

पिंपरी: महापालिकेच्या विविध विभागांचे एकूण 88 अधिकारी व कर्मचारी रविवारी (दि. 31) सेवानिवृत्त होत आहेत. त्यानिमित्त आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते त्यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
संत तुकारामनगर, पिंपरी येथील आचार्य अत्रे रंगमंदिर येथे झालेल्या कार्यक्रमात अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, सहाय्यक आयुक्त तानाजी नरळे, मुख्य कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, किरण गायकवाड, प्रफुल्ल पुराणिक, पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष बबन झिंजर्डे, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
सेवानिवृत्त होणाऱ्यांमध्ये सहशहर अभियंता माणिक चव्हाण, कार्यकारी अभियंता रवींद्र सूर्यवंशी, सहाय्यक आयुक्त राजीव घुले, राजाराम सरगर, मुख्याध्यापक बुधा नाडेकर, रामदास चपटे, बाळासाहेब आल्हाट, मुख्याध्यापिका पुष्पलता महाकाळ, अंजली झगडे, श्रीकांत चौगुले, सविता म्हस्के, सुनंदा शिंदे, भारती वर्णे, संगीता वाघमारे, प्रशासन अधिकारी ग्यानचंद भाट, सुचेता कुलकर्णी, कार्यालय अधीक्षक महादेव बोरे, क्रीडा पर्यवेक्षक गोरक्ष तिकोने, रंगराव कारंडे यांचा समावेश आहे.
तसेच, क्रीडा शिक्षक मंगल जाधव, स्टाफ नर्स उज्ज्वला जाधव, विद्युत पर्यवेक्षक अनिल नायर, फार्मासिस्ट शशिकांत रिटे, मुख्य लिपिक राजू वेताळ, उपशिक्षक संध्या गायकवाड, मिनाक्षी लोखंडे, केमिस्ट उमा भोगे, भांडारपाल प्रशांत आल्हाट, केशव घाटगे, भगवान शिंगाडे, धनाजी माळवदकर, अंकुश माळी, धनाजी गावडे, हेमंत ढवळे, अनिल मोरे, आबा पाटील, हमीदसाहेब पटेल, गोरक्ष आगळे, शांताराम घारे, हनुमंत घाडगे, दत्तात्रय तापकीर, मोहनदास सर्वगोड, विठ्ठल निगडे, दिलीप गायकवाड, लक्ष्मण तिटकारे, शशिकांत शिंदे यांचा समावेश आहे. तसेच, संजीवनी पवार, नंदकुमार वाघेरे, बाळासाहेब इंगळे, नितीन काळभोर, एकनाथ वांभिरे, सावकार भिवरे, चंद्रकांत मिरजकर, राजाराम लोंढे, बाबूराव चिंचवडे, बाळू साठे, रविंद्र कुदळे, नारायण केसवड, रमेश दोरगे, रमेश देवकाते, राजू आल्हाट, छाया थोरात, शशीकला पाटील, माणिक कांबळे, मुकुंद कोंढरे, मालन ओव्हाळ, सुधीर जगताप, धनंजय ओव्हाळ, देवराम पवार, विश्वनाथ बोऱ्हाडे, दिलीप हनमंते व विजय जगताप हे निवृत्त झाले.
यांनी घेतली स्वेच्छानिवृत्ती
स्टाफ नर्स मीरा शिंदे, मुकादम विजय माछरे, सफाई कर्मचारी प्रमिला जाधव, आशा लादे, रोशन मुजावर, सुमन ओव्हाळ, राजू लोंढे, बाजीराव कुटे, मालती वाघेरे, वैजयंती देवकर, लतिका बुट्टे, मनोहर शितोळे महादेव तेलंगी व विजयमाला कांबळे यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले तर प्रास्ताविक तानाजी नरळे यांनी केले.