MahaDBT Scholarship Portal: महाडीबीटी पोर्टलचा खोळंबा; शिष्यवृत्ती अर्जांसाठी विद्यार्थ्यांच्या ई-सुविधा केंद्रांमध्ये रांगा

सर्व्हरची संथ गती, कागदपत्रे अपलोड करण्यात अडचणी; पडताळणीला विलंब झाल्याने विद्यार्थी-पालकांची धावपळ वाढली
Scholarship
ScholarshipPudhari
Published on: 
Updated on: 

पिंपरी: राज्यातील विविध शिष्यवृत्ती योजनांचा लाभ मिळविण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना सध्या मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. तांत्रिक अडचणी, सर्व्हरची संथ गती, कागदपत्रे अपलोड न होणे तसेच पडताळणी प्रक्रियेला होणारा विलंब यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज रखडले असून, ई-सुविधा केंद्रांमध्ये विद्यार्थ्यांच्या रांगा वाढल्या आहेत. परिणामी विद्यार्थी आणि पालकांना वारंवार केंद्रांच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत.

Scholarship
Pimpri Chinchwad Municipal Corporation Building: पिंपरी-चिंचवड महापालिकेची आर्थिक कोंडी; नव्या मुख्यालयावर मात्र हजार कोटींचा खर्च!

उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती ही आर्थिक आधाराची महत्त्वाची बाब मानली जाते. मात्र महाडीबीटी पोर्टलवरील तांत्रिक समस्यांमुळे अर्ज पूर्ण करण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याचे चित्र आहे. अनेक विद्यार्थ्यांना अर्ज भरल्यानंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड होत नसल्याचा अनुभव येत आहे, तर काहींचे अर्ज पडताळणीच्या टप्प्यात अडकून पडले आहेत.

Scholarship
Pimpri Chinchwad DP Plan: पिंपरी-चिंचवडच्या डीपी प्लॅनवर ५६ हजार ७७९ हरकती; सुनावणी अंतिम टप्प्यात

विद्यार्थ्यांना या समस्येचा अधिक आर्थिक फटका बसत आहे. अर्जातील त्रुटी दुरुस्त करण्यासाठी किंवा कागदपत्रे पुन्हा सादर करण्यासाठी अनेक किलोमीटरचा प्रवास करावा लागत असल्याने आर्थिक भारही वाढत आहे. अंतिम मुदत जवळ येत असल्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये चिंतेचे वातावरण असून अर्ज प्रक्रियेला गती देण्याची मागणी जोर धरत आहे.

Scholarship
Chinchwad Railway Flyover: चिंचवड स्टेशनचा जुना रेल्वे उड्डाण पूल पाडणार; ५५.४० कोटींचा नवा पूल उभारणार

दरम्यान, संबंधित विभागाकडून तांत्रिक अडचणी दूर करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले जात असले तरी शिष्यवृत्ती अर्ज प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी विद्यार्थी आणि पालकांकडून केली जात आहे. अन्यथा अनेक पात्र विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या लाभापासून वंचित राहण्याची भीती व्यक्त होत आहे.

Scholarship
YCM Hospital Server Down: वायसीएम रुग्णालयात सर्व्हर डाऊन; औषध वितरण ठप्प, रुग्णांना तासभर प्रतीक्षा

महाडीबीटी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करताना गेल्या दोन आठवड्यांत चार वेळा ई-सुविधा केंद्रात जावे लागले. प्रत्येक वेळी वेगवेगळ्या तांत्रिक अडचणींमुळे अर्ज पूर्ण होऊ शकला नाही.

सागर गवारे (विद्यार्थी)

सध्या महाडीबीटी पोर्टलवर विद्यार्थ्यांची अर्ज भरण्यासाठी गर्दी होत आहे. सर्व्हर वारंवार संथ होत असल्याने अर्ज प्रक्रिया पूर्ण होण्यास विलंब होत आहे.

किरण ढोरे (इ सेवा केंद्राचालक)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.