ESI Hospital Pimpri: ईएसआय रुग्णालयात रुग्ण तपासणीकडे दुर्लक्ष; निवृत्त डॉक्टरांकडून औषधोपचारावर भर

मोहननगर येथील रुग्णालयात रुग्णांना दुय्यम वागणूक, सोनोग्राफीसह अनेक सुविधा अद्याप अपुऱ्या
ईएसआय रुग्णालयात रुग्ण तपासणीकडे दुर्लक्ष;
ईएसआय रुग्णालयात रुग्ण तपासणीकडे दुर्लक्षPudhari
Published on
Updated on

पिंपरी : मोहननगर येथील राज्य कामगार विमा योजना रुग्णालय (ईएसआय) रुग्णालयात निवृत्त डॉक्टरांची नेमणूक केली आहे. हे निवृत्त डॉक्टर रुग्णांची कोणतीही तपासणी न करता गोळ्या आणि औषधे देत आहेत. तसेच त्यांना दुय्यम वागणूक दिली जात आहे. त्यामुळे येथे उपचारासाठी येणाऱ्या कामगार रुग्णांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. याठिकाणी येणाऱ्या रुग्णांना उपचाराऐवजी मन: स्ताप होत आहे.

मोहननगर येथील रुग्णालयात पिंपरी चिंचवड, चाकण, लोणावळा, हिंवजडी परिसरातून रुग्ण उपचारासाठी येतात. त्याशिवाय पुण्यातील रुग्णदेखील उपचारासाठी येतात. उद्योग व्यापार क्षेत्रातील ईएसआय सुविधेचा लाभ घेण्याऱ्या कामगार कर्मचाऱ्यांसाठी हे रुग्णालय उपयुक्त आहे. मात्र, अपुऱ्या सुविधांमुळे रुग्णांना पूर्णत: उपचार मिळत नसल्याची तक्रार कामगार करत आहेत.(Latest Pimpri chinchwad News)

ईएसआय रुग्णालयात रुग्ण तपासणीकडे दुर्लक्ष;
Lek Ladki Yojana: लेक लाडकी योजनेचा पुणे जिल्ह्यातील 1,145 बालिकांना लाभ

नोंदणीसाठी जनजागृतीचा अभाव

खासगी रुग्णालयातील महागड्या उपचारांऐवजी ईएसआय रुग्णालय कामगारांसाठी सोयीचे आहे. पिंपरी-चिंचवड शहरात सुमारे 16 लाख 28 हजार कामगार आहेत. त्यातील केवळ 6 लाख 50 हजार कामगारांची ईएसआय नोंदणी झाली आहे. त्यामुळे इतर कामगारांना लाखो रुपये भरून खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागतात. नवीन सुविधांची माहिती कामागरांना होण्यासाठी रुग्णालय प्रशासनाकडून जनजागृतीचा अभाव दिसून येत आहे.

रुग्णालयातील सुविधा

महिलांची प्रसूती, हाडाच्या शस्त्रक्रिया, अपघात झालेल्या रुग्णांवर आंतररुग्ण विभागात उपचार व इतर शस्त्रक्रियाची सोय आहे. शल्यविशारद, स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, अस्थिरोग तज्ज्ञ, कान - नाक - घसा आदी तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध आहेत.

ईएसआय रुग्णालयात रुग्ण तपासणीकडे दुर्लक्ष;
Pimpri Chinchwad Election: आजची आरक्षण सोडत ठरवणार महापालिकेच्या रणसंग्रामाचे समीकरण

डोळ्यांसाठी स्वतंत्र विभागाचे नियोजन

रुग्णालयात डोळ्यांच्या शस्त्रक्रियांसाठी स्वतंत्र विभाग प्रस्तावित आहे. हा विभाग सुरू झाल्यानंतर मोतीबिंदू तिरळेपणा आदी डोळ्यांच्या शस्त्रक्रिया करणे शक्य होणार आहे. मानसोपचार, त्वचारोग, दंतोपचार आदी सुविधांचे नियोजन आहे.

रुग्णालयात सोनोग्राफी सेंटर प्रस्तावित

रुग्णालयात सोनोग्राफी सेंटर नाही. त्यामुळे गरोदर महिला आणि इतर रुग्णांना खासगी रुग्णालयात जावून सोनोग्राफी करावी लागते. रुग्णाला सकाळी सोनोग्राफीकरिता नेले की त्याला सायंकाळीच आणले जाते. यामध्ये ज्यांना उपाशीपोटी सोनोग्राफी करायची असते अशा रुग्णांचे हाल होते. तर इतर रुग्णांना ताटकळत बसावे लागते. अशा परिस्थितीत रुग्णांना चक्कर येणे अशा घटना घडतात.

ईएसआय रुग्णालयात रुग्ण तपासणीकडे दुर्लक्ष;
Sinhagad Tourist Rush: सिंहगड, खडकवासला पर्यटकांनी फुल्ल; कोंडीने त्रस्त झाले पर्यटक

डॉक्टर रुग्णांना तपासतही नाहीत

रुग्णालयात निवृत्त डॉक्टरांची नेमणूक केली आहे. हे डॉक्टर वयोवृद्ध असल्याने ते रुग्णांना तपासतदेखील नाही. फक्त विचारणा करून गोळ्या औषधे देतात. एखाद्याला गाठ असेल, ताप असेल, पोट दुखत असेल तरी त्याची तपासणी केली जात नाही. त्यामुळे रुग्णांचा आजार बरा व्हायला वेळ लागतो. तसेच रुग्णांना नीट वागणूक दिली जात नाहीत. इतर तपासणीच्या सुविधा नसल्याने रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात जावे लागते, असे एका कामगाराने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.

या सुविधांची प्रतीक्षा

ईएसआय रुग्णालयात डोळ्यांवरील मोतीबिंदू व इतर शस्त्रक्रिया करण्याची सोय उपलब्ध नाही. तसेच दंतोपचाराच्या सुविधेचादेखील अभाव आहे. रुग्णालयाच्या बाह्य रुग्ण विभागात दररोज 300 ते 350 रुग्ण उपचारासाठी येतात. त्यामुळे रुग्णालयावर अतिरिक्त ताण पडत आहे. किडनी, हृदयाचे आजार, मेंदूचे आजारांवरील उपचाराच्या सुविधा रुग्णालयात उपलब्ध नाहीत. त्यामुळे या उपचारासाठी टायअप झालेल्या खासगी रुग्णालयात पाठविण्यात येते.

ईएसआय रुग्णालयात रुग्ण तपासणीकडे दुर्लक्ष;
Lonavala Local Elections: लोणावळा सर्वच पक्षांकडून स्वबळाचा नारा

रुग्णालयाला नवीन डॉक्टर्स मिळत नसल्याने निवृत्त डॉक्टरांची नेमणूक करण्यात आली आहे. रुग्णालयात हळूहळू सर्व सुविधा सुरु करण्यात येणार आहेत. रुग्णालयात मनोसोपचार, त्वचारोग, दंतोपचार, नेत्ररोग विभागदेखील सुरू केला जाणार आहे. सोनोग्राफी येत्या आठवडाभरात सुरू होईल. फक्त पालिकेची परवानगी मिळणे बाकी आहे.

वर्षा सुपे (वैद्यकीय अधीक्षक, ईएसआय रुग्णालय, मोहननगर)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news