Indrayani River Rejuvenation Project: इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पात जागेचा पेच; १०० टक्के ताब्याचे हमीपत्र, प्रत्यक्षात केवळ ३० टक्केच जागा

४३० कोटींच्या प्रकल्पाचे काम सुरू; उर्वरित जागांसाठी महापालिकेची धावपळ, सहा भागांतील जागामालकांना ३० दिवसांत जागा देण्याचे आवाहन
Indrayani River Pollution
Indrayani River PollutionPudhari
Published on: 
Updated on: 

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने केंद्र व राज्य शासनाची फसवणूक करून इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पास अमृत ०.२ अभियानात परवानगी मिळवण्यात आली आहे. प्रकल्पासाठी शंभर टक्के जागा ताब्यात नसतानाही महापालिकेने सर्व जागा ताब्यात असल्याचे हमीपत्र शासनाला दिले आहे. केवळ ३० टक्केच जागा ताब्यात असताना या प्रकल्पाचे काम सुरूही करण्यात आले आहे. आता जागा ताब्यात घेण्याची कार्यवाही महापालिकेने सुरू केली आहे. त्यासाठी तळवडे, चिखली, बोऱ्हाडेवाडी, मोशी, डुडुळगाव, चऱ्होली बुद्रुक परिसरातील जागा ताब्यात देण्याचे आवाहन करण्याची वेळ महापालिकेवर आली आहे.

Indrayani River Pollution
PCMC H Ward Civic Issues: दूषित पाणी, अस्वच्छता, वाहतूक कोंडीने 'ह' प्रभाग त्रस्त; नागरी समस्यांवर विशेष बैठक

शहराच्या उत्तर सीमेवरील १८.५० किलोमीटर लांबीच्या इंद्रायणी नदीच्या एका बाजूसाठी प्रकल्प राबवण्यासाठी ४३० कोटी ७५ लाख खर्चास स्थायी समितीने १ जुलै २०२६ ला मान्यता दिली. त्यानंतर लगेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या प्रकल्पाचे होणारा भूमिपूजन कार्यक्रम अतिपावसामुळे अचानक रद्द करण्यात आला. त्यानंतर ८ जुलैला मोशी कचरा डेपोतील वेस्ट टू एनर्जी प्रकल्पातील अनधिकृत प्रशासकीय इमारत कोसळून ९ कर्मचार्‍यांच्या मृत्यूची दुर्देवी घटना घडली. भूमिपूजनाचा कार्यक्रम रद्द झाला. मोशी दुर्घटनेमुळे हा प्रकल्प राबवणारा पर्यावरण आभियांत्रिकी विभागाच अडचणीत आल्याचे चित्र आहे. पाठोपाठ त्या विभागाच्या दोन प्रमुख अधिकार्‍यांचे निलंबन झाले आहे.

Indrayani River Pollution
MahaDBT Scholarship Portal: महाडीबीटी पोर्टलचा खोळंबा; शिष्यवृत्ती अर्जांसाठी विद्यार्थ्यांच्या ई-सुविधा केंद्रांमध्ये रांगा

दरम्यान, या प्रकल्पासाठी १०० टक्के जागा ताब्यात असल्याचे हमीपत्र तत्कालिन आयुक्त शेखर सिंह यांच्या सहीने राज्य शासनाला देण्यात आले होते. केंद्र शासन पुरस्कृत अमृत २.० अभियानाअंतर्गत मंजुरी दिलेल्या या प्रकल्पाबाबत आयुक्तांनी हमीपत्र दिले आहे. प्रकल्पासाठी एकूण ३६ लाख १७ हजार चौरस मीटर (८९३.६ एकर) जागा आवश्यक असून, ती १०० टक्के जागा महापालिकेकडे उपलब्ध असून, त्यावर लगेच प्रकल्पाचे काम सुरू करता येईल. उर्वरित शून्य टक्के जागा विहित वेळेत प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी उपलब्ध करून देण्याची हमी आयुक्तांनी दिली आहे. त्या हमीपत्रामुळे राज्य शासनाने या प्रकल्पास मंजुरी देत निम्मा निधी देण्यास मान्यता दिली आहे. प्रत्यक्षात महापालिकेच्या ताब्यात केवळ ३० टक्केच जागा आहे. महापालिकेच्या नियमानुसार प्रकल्पासाठी लागणार्‍या जागेपैकी ८० टक्के जागा ताब्यात आल्यानंतर काम सुरू करण्यात येते.

