Kala Ghoda Art Festival PCMC: काळा घोडा कला महोत्सवात पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विद्यार्थ्यांची कला झळकणार

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय मंचावर 11–12 वयोगटातील विद्यार्थ्यांच्या सर्जनशील संकल्पनांचे प्रदर्शन
Kala Ghoda Art Festival PCMC
Kala Ghoda Art Festival PCMCPudhari
Published on
Updated on

पिंपरी : मुंबई येथे होणाऱ्या देशातील प्रतिष्ठित काळा घोडा कला महोत्सवासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या चार शाळांची निवड झाली आहे. हा महोत्सव 31 जानेवारी ते 8 फेबुवारी 2026 या कालावधीत दक्षिण मुंबईतील ऐतिहासिक काळा घोडा परिसरात आयोजित करण्यात आला आहे.

Kala Ghoda Art Festival PCMC
Ajit Pawar Pimpri Chinchwad: पिंपरी-चिंचवडच्या विकासाचे शिल्पकार अजितदादा; स्मारक व पुतळ्याची सर्वपक्षीय मागणी

महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी महापालिकेच्या विद्यार्थ्यांनी साकारलेली कला मॉडेल्स प्रदर्शनासाठी ठेवली जाणार आहेत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील कला मंचावर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना आपली कला सादर करण्याची संधी मिळाली आहे.

Kala Ghoda Art Festival PCMC
Wakad Kaspatavasti MSEDCL: वाकड कस्पटेवस्तीत महावितरणचा खड्डा तीन महिने उघडाच; नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका

महापालिकेच्या शाळांमधील 11 ते 12 वयोगटातील विद्यार्थ्यांनी आपल्या कला शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत कल्पकतेने आणि मेहनतीने ही मॉडेल्स तयार केली आहेत. या मॉडेल्ससाठी निवडलेले विषय हे केवळ कलात्मक नसून मानवी जीवन, विचारप्रक्रिया आणि आधुनिक शहरी संकल्पनांवर आधारित आहेत.

Kala Ghoda Art Festival PCMC
PCMC Auditorium Scam: रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात ५०.७० लाखांचा अपहार; १५ कर्मचाऱ्यांवर कारवाई

यामध्ये ‌‘अंतर्गत वळण‌’, ‌‘मानवी विचारांचे रोलरकोस्टर‌’, ‌‘रूपांतरण : जीवनाचे रोलरकोस्टर‌’ तसेच ‌‘स्कायवॉक : मर्यादांच्या पलीकडचे शहर‌’ या विषयांचा समावेश आहे. या संकल्पनांमधून विद्यार्थ्यांनी मानवी मनातील चढउतार, जीवनातील बदल आणि शहराच्या विकासाच्या कल्पना प्रभावीपणे मांडल्या आहेत.

Kala Ghoda Art Festival PCMC
Maval Development Ajit Pawar: मावळच्या विकासासाठी ५ हजार कोटींचा निधी; दादांनी दिलेला शब्द पूर्ण

आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, उपायुक्त ममता शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्रशासनाधिकारी संगीता बांगर, कला नोडल अधिकारी श्रीकांत चौगुले, मुख्याध्यापक शिवाजी दौंडकर, सरस्वती भेगडे, वंदना इन्नानी, मृगनयना चव्हाण, कला शिक्षक अपर्णा मोरे, मुक्ता पाउसळकर, नेताजी घोलप, विकास आगवणे यांच्या अधिपत्याखाली विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news