Ajit Pawar Pimpri Chinchwad: पिंपरी-चिंचवडच्या विकासाचे शिल्पकार अजितदादा; स्मारक व पुतळ्याची सर्वपक्षीय मागणी

शोकसभेत मान्यवरांचे भावनिक मनोगत; नव्या महापालिका भवनात भव्य पुतळा उभारण्याचा प्रस्ताव
Ajit Pawar Pimpri Chinchwad
Ajit Pawar Pimpri ChinchwadPudhari
Published on
Updated on

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराचा विकास अजितदादा पवार यांनी केला आहे. त्यांच्याकडे असलेल्या दूरदृष्टीमुळे हे पिंपरी-चिंचवड शहर बेस्ट सिटी म्हणून ओळखले जाते. ते शहरासाठी त्यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या स्मृती जतन करण्यासाठी शहरात त्याचे भव्य स्मारक उभारले जावे. नव्या महापालिका भवन इमारतीच्या दर्शनी आवारात त्यांचा भव्य पुतळा उभारावा. महापालिकेच्या सर्व नाट्यगृहात त्यांचे तैलचित्र लावले जावे, अशा सूचना शुक्रवारी (दि.30) झालेल्या शोकसभेत विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून करण्यात आल्या.

Ajit Pawar Pimpri Chinchwad
Wakad Kaspatavasti MSEDCL: वाकड कस्पटेवस्तीत महावितरणचा खड्डा तीन महिने उघडाच; नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका

उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांचे बुधवारी (दि.28) बारामती येथे विमान अपघातात निधन झाले. अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात सर्व पक्षीय शोकसभा झाली. शोकसभेत विविध पक्षांचे राजकीय नेते, पदाधिकारी, शहराध्यक्ष, नगरसेवक, पत्रकार व इतर क्षेत्रातील मान्यवरांची आपले अनुभव कथन केले.

बारामती ही त्यांची जन्मभूमी असली तरी, पिंपरी-चिंचवड ही त्यांची कर्मभूमी होती. त्यांचे शहरावर विशेष प्रेम होते. दूरदृष्टी ठेवून त्यांनी शहरात प्रशस्त रस्ते तसेच, पायाभूत सुविधा विकसित केल्या. शहराला बेस्ट सिटी म्हणून ओळख दिली. त्यामुळे शहरात राहण्यास मोठी पसंती दिली जात आहे, असे अनेकांनी मत प्रदर्शन केले.

Ajit Pawar Pimpri Chinchwad
PCMC Auditorium Scam: रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात ५०.७० लाखांचा अपहार; १५ कर्मचाऱ्यांवर कारवाई

शोकसभेत आमदार महेश लांडगे, शंकर जगताप, अमित गोरखे, उमा खापरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल, माजी शहराध्यक्ष अजित गव्हाणे, भाजपाचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर, माजी महपौर संजोग वाघेरे पाटील, माजी शहराध्यक्ष वसंत लोंढे, नगरसेवक संदीप वाघेरे, माजी नगरसेविका सीमा सावळे, कैलास कदम, रविकांत वरपे, मनसेचे माजी शहराध्यक्ष सतीश फुगे, ॲड. गोरक्ष लोखंडे, सुनील गव्हाणे आदींनी मनोगत व्यक्त केले.

Ajit Pawar Pimpri Chinchwad
Maval Development Ajit Pawar: मावळच्या विकासासाठी ५ हजार कोटींचा निधी; दादांनी दिलेला शब्द पूर्ण

अजितदादांच्या स्मृती जपल्या जातील

अजितदादांबाबत अनेकांनी आपली मते व्यक्त केली. त्यांच्या स्मृती जपण्यासाठी अनेकांनी सूचना केल्या आहेत. त्यासाठी एकत्रित येऊन सर्वांना सोबत घेऊन काम केले जाईल. त्यांच्या स्मृती जागृत ठेवल्या जातील. चिंचवड येथील नवीन महापालिका भवनाच्या आवारात अजितदादांचा भव्य पुतळा उभारला जाईल. तसेच, भाऊसाहेब भोईर यांनी सूचना केल्याप्रमाणे शहरातील सर्व नाट्यगृहात अजितदादांचे तैलचित्र लावले जाईल. सत्तारूढ भाजपा पक्षाकडून विरोधकांचा पूर्ण सन्मान केला जाईल, असे भाजपाचे आमदार शंकर जगताप यांनी ग्वाही दिली.

जातीभेद न करणारा नेता

अजितदादा हे कधीच जातीभेद मानत नव्हते. त्यांनी कार्यकर्त्यांना नेहमी बळ दिले. त्यांनी माझ्यासारख्या पंजाबी तरुणास पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौर, दोन वेळा शहराध्यक्ष तसेच, स्थायी समिती अध्यक्ष केले. पिंपरी-चिंचवड शहरासाठी त्यांची तळमळ मी जवळून पाहिली आहे, असे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश बहल म्हणाले.

