Electric Diyas: दिवाळीत घराघरात आधुनिक रोषणाईची क्रेझ; इलेक्ट्रिक पणत्यांचा जलवा!

रंगीत एलईडी डिझाईन्स, कमी वीज वापर आणि पुनर्वापराची सोय; पारंपरिक पणत्यांसोबत इलेक्ट्रिक पणत्यांना मोठी मागणी
इलेक्ट्रिक पणत्यांचा जलवा
इलेक्ट्रिक पणत्यांचा जलवाPudhari
Published on
Updated on

नवलाख उंबरे: दिवाळी सण जवळ आल्याने बाजारपेठेत विद्युत रोषणाईचा झगमगाट झाला आहे. बाजारपेठेत पारंपरिक पणतीपेक्षा नागरिकांनी इलेक्ट्रिक पणतीला पसंती दिल्याचे दिसून येत आहे. पारंपरिक मातीच्या पणत्यांसोबतच यावर्षी इलेक्ट्रिक पणत्या आणि एलईडी दिव्यांचीही जोरदार मागणी दिसून येत आहे. रंगीत प्रकाश, आकर्षक डिझाईन्स आणि कमी विजेचा वापर या वैशिष्ट्यांमुळे ग्राहक या आधुनिक पणत्यांकडे आकर्षित होत आहेत. (Latest Pimpri chinchwad News)

इलेक्ट्रिक पणत्यांचा जलवा
Development Projects: तळेगाव दाभाड्यात 761 कोटी 17 लाखांच्या विकासकामांचा उद्या शुभारंभ

लहान आकाराच्या बॅटरीवर चालणाऱ्या पणत्या, संगीतासह प्रकाश बदलणाऱ्या एलईडी पणत्या, तसेच सौरऊर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक पणत्या अशा विविध प्रकारच्या उत्पादनांनी बाजारपेठ सजली आहे. या आधुनिक पणत्या पारंपरिकतेला आधुनिकतेचा स्पर्श देत घरगुती सजावटीसाठी खास ठरत आहेत.

इलेक्ट्रिक पणत्यांचा जलवा
Voter List Irregularities: लोणावळ्यात मतदार यादीत मोठा घोळ, राष्ट्रवादी काँग्रेसने केला निषेध

बाजारात पारंपरिक मातीच्या पणत्यांबरोबर इलेक्ट्रिक दिव्यांचा संगम दिसत असून, सणासुदीचा माहोल अधिक रंगतदार झाला आहे. टिकाऊपणा, सुरक्षितता आणि पुन्हा वापरता येण्याची सोय या कारणांमुळे इलेक्ट्रिक पणत्या केवळ शहरीच नव्हे, तर ग्रामीण भागातही लोकप्रिय ठरत आहेत. दिवाळीच्या सजावटीत पारंपरिक प्रकाशाच्या तेजाला आधुनिक इलेक्ट्रिक रोषणाईची जोड मिळाल्याने यंदाची सणसुदी अधिक झगमगती होणार आहे.

इलेक्ट्रिक पणत्यांचा जलवा
Road Hazard: पिंपळे निलख क्षेत्रीय कार्यालयासमोर रस्त्याला भगदाड, नागरिक त्रस्त

दरवर्षी दिवाळीच्या सणात ग्राहक मातीच्या पणत्या घेत असत, पण यंदा इलेक्ट्रिक पणत्यांची मागणी प्रचंड वाढली आहे. या पणत्या पुन्हा वापरता येतात, त्यामुळे ग्राहकांना त्यात फायदा वाटतो. शिवाय एलईडी लाईट्समुळे दिवे अधिक आकर्षक दिसतात. एकच सेट वर्षानुवर्षे वापरता येतो, त्यामुळे लोक पारंपरिक पणत्यांसोबत आधुनिक इलेक्ट्रिक पणत्यांकडे वळत आहेत.

नितीन दगडे, विक्रेते

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news