Digital Education: ऑनलाईन शिक्षण क्रांती; ग्रामीण भागात डिजिटल शिक्षणाचा झपाट्याने विस्तार

मोबाईल व इंटरनेटच्या मदतीने गावातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची नवी दारे खुली होत आहेत
Digital Education
Digital EducationPudhari
Published on
Updated on

नवलाख उंबरे: पूर्वी शहरांपुरते मर्यादित असलेले डिजिटल शिक्षण आता ग््राामीण भागातही वेगाने पोहोचताना दिसत आहे. मोबाईल, इंटरनेट आणि ऑनलाईन शिक्षण प्लॅटफॉर्मच्या मदतीने गावातील विद्यार्थी आता आधुनिक शिक्षण पद्धतीकडे वळताना दिसत आहेत. विशेषतः कोरोना काळानंतर डिजिटल शिक्षणाचे महत्त्व ग््राामीण भागात मोठ्या प्रमाणात वाढले आहे.

Digital Education
Maval Prostitution Issue: मावळ तालुक्यात महामार्गावर वेश्याव्यवसायाचा आरोप; प्रशासनावर प्रश्नचिन्ह

पूर्वी अनेक ग््राामीण विद्यार्थ्यांना चांगले मार्गदर्शन, स्पर्धा परीक्षा तयारी किंवा तांत्रिक शिक्षणासाठी शहरांवर अवलंबून राहावे लागत होते. मात्र, आता मोबाईलवर उपलब्ध असलेल्या ऑनलाईन क्लासेस, यूट्यूब लेक्चर्स, डिजिटल नोट्‌‍स आणि शैक्षणिक ॲप्समुळे विद्यार्थ्यांना गावात राहूनही शिक्षण घेणे शक्य झाले आहे. त्यामुळे वेळ आणि खर्च दोन्हीची बचत होत आहे.

Digital Education
E Challan Portal Issue: ई-चलान पोर्टलमध्ये तांत्रिक बिघाड; दंड भरूनही अपडेट होत नसल्याने नागरिक त्रस्त

ग््राामीण भागातील अनेक पालकदेखील आता डिजिटल शिक्षणाचे महत्त्व समजू लागले आहेत. मुलांना मोबाईल फक्त मनोरंजनासाठी न देता शिक्षणासाठी वापरण्याचा कल वाढताना दिसत आहे. काही गावांमध्ये खासगी संस्था आणि प्रशिक्षण केंद्रांकडून मोफत किंवा कमी शुल्कात संगणक प्रशिक्षण दिले जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संगणक, डिजिटल कौशल्ये आणि ऑनलाईन कामांविषयी उत्सुकता वाढली आहे.

Digital Education
Dehu Yelwadi Road Project: देहू-येलवाडी रस्ता रुंदीकरणाला वेग; अतिक्रमण हटाव मोहीम सुरू

तथापि, अजूनही अनेक गावांमध्ये इंटरनेटचा वेग कमी असणे, मोबाईल किंवा लॅपटॉपची कमतरता आणि आर्थिक अडचणी यांसारख्या समस्या कायम आहेत. काही विद्यार्थ्यांना नेटवर्कसाठी डोंगर किंवा मोकळ्या जागेत जावे लागत असल्याचे चित्रही दिसते. तरीही या