Lonavala Tourist Crowd: लोणावळ्यात ‘आखाड’ पार्ट्यांचा जल्लोष; पर्यटकांच्या गर्दीने पर्यटनस्थळे गजबजली, वाहतूक कोंडी

हॉटेल, फार्महाऊस आणि खासगी बंगले हाऊसफुल्ल; भुशी धरणासह विविध पर्यटनस्थळांवर पोलिसांचा बंदोबस्त
Lonavala Tourist Crowd
Lonavala Tourist CrowdPudhari
Published on
Updated on

लोणावळा: आखाड पार्ट्या करण्यासाठी लोणावळा शहरात पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे. पर्यटकांच्या या गर्दीमुळे शहरातील सर्व पर्यटनस्थळे गजबजली असून, हॉटेल, फार्महाऊस व खासगी बंगले पर्यटकांनी भरले आहेत.

Lonavala Tourist Crowd
Pavana Closed Pipeline Project: मावळ गोळीबाराला १५ वर्षे; पवना बंदिस्त जलवाहिनीचा विरोध कायम, प्रकल्प पुन्हा मार्गी लावण्याच्या हालचाली

पुढील आठवड्यामध्ये श्रावण महिना सुरू होणार आहे. हा महिना सुरू होण्यापूर्वी आखाड पार्ट्या सर्वत्र जोरात चालतात. पर्यटनस्थळ असलेल्या लोणावळा शहर व आजूबाजूच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड व अन्य भागांमधून पर्यटक दाखल झाले आहेत. अनेक तरुण-तरुणींचे ग्रुप खासगी बंगल्यांमध्ये मुक्कामी आहेत.

Lonavala Tourist Crowd
Sant Tukaram Maharaj Palkhi: हरिनामाच्या गजरात तुकोबारायांची पालखी पिंपरीत दाखल; वारकऱ्यांच्या स्वागताने शहर दुमदुमले

या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आखाड पार्ट्या रंगल्या असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. लोणावळा शहरामध्ये दीडशेहून अधिक लहान-मोठी हॉटेल्स आहेत. तर, हजारो बंगले आहेत. बंगल्यांमध्ये फार नियमांचे पालन करावे लागत नसल्यामुळे पर्यटक हॉटेलमध्ये राहण्याऐवजी खासगी बंगल्यांना प्राधान्य देत आहेत. या ठिकाणी स्विमिंग पूलमध्ये भिजण्याचा आनंद घेत पार्ट्या रंगत आहेत.

Lonavala Tourist Crowd
Pimpri Chinchwad Indrayani River Project: इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पावरून पिंपरी-चिंचवडमध्ये वाद; ४३० कोटींच्या मंजुरीवर विरोधकांचे गंभीर आरोप

पर्यटनस्थळांवर सुरक्षिततेसाठी पोलिस बंदोबस्त तैनात

शहरातील वाहतूक कोंडी नियंत्रणात ठेवण्यासाठी व पर्यटनस्थळांवर सुरक्षिततेसाठी पुणे ग्रामीण पोलिसांकडून पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. लोणावळा शहर पोलिस तसेच ग्रामीणचे पोलिस कर्मचारी हेदेखील वाहतूक नियंत्रण व पर्यटनस्थळांवर कायदा व सुव्यवस्थेसाठी तैनात आहेत. मात्र, पर्यटकांची व पर्यटकांच्या वाहनांची संख्या मोठी असल्यामुळे वाहतूक नियोजन कोलमंडले आहे. पर्यटनस्थळांवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याकरिता पोलिस तैनात आहेत. काही पोलिस मित्रदेखील पोलिसांना या कामी मदत करत आहेत.

Lonavala Tourist Crowd
Pimpri Hotels Food Safety: मुंढेंच्या धडक कारवाईचा इफेक्ट! हॉटेलच्या भिंतीवर आता ‘आम्ही काय देतो’चा खुलासा

ठिकठिकाणी वाहतूक कोंडी

मागील दोन-तीन दिवसांपासून शहरामध्ये पावसाचा जोर कमी झाला आहे. त्यामुळे हिरव्यागार निसर्गाचा आनंद घेत पर्यटनस्थळांवर व डोंगर भागामध्ये पर्यटक फिरताना दिसत आहेत. सहारा पुन्हा समोरील धबधबे, भूशी धरण, टायगर पॉईंट, शिवलिंग पॉईंट, खंडाळा राजमाची पॉईंट, ड्युक्स नोज पॉइंट, मिसिंग लिंक पॉईंट, तुंगार्ली धरण, भाजे लेणी व धबधबा, कार्ला लेणी हा परिसर पर्यटकांनी गजबजला आहे. पर्यटकांच्या या गर्दीमुळे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली असून, नागरिकांना या कोंडीचा मनस्ताप सहन करावा लागतो आहे. पर्यटकांनादेखील पर्यटनस्थळासाठी काही तास वाहतूक कोंडीतून जावे लागत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news