Eknath Khadse On Parth Pawar: 'ती' फाईल माझ्याकडे आली होती.... नवीन गौप्यस्फोट होतील; एकनाथ खडसे यांचा खळबळजनक दावा

Eknath Khadse On Parth Pawar
Eknath Khadse On Parth Pawarpudhari photo
Published on
Updated on

Eknath Khadse On Parth Pawar Land Fraud File:

राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) नेते एकनाथ खडसे यांनी पार्थ पवार यांच्या कथित जमीन घोटाळ्याप्रकरणी मोठा गौप्यस्फोट केला आहे. आपण महसूल मंत्री असताना या प्रकरणाची संबंधित फाईल आपल्याकडे आली होती, असा महत्त्वपूर्ण खुलासा त्यांनी केला आहे. या फाईलमध्ये असलेले तपशील लवकरच माध्यमांसमोर आणले जातील, ज्यामुळे या प्रकरणाचे अनेक नवीन पैलू उघड होण्याची शक्यता खडसे यांनी व्यक्त केली आहे.

Eknath Khadse On Parth Pawar
Parth Pawar: पार्थ पवार यांच्यामुळे महायुतीवर परिणाम होणार?

'ती' फाईल माझ्याकडे आली होती

मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ खडसे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, "पार्थ पवार यांच्या कथित जमीन घोटाळ्याप्रकरणाची जी फाईल आहे, ती फाईल माझ्याकडे मी महसूल मंत्री असताना आली होती."

"माहिती मला आता मिळाली आहे. त्या फाईलमध्ये काय होतं, काय नाही, याची माहिती मला एखाद्या तासाने किंवा दीड तासाने मिळेल. मी माहिती पूर्ण मिळाल्यानंतर तुम्हाला (माध्यमांना) सांगेल. त्यामधून काहीतरी नवीन गौप्यस्फोट होईल."

खडसे यांच्या या वक्तव्यामुळे पार्थ पवार यांच्या कथित जमीन घोटाळ्याचे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. माजी महसूल मंत्र्यांकडे असलेली ही फाईल नक्की कोणते 'गौप्य' उघड करणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. फाईलमधील माहिती सार्वजनिक झाल्यावर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात मोठे राजकीय वादळ निर्माण होण्याची शक्यता आहे.

Eknath Khadse On Parth Pawar
Parth Pawar Land Raw: पार्थ पवार प्रकरणात पुणे तहसीलदार सूर्यकांत येवले तत्काळ प्रभावनं निलंबित

काय आहे प्रकरण?

पुण्यातील कोरेगाव पार्क येथील घनदाट वनउद्यान असलेली सुमारे १८०० कोटीची जमीन पार्थ पवार यांच्या कंपनीला ३०० कोटी रूपयाला विकण्यात आली. त्याद्वारे कोट्यावधी रूपयांची स्टॅम्प ड्युटी बुडवण्यात आल्याचा आरोप शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अंबादास जानवे यांनी केला होता. यानंतर या प्रकरणी कडक कारवाईचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. यामुळे पार्थ पवार यांच्या अडचणीत वाढ झाली.

दरम्यान या प्रकरणी अजित पवार यांनी माझा या प्रकरणाशी काही संबंध नाही. मी कोणत्याही नातेवाईकाच्या कामासंदर्भात कोणत्याही अधिकाऱ्याला फोन करत नाही असं म्हणत हात झटकण्याचा प्रयत्न केला. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. मात्र यात पार्थ पवार यांचं नाव नसल्यानं विरोधक टीका करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news