Pimpri Chinchwad Police Employee: पिंपरी-चिंचवड पोलिस दलातील कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळला; दोन दिवसांपासून होते बेपत्ता

निगडी ट्रान्सपोर्टनगर बस डेपो परिसरातील घटना; सरकारी पिस्तूल घटनास्थळी आढळले
Vijay Motilal Koli
Vijay Motilal KoliPudhari
Published on: 
Updated on: 

पिंपरी: मागील दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या पिंपरी-चिंचवड पोलिस दलातील एका कर्मचाऱ्याने सेवा पिस्तुलातून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याचे शनिवारी (दि. २६) सकाळी उघडकीस आले. निगडीतील ट्रान्सपोर्टनगर बस डेपो परिसरात त्यांचा मृतदेह आढळून आला. कौटुंबिक वादानंतर ते बुधवारी (दि. २३) घरातून निघून गेले होते.

Vijay Motilal Koli
Pakistani Beauty Cream: 'मेड इन पाकिस्तान' क्रीमची पिंपरीत विक्री; २३ क्रीम जप्त

विजय मोतीलाल कोळी (वय ३६) असे मृत पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते पिंपरी-चिंचवड पोलिस दलात कार्यरत होते. त्यांच्या पत्नी सारिका विजय कोळी यांनी याबाबत चिखली पोलिस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे कोळी हे आरटीपीसी म्हणून कार्यरत होते.

Vijay Motilal Koli
Pimpri Chinchwad Traffic Changes: विसर्जनासाठी शहरातील वाहतुकीत बदल; विविध मार्गांवर प्रवेशबंदी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास कोळी घरातून निघून गेले. त्यानंतर ते घरी परतले नाहीत. जाताना त्यांच्याकडे सरकारी पिस्तूल असल्याचे समोर आल्यानंतर पोलिस यंत्रणेने त्यांचा शोध सुरू केला होता. त्यांचे शेवटचे लोकेशन निगडीतील दुर्गादेवी टेकडी परिसरात आढळल्याने त्या भागात पोलिसांनी व्यापक शोधमोहीम राबवली. ड्रोनच्या साहाय्यानेही परिसर पिंजून काढण्यात आला होता.

Vijay Motilal Koli
Pimpri Chinchwad Ganesh Visarjan: बाप्पाच्या विसर्जनासाठी पिंपरी-चिंचवड सज्ज! १०१ कृत्रिम हौद, जीवरक्षक अन् अग्निशमन पथके तैनात

दरम्यान, शनिवारी सकाळी निगडी ट्रान्सपोर्टनगर येथील बस डेपो परिसरात कोळी यांचा मृतदेह आढळून आला. घटनास्थळी सरकारी पिस्तूलही मिळून आले. प्राथमिक तपासात त्यांनी त्याच पिस्तुलातून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे पिंपरी-चिंचवड पोलिस दलात हळहळ व्यक्त होत आहे. चिखली पोलिस तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news