Hinjewadi Extortion Allegation: पुण्यात कंपनीकडे एक कोटी किंवा ३० गुंठे जमिनीची मागणी केल्याचा आरोप

मुळशीतील जमीन व्यवहारातून वाद; मागणी पूर्ण न केल्यास काम बंद पाडण्याची धमकी दिल्याची हिंजवडी पोलिसांत तक्रार
Extortion Case
Extortion CasePudhari
Published on: 
Updated on: 

पिंपरी: राजकीय पक्षाचा पदाधिकारी असल्याचे सांगत एक कोटी रुपये किंवा ३० गुंठे जमिनीची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मागणी पूर्ण न केल्यास कंपनीचे काम बंद पाडण्याची धमकी दिल्याप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुळशी तालुक्यातील माण येथील जमीन व्यवहारातून हा वाद निर्माण झाला आहे.

Extortion Case
Pimpri Chinchwad Water Wastage: पिंपरी-चिंचवडमध्ये पाण्याची नासाडी सुरूच; आयुक्तांच्या इशाऱ्यानंतरही कारवाई शून्य!

याप्रकरणी कंपनीच्या वतीने चेतन रमेश मुसळे यांनी तक्रार दिली आहे. त्यामध्ये सिताराम सखाराम पारखी, सुरेश सखाराम पारखी, रमेश सखाराम पारखी आणि उमेश सखाराम पारखी यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत. मुसळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, माण येथील सर्व्हे क्रमांक ४४/३ मधील जमीन कंपनीच्या मालकीची असल्याचा दावा करण्यात आला आहे.

Extortion Case
Hinjawadi Shivajinagar Metro: पुणेकरांची प्रतीक्षा संपणार? हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोचे ३ नोव्हेंबरला उद्घाटन होण्याची शक्यता

सरकारी मोजणीनंतर तेथे कुंपण उभारण्याचे काम सुरू असताना संबंधितांनी कामाच्या ठिकाणी येऊन एक कोटी रुपये किंवा ३० गुंठे जमिनीची मागणी केल्याचा आरोप आहे. मागणी पूर्ण न केल्यास राजकीय पक्षाचे पदाधिकारी बोलावून काम बंद पाडण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.

Extortion Case
Moshi Waste Depot: मोशी डेपोत शहराबाहेरील कचरा आणत नाही; वजनवाढीमागे सण-उत्सव आणि साचलेल्या कचऱ्याचे कारण

तसेच, कामगारांना धक्काबुक्की करून जिवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे. पाच ते सात महिला बाउन्सर सोबत आणून कामात अडथळे निर्माण केल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. दरम्यान, संबंधित जमीन व्यवहाराबाबतचा दिवाणी दावा न्यायालयाने रद्द केल्याचा दावा कंपनीने केला आहे. या तक्रारीची हिंजवडी पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.

Extortion Case
Pimpale Gurav Bus Stand: पिंपळे गुरव बसस्थानकावर अपघातानंतरही निष्काळजीपणा कायम; आठ दिवसांपासून राडारोडा तसाच

सीताराम पारखी, सुरेश पारखी, रमेश पारखी आणि उमेश पारखी यांनी संगनमत करून कंपनीकडे एक कोटी रुपये किंवा ३० गुंठे जमिनीची मागणी केल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. मागणी पूर्ण न केल्यास कंपनीचे काम बंद पाडण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

बालाजी पांढरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, हिंजवडी पोलिस ठाणे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news