Diwali Fire Safety Pimpri-Chinchwad: मागील दोन दिवाळीत 173 ठिकाणी आगीच्या घटना; नागरिकांनी घ्यावी काळजी, अग्निशमन विभागाचे आवाहन

दिवाळीपूर्वी पिंपरी-चिंचवड अग्निशमन विभाग सज्ज; फॅन्सी फटाके टाळा, पर्यावरणपूरक फटाक्यांचा वापर करा अशी सूचना
मागील दोन दिवाळीत 173 ठिकाणी आगीच्या घटना
मागील दोन दिवाळीत 173 ठिकाणी आगीच्या घटनाPudhari
Published on
Updated on

संतोष शिंदे

पिंपरी : दिवाळीचा सण म्हणजे आनंद, प्रकाश आणि फटाक्यांचा जल्लोष; मात्र हा आनंद काही क्षणातच दुर्घटनेत बदलत असल्याचे वास्तव अग्निशमन विभागाच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. मागील दोन वर्षांत ऐन दिवाळीच्या काळात तब्बल 173 ठिकाणी आगीच्या घटना नोंदवल्या गेल्या असून, यातील बहुतेक घटना फॅन्सी रॉकेट्‌‍स आणि उडणाऱ्या फुलबाज्यांमुळे झाल्याचे समोर आले आहे. (Latest Pimpri chinchwad News)

मागील दोन दिवाळीत 173 ठिकाणी आगीच्या घटना
Pimpri Vegetable Market Prices: आवक वाढल्याने भाज्यांचे दर उतरले; मिरची, भेंडी, बिन्स स्वस्त

या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन विभागाने या वर्षी सर्वतोपरी तयारी केली आहे. दिवाळी सणाच्या काळात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुट्‌‍ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. फटाक्यांमुळे लागणाऱ्या आगींच्या घटनांना प्रतिबंध करण्यासाठी प्रत्येक अग्निशमन केंद्राला सज्ज ठेवण्यात आले असून नागरिकांनी देखील खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मागील दोन दिवाळीत 173 ठिकाणी आगीच्या घटना
Voter List Irregularities: लोणावळ्यात मतदार यादीत मोठा घोळ, राष्ट्रवादी काँग्रेसने केला निषेध

पर्यावरणपूरक फटाके वापरावेत

परवानगी नसलेले आणि फॅन्सी फटाके दिवाळीत धोक्याचे ठरत आहेत. फुलबाज्या, रॉकेट, चक्र आणि ‌‘फॅन्सी शो‌’ सारखे फटाके आकर्षक वाटत असले तरी याच फटाक्यांमुळे आगीच्या घटना घडत आहेत. अनेक वेळा रॉकेट उडवताना नागरिक सुरक्षित अंतर राखत नाहीत. उंच इमारतींच्या बाल्कनीत, कपड्यांवर किंवा गॅस सिलिंडरजवळ पडल्याने काही सेकंदांत आग भडकते. निष्काळजीपणामुळे मोठ्या दुर्घटना घडू नयेत म्हणून अग्निशमन विभागाने परवानगी नसलेले फटाके टाळण्याचे आणि फक्त सुरक्षित, पर्यावरणपूरक फटाके वापरावेत, असे आवाहन केले आहे.

अग्निशमनच्या सूचनांचे पालन करणे अत्यावश्यक

दिवाळीच्या काळात झालेल्या आगींमध्ये घर, दुकाने, गोदामे आणि वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे लक्ष्मीपूजनच्या रात्री अग्निशमन विभागाला सर्वाधिक आपत्कालीन कॉल प्राप्त झाल्याची नोंद आहे. या दिवशी फटाक्यांची आतषबाजी आणि गर्दीमुळे आगीचा धोका वाढतो. छोटी चूकही मोठ्या दुर्घटनेत रूपांतरित होते. त्यामुळे दिवाळीचा आनंद घेत फटाके उडवताना विशेष काळजी घेणे आणि अग्निशमन विभागाच्या सूचनांचे पालन करणे अत्यावश्यक असल्याचे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे.

मागील दोन दिवाळीत 173 ठिकाणी आगीच्या घटना
Development Projects: तळेगाव दाभाड्यात 761 कोटी 17 लाखांच्या विकासकामांचा उद्या शुभारंभ

मागील दोन वर्षात फॅन्सी फटाक्यांमुळे आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे फटाके उडवताना नागरिकांनी काळजी घ्यावी. आग लागल्यास जीव धोक्यात घालून स्वतः आगीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करू नका. कारण छोट्या आगीचा काही क्षणांत मोठा भडका होऊ शकतो. कोठेही आगीची घटना घडल्यास त्वरित 101 वर कॉल करून अग्निशमन दलाला माहिती द्या.

ऋषीकांत चिपाडे, उप अग्निशमन अधिकारी

आपत्कालीन क्रमांक

फायर हेल्पलाइन : 101

मुख्य केंद्र (पिंपरी) : 8484081101

भोसरी: 7030908992

थेरगाव : 8956039245

नेहरूनगर : 8484051101

मागील दोन दिवाळीत 173 ठिकाणी आगीच्या घटना
Electric Diyas: दिवाळीत घराघरात आधुनिक रोषणाईची क्रेझ; इलेक्ट्रिक पणत्यांचा जलवा!

अग्निशमन विभागाची तयारी

शहरातील 10 अग्निशमन केंद्रे पूर्ण क्षमतेने सज्ज ठेवण्यात आली आहेत.

19 फायर बंब, पुरेसा पाणीसाठा, उपकरणे आणि अतिरिक्त पथके तयार आहेत.

गर्दीच्या ठिकाणी, बाजारपेठा व सोसायट्यांच्या परिसरात अतिरिक्त गस्त व फायर तैनात करण्यात आले आहेत.

अधिकारी व जवानांची सहा दिवसांची सुट्टी रद्द, 24 तास सतर्क ड्युटी.

मागील दोन दिवाळीत 173 ठिकाणी आगीच्या घटना
Pimpri Vegetable Market Prices: आवक वाढल्याने भाज्यांचे दर उतरले; मिरची, भेंडी, बिन्स स्वस्त

फटाके उडवताना घ्यावयाची खबरदारी

मोकळ्या जागेत फटाके उडवा

इमारती, विजेचे खांब व वाहनांपासून दूर राहा.

कॉटनचे कपडे वापरा ; नायलॉनचे कपडे टाळा.

मोठ्यांच्या देखरेखीखालीच लहान मुलांना फटाके द्या

फटाके उडवताना जवळ पाण्याची बादली, वाळू किंवा ओला कपडा ठेवा.

जास्त आवाज आणि धूर निर्माण करणारे फटाके टाळा

परवानगी नसलेले फटाके टाळा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news