Lek Ladki Yojana: लेक लाडकी योजनेचा पुणे जिल्ह्यातील 1,145 बालिकांना लाभ

57 लाख 25 हजार रुपयांची रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यावर; मुलींच्या शिक्षण व सक्षमीकरणासाठी महत्त्वाची पावले
Lek Ladki Yojana
लेक लाडकी योजनाPudhari Photo
Published on
Updated on

पुणे : यावर्षी पुणे जिल्ह्यात एक हजार 145 बालिकांना लेक लाडकी या योजनेचा लाभ देण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषद प्रशासनाकडून देण्यात आली. त्यासाठी 57 लाख 25 हजार रुपयांची रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहेत.(Latest Pimpri chinchwad News)

Lek Ladki Yojana
Pimpri Chinchwad Election: आजची आरक्षण सोडत ठरवणार महापालिकेच्या रणसंग्रामाचे समीकरण

‌‘लेक लाडकी‌’ योजना ही महाराष्ट्र सरकारची एक महत्वाकांक्षी योजना आहे. ही योजना अशा कुटुंबांसाठी लागू आहे ज्यांचे वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयांपेक्षा कमी आहे आणि जे पिवळे किंवा केशरी राशनकार्डधारक आहेत. 1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या बालिकांना या योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य दिले जाते.

शाळाबाह्य मुलींची संख्या शून्यापर्यंत आणण्यासाठी प्रयत्न करने, कुपोषण कमी करणे, मुलीच्या जन्मास प्रोत्साहन देऊन मुलींचा जन्मदर वाढविणे, मुलींच्या शिक्षणाला चालना देणे, मुलींचा मृत्यू दर कमी करणे आणि बालविवाह रोखणे हा योजनेचा उद्देश आहे.

Lek Ladki Yojana
Sinhagad Tourist Rush: सिंहगड, खडकवासला पर्यटकांनी फुल्ल; कोंडीने त्रस्त झाले पर्यटक

लाभाचे टप्पे

पहिला हप्ता कुटुंबात मुलीच्या जन्मानंतर पाच हजार रुपये, दुसरा हप्ता इयत्ता पहिलीत सहा हजार रुपये, तिसरा हप्ता सहावीमध्ये सात हजार रुपये. चौथा हप्ता अकरावीत आठ हजार रुपये आणि लाभार्थी मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिला 75 हजार रुपये याप्रमाणे एक लाख एक हजार एवढी रक्कम देण्यात येणार आहे.

Lek Ladki Yojana
Lonavala Local Elections: लोणावळा सर्वच पक्षांकडून स्वबळाचा नारा

वर्षनिहाय निधी वितरण

2023-24 : 1,400 बालिकांना 70 लाखांची रक्कम

2024-25 : 5,720 बालिकांना 2 कोटी 86 लाखांची रक्कम

2025-26 : 1,145 बालिकांना 57 लाख 25 हजार रुपयांची रक्कम

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news