Wakad Kaspatavasti MSEDCL: वाकड कस्पटेवस्तीत महावितरणचा खड्डा तीन महिने उघडाच; नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका

नंदादीप सोसायटीजवळ रस्त्यावर राडारोडा; अपघाताची भीती, प्रशासनाकडे तातडीच्या कारवाईची मागणी
Wakad Kaspatavasti MSEDCL
Wakad Kaspatavasti MSEDCLPudhari
Published on
Updated on

पिंपळे गुरव : वाकड कस्पटेवस्ती येथील नंदादीप सोसायटीजवळ महावितरणअंतर्गत केबल जॉईंट मारण्याचे काम करण्यात आले होते. हे काम पूर्ण होऊन तब्बल दोन ते तीन महिने उलटले असतानाही संबंधित एजन्सीने खोदलेला खड्डा अद्याप बुजवलेला नाही. तसेच, खोदकामातून निघालेली माती दगड व राडारोडा पदपथावर व रस्त्याच्याकडेला तसाच पडून असल्याने परिसरातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

Wakad Kaspatavasti MSEDCL
Ahilyanagar Development Ajit Pawar: अजितदादांमुळे अहिल्यानगरला सर्वाधिक निधी; विकासकामांतून शहराचे रूप पालटले – आ. काशिनाथ दाते

रस्त्यावरच राडारोडा

सदर रस्ता हा वाहतुकीच्यादृष्टीने अत्यंत वर्दळीचा असून, दुचाकी व चारचाकी वाहनांची सतत ये-जा सुरू असते. अशा परिस्थितीत खुला खड्डा व आजूबाजूला पसरलेली माती-दगड यामुळे अपघाताचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला व लहान मुलांसाठी ही परिस्थिती अत्यंत धोकादायक ठरत आहे.

चालण्यास अडथळा

नंदादीप सोसायटीच्या शेजारीच हॉटेल्स व दुकाने असल्यामुळे तेथे येणाऱ्या ग्राहकांना तसेच सोसायटी धारकांना या अस्वच्छता व अडथळ्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. पदपथ वापरणे कठीण झाल्याने नागरिकांना थेट रस्त्यावरून चालावे लागत असून, त्यामुळे वाहतुकीत अडथळे निर्माण होऊन अपघाताची शक्यता वाढली आहे.

Wakad Kaspatavasti MSEDCL
Ahilyanagar SSC: दहावी-बारावीच्या परीक्षांसाठी जिल्हा प्रशासन सज्ज; सीसीटीव्ही, झूम ॲप व पोलिस बंदोबस्त

रस्ता बुजविण्याची मागणी

या भागातील नागरिक व स्थानिक रहिवाशांनी संबंधित विभागाने तात्काळ दखल घेऊन खोदलेला खड्डा योग्य पद्धतीने बुजवावा. तसेच, परिसरातील माती, दगड व राडारोडा त्वरित उचलण्यात यावा, अशी मागणी केली आहे. प्रशासनाने या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष न करता त्वरित कारवाई करावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Wakad Kaspatavasti MSEDCL
Ahmednagar Collector Office: अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ईमेलवर पुन्हा बॉम्ब धमकी, यंत्रणा सतर्क

तीन महिने होऊन गेले तरी खड्डा तसाच आहे. दररोज शाळकरी मुले आणि ज्येष्ठ नागरिक या रस्त्यावरून ये-जा करतात. एखादा मोठा अपघात झाल्यावरच प्रशासन जागे होणार का? =

स्थानिक नागरिक

वायरिंगचा जॉईंट दुरुस्त करून दोन-तीन महिने झाले आहेत. काम पूर्ण झाल्यानंतर संबंधित एजन्सीला खड्डा बुजवण्यास सांगितले होते. आज दिवसभरात एजन्सीला पुन्हा सूचना देऊन ते काम पूर्ण करून घेतले जाईल.

सुरेश गवारी, सहायक अभियंता, वाकड विभाग, महावितरण

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news