्व महापालिका आयुक्तांसमवेत व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बैठक घेतली. त्या बैठकीस आयुक्त डॉ. सूर्यवंशी, शहर अभियंता मनोज सेठिया, सहशहर अभियंता अजय सूर्यवंशी व अधिकारी उपस्थित होते.

Road Potholes
Pimpri Chinchwad Nag Panchami: पिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमीचा उत्साह; महिलांनी फुगड्या, झिम्मा, फेर धरत साजरा केला सण

आयुक्तांनी शहरातील रस्ते दुरुस्ती कामाची माहिती त्यांना दिली. खड्डे बुजवण्याची कार्यवाही युद्धपातळीवर सुरू असल्याचे सांगितले. शहरातील उर्वरित खड्डे तातडीने बुजवण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. खड्डे बुजविण्याच्या कामास प्रशासनाने प्राधान्य द्यावे, असेही त्यांनी सूचना दिल्या. दरम्यान, शहरातील खड्डेमय रस्त्यांबाबत दैनिक पुढारीने छायाचित्रासह सातत्याने ठळक वृत्त प्रसिद्ध केले आहेत.

Road Potholes
PFI Cyber Fraud: ‘पीएफआय’च्या नावाने अटकेची भीती; सेवानिवृत्त बँक अधिकारी दाम्पत्याची २.१४ कोटींची सायबर फसवणूक

स्मार्ट सारथी पीसीएमसी ॲपवर खड्ड्यांची तक्रार नोंदवा

रस्त्यांवरील खड्ड्यांची माहिती महापालिकेपर्यंत तातडीने पोहोचविण्यासाठी स्मार्ट सारथी पीसीएमसी अ‍ॅपमध्ये खड्डे नोंदवा ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. रस्त्यावर खड्डा आढळल्यास स्मार्ट सारथी पीसीएमसी अ‍ॅपवरून त्याची तक्रार नोंदवावी.

तक्रार नोंदविताना नागरिकांना खड्ड्याचे छायाचित्र, जीपीएसद्वारे अचूक ठिकाण, पत्ता तसेच, खड्ड्याचा अंदाजे आकार नोंदविता येतो. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित विभागाकडून प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक कार्यवाही करण्यात येते. तक्रारदाराला तक्रार क्रमांक उपलब्ध होत असून, त्याद्वारे तक्रारीची सद्यस्थिती ऑनलाइन पाहता येते. खड्डा दुरुस्त झाल्यानंतर तक्रार बंद करून त्याबाबतची माहिती संबंधित नागरिकाला उपलब्ध करून देण्यात येते.

Road Potholes
Pimpri Chinchwad Pay and Park: पिंपरी-चिंचवडमध्ये पुन्हा ‘पे अ‍ॅण्ड पार्क’; दुचाकीसाठी तासाला १० रुपये, चारचाकीसाठी ४० रुपये

शहरातील 77 टक्के खड्डे बुजवल्याचा दावा

शहरातील एकूण 2 हजार 247 खड्ड्यांपैकी 1 हजार 733 खड्डे बुजविण्यात आले असून, 514 खड्डे बुजविणे बाकी आहे. आतापर्यंत एकूण 77.13 टक्के खड्डे बुजविण्यात आले आहेत. अ क्षेत्रीय कार्यालयातील 140 पैकी 121, ब क्षेत्रीय कार्यालयातील 109 पैकी 80, क कार्यालयातील 141 पैकी 124, ड मधील 234 पैकी 215, ई मधील 459 पैकी 330, फ कार्यालयातील 151 पैकी 109, ग कार्यालयातील 259 पैकी 170, ह मधील 118 पैकी 87, ज मधील 56 पैकी 51 आणि ल क्षेत्रीय कार्यालयातील 332 पैकी 305 खड्डे बुजविण्यात आले आहेत. शहरी दळणवळण विभागातील 240 पैकी 133 आणि स्थापत्य प्रकल्प विभागातील 9 पैकी 8 खड्डे बुजविण्यात आले आहेत, अशी माहिती स्थापत्य विभागाने दिली आहे.

शहरात रस्त्यांवर खड्डा दिसला तर, छायाचित्र काढा. ठिकाण नोंदवा आणि स्मार्ट सारथी पीसीएमसी अ‍ॅपवर तक्रार करा. त्या तक्रारीवर महापालिका प्रशासनाकडून तातडीने उपाययोजना केली जाईल. ते खड्डे बुजवले जातील.

डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news