PCMC H Ward Civic Issues: दूषित पाणी, अस्वच्छता, वाहतूक कोंडीने 'ह' प्रभाग त्रस्त; नागरी समस्यांवर विशेष बैठक

स्थायी समिती अध्यक्ष अभिषेक बारणे यांच्या उपस्थितीत आढावा; बेवारस वाहने हटविणे, कचरा संकलन सुधारणे आणि हॉकर झोन निश्चित करण्यावर चर्चा
Pimpri Chinchwad Municipal Corporation
Pimpri Chinchwad Municipal CorporationPudhari
Published on: 
Updated on: 

सांगवी: दूषित पाणीपुरवठा, अस्वच्छता, ड्रेनेजच्या समस्या, वाहतूक कोंडी आणि अतिक्रमणांमुळे 'ह' प्रभागातील नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. या सर्व नागरी समस्यांची दखल घेत 'ह' प्रभाग क्षेत्रीय कार्यालयात विशेष बैठक घेण्यात आली. स्थायी समिती अध्यक्ष अभिषेक बारणे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत प्रभागातील मूलभूत सुविधांचा आढावा घेऊन संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

Pimpri Chinchwad Municipal Corporation
MahaDBT Scholarship Portal: महाडीबीटी पोर्टलचा खोळंबा; शिष्यवृत्ती अर्जांसाठी विद्यार्थ्यांच्या ई-सुविधा केंद्रांमध्ये रांगा

प्रभागातील प्रलंबित नागरी प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आयोजित बैठकीला 'ह' प्रभाग अध्यक्षा तृप्ती कांबळे, क्षेत्रीय अधिकारी संतोष कोराड, प्रशासकीय अधिकारी रामचंद्र येवले यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते. नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेल्या पाणीपुरवठा, आरोग्य, स्वच्छता, वाहतूक आणि सार्वजनिक सुविधांच्या प्रश्नांवर या वेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.

Pimpri Chinchwad Municipal Corporation
Pimpri Chinchwad Municipal Corporation Building: पिंपरी-चिंचवड महापालिकेची आर्थिक कोंडी; नव्या मुख्यालयावर मात्र हजार कोटींचा खर्च!

प्रभागातील विविध नागरी समस्यांवर एकाच बैठकीत सविस्तर चर्चा करून संबंधित विभागांना उपाययोजनांच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पाणीपुरवठा, स्वच्छता आणि वाहतूक व्यवस्थेतील सुधारणा यांसारखे प्रश्न मार्गी लागल्यास नागरिकांना मोठा दिलासा मिळू शकतो. त्यामुळे बैठकीत झालेल्या निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी करून प्रभागातील नागरी सुविधा अधिक सक्षम करण्याचे आव्हान आता प्रशासनासमोर आहे.

Pimpri Chinchwad Municipal Corporation
Pimpri Chinchwad DP Plan: पिंपरी-चिंचवडच्या डीपी प्लॅनवर ५६ हजार ७७९ हरकती; सुनावणी अंतिम टप्प्यात

बेवारस वाहनांचा प्रश्न

रस्त्यांच्या कडेला दीर्घकाळापासून उभी असलेली बेवारस वाहने हटविण्याचाही विषय बैठकीत मांडण्यात आला. अशा वाहनांची माहिती घेऊन त्यांची चौकशी करावी आणि नियमानुसार आवश्यक कारवाई करावी, असे निर्देश या वेळी संबंधितांना देण्यात आले.

Pimpri Chinchwad Municipal Corporation
Chinchwad Railway Flyover: चिंचवड स्टेशनचा जुना रेल्वे उड्डाण पूल पाडणार; ५५.४० कोटींचा नवा पूल उभारणार

स्वच्छ पाणीपुरवठा, स्वच्छतेवर भर

प्रभागातील काही भागांतून दूषित पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी बैठकीत मांडण्यात आल्या. नागरिकांना नियमित आणि स्वच्छ पाणी मिळावे, यासाठी पाणीपुरवठा व्यवस्थेची तपासणी करून आवश्यक सुधारणा करण्याची सूचना करण्यात आली. तसेच ड्रेनेज व्यवस्था आणि आरोग्यविषयक समस्यांकडेही लक्ष वेधण्यात आले. कचरा संकलन अधिक प्रभावी होण्यासाठी कचरा गाड्यांची संख्या वाढविणे, स्वच्छता कर्मचाऱ्यांची उपलब्धता सुधारणे आणि परिसरात नियमित साफसफाई करण्यावर भर देण्यात आला.

वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी हॉकर झोनचा विचार

प्रभागातील वाढती वाहतूक कोंडी आणि रस्ते व पदपथांवरील अतिक्रमणांचा प्रश्नही चर्चेत आला. पादचाऱ्यांसाठी पदपथ मोकळे ठेवणे, अतिक्रमणे हटविणे आणि खराब झालेल्या पदपथांची दुरुस्ती करण्याबाबत सूचना करण्यात आल्या. फेरीवाल्यांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी अधिकृत हॉकर झोन निश्चित करण्याबाबतही चर्चा झाली. यामुळे फेरीवाल्यांचे नियोजन आणि वाहतुकीची समस्या सोडविण्यास मदत होऊ शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.