Ajit Pawar Pimpri Chinchwad
Dehu Road Sonography Service: देहूरोड शासकीय रुग्णालयातील सोनोग्राफी सेवा बंद; रुग्णांना खासगी रुग्णालयाचा खर्च

सर्वांना सोबत घेऊन कार्य केले जावे

अजितदादा यांनी शहराचा विकास केला आहे. विविध पक्षांतील आमदार, पदाधिकारी, नगरसेवक हे त्यांच्यामुळे मोठे झाले आहेत. त्यांच्या स्मृती जपण्यासाठी स्मारक उभारणे हे त्यांच्यावर उपकार नाहीत. तर, आपल्या पितृतुल्य नेत्यांसाठी ते करणे आपले कर्तव्यच आहे. त्या समर्पण भावनेतून सर्वांना सोबत घेऊन ते कार्य केले जावे, अशी अपेक्षा माजी नगरसेविका सीमा सावळे यांनी व्यक्त केली.

राजकीय संस्कृती जपली जावी

अजितदादा यांनी शहरातील अनेक कार्यकर्त्यांना मोठे केले. त्यांना मोठ मोठी पदे दिली. राष्ट्रवादीचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी भाजपाची वाट धरली. मात्र, ते शरद पवार व अजितदादांवर कोणतेही आरोप करीत नव्हते. त्याबाबत विचारले असते. लक्ष्मण जगताप यांनी सांगितले होते की, आमचे राजकीय मतभेद आहेत. मात्र, मनभेद नाहीत. ती राजकीय संस्कृती व परिपक्वता आता जपली गेली पाहिजे, अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे रविकांत वरपे यांनी व्यक्त केली.

Ajit Pawar Pimpri Chinchwad
Lonavala Power Supply Disruption: लोणावळ्यात अपघात; नांगरगावात वीज खांब कोसळल्याने वीजपुरवठा खंडित

कार्यकर्त्यांच्या घरी भाजी- भाकरी जेवणारा नेता

अजितदादा हे कार्यकर्त्यांना बळ देणारे नेते होते. त्यांचे म्हणणे ते ऐकून घेत. त्यांना मार्गदर्शन करते. शहरात आले की, ते कोणत्याही हॉटेलमध्ये जेवण करत नसत. सामान्य कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन भाकरी, भाजी, मटकी खाात. त्यातून ते कार्यकर्त्यांसोबत स्नेहसंबंध निर्माण करत, असे राष्ट्रवादीचे माजी अध्यक्ष अजित गव्हाणे व योगेश बहल यांनी सांगितले.

विरोधकांचाही सन्मान करणारे नेतृत्व

विकासकामांच्या प्रभागात निधी कमी पडत असल्यास किंवा तो दिला जात नसल्यास विरोधी पक्षातील नगरसेवक थेट अजितदादांची भेट घेत. ते कामाची माहिती घेऊन तातडीने निधी मंजुर करण्याचा सूचना आयुक्त तसेच, पदाधिकाऱ्यांना देत. विरोधकांनाही कार्यक्रम व उपक्रम घेण्याची संधी दिली जात होती. त्यांनी विरोधकांचा स्पेस कधी कमी केला नाही. विरोधी पक्षाच्या नगरसेवकांच्या प्रभागात त्यांनी 24 तास पाणीपुरवठा योजना सुरू केली. स्वर्गीय अंकुश लांडगे यांची भोसरी नाट्यगृह उभारण्याची इच्छा होती. ती इच्छा अजितदादांनी पूर्ण केली. त्या नाट्यगृहाला त्यांचे नाव देण्यात आले. अजितदादांप्रमाणे सर्व सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांचा सन्मान केला जावा, असे आमदार अमित गोरखे, शिवसेनेच्या नगरसेविका सुलभा उबाळे, राष्ट्रवादीचे नगरसेवक संदीप वाघेरे, माजी शहराध्यक्ष अजित गव्हाणे तसेच, कैलास कदम यांनी व्यक्त केली.

Ajit Pawar Pimpri Chinchwad
Pimpri Chinchwad Municipal Election Voting: पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत मतदानाचा बारकाईने अभ्यास सुरू

पीएमपीएल, मेट्रो प्रवास फ्री करावा

महापालिका निवडणुकीत अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना पीएमपीएल बस आणि मेट्रो प्रवास मोफत करण्याची घोषणा केली होती. विरोधात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 37 नगरसेवक आहेत. महापालिका अर्थसंकल्पातील केवळ 2 टक्के तरतूद त्यासाठी केल्यास मोफत सेवा देणे सहज शक्य आहे. त्यासाठी आम्ही नगरसेवक शेवटपर्यंत प्रयत्न करू, सत्ताधारी भाजपाने त्याला साथ द्यावी. ती अजितदादांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक संदीप वाघेरे म्हणाले.

दादा मला माफ करा : आ. लांडगे

आजचा दिवस खूप वाईट आहे. उपस्थित नागरिक, पिंपरी-चिंचवड शहराचे सर्व नागरिक तसेच, लांडगे कुटुंबीयांच्या वतीने अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. दादा मला माफ करा, असे अश्रू भरल्या डोळ्यांनी आपल्या भावना व्यक्त करत आमदार महेश लांडगे यांनी मनोगत थांबवले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news