Indrayani River Pollution
Pimpri Chinchwad Municipal Corporation Building: पिंपरी-चिंचवड महापालिकेची आर्थिक कोंडी; नव्या मुख्यालयावर मात्र हजार कोटींचा खर्च!

मात्र, या प्रकल्पात महापालिका प्रशासनाच्या ताब्यात केवळ ३० टक्के जागा आहे. असे असताना ठेकेदाराला वर्कऑर्डर देण्यात आली आहे. तसेच, शासनालाही १०० टक्के जागा ताब्यात असल्याचे खोटे सांगत निधीस मान्यता मिळवण्यात आल्याचे उघड झाले आहे. दरम्यान, तळवडे, चिखली, बोऱ्हाडेवाडी, मोशी, डुडुळगाव, चऱ्होली बुद्रुक येथील जागा ताब्यात देण्यासाठी महापालिकेने जागेचा भाग आणि सर्व्हे क्रमांकासह शनिवारी (दि.२८) जाहीर प्रकटन प्रसिद्ध केले आहे. इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पासाठी नदी काठच्या भागांतील जागा जागामालकांनी जागा तीस दिवसांत महापालिकेच्या ताब्यात द्यावी. प्रपत्र अ आणि ब भरून द्यावे. त्या सर्व जागामालकांना विकास हक्क प्रमाणपत्र (डीआरसी) एफएसआयच्या माध्यमातून मोबदला दिला जाणार आहे. महिन्याभरात प्रतिसाद न दिल्यास बाधित जागेचे भूसंपादनाला कायद्यानुसार मोबदला देण्यात येईल, असे नगर रचना विभागाने स्पष्ट केले आहे. त्यावरून महापालिका प्रशासनाचे वरातीमागून घोडे अशी अवस्था झाल्याचे दिसत आहे.

Indrayani River Pollution
Pimpri Chinchwad DP Plan: पिंपरी-चिंचवडच्या डीपी प्लॅनवर ५६ हजार ७७९ हरकती; सुनावणी अंतिम टप्प्यात

प्रकल्पाची माहिती

  • नदीची लांबी : १८.५० किलोमीटर

  • महापालिकेच्या बाजूने : केवळ एक बाजू

  • एकूण खर्च : ४३० कोटी ७५ लाख ६१ हजार ७७७ रुपये

  • शासनाकडून मिळणारा ५० टक्के निधी : २१५ कोटी ३७ लाख ८० हजार ८८८ रुपये

  • प्रकल्पासाठी लागणारी एकूण जागा : ३६ लाख १७ हजार चौरस मीटर (८९३.६ एकर)

  • ताब्यात असलेली एकूण जागा : ३० टक्के

  • कामाची मुदत : तीन वर्षे

असा होणार खर्च

  • रिव्हर रेसिडन्सी ४० एमएलडी क्षमतेचा एसटीपी : ७२ कोटी ५७ लाख २० हजार ४५५ रुपये

  • डुडुळगाव २० एमएलडी क्षमतेचा एसटीपी : ४१ कोटी ९ लाख ७६ हजार ९३०

  • पूरप्रतिबंधक व काठ संरक्षण कामासाठी बंधारे मजबूत करणे, दगडी पिचिंग करणे : २३२ कोटी १८ लाख ९४ हजार २१२ रुपये

  • उद्यान व लॅण्डस्केपिंग : ४७ कोटी ५ लाख ६५ हजार ९९ रुपये

  • मोडतोड व पाडकाम : ३ कोटी ३० लाख १० हजार १६ रुपये

  • विद्युत प्रकाश योजना : १२ कोटी ३७ लाख ५१ हजार ७९१ रुपये

प्रकल्पासाठी तळवडे, चिखली, बोऱ्हाडेवाडी, मोशी, डुडुळगाव, चऱ्होली बुद्रुक अशा सहा भागांतील नदीकाठच्या जागा ताब्यात घेणार.

डीआरसी, एफएसआयच्या माध्यमातून महापालिका जागामालकांना मोबदला देणार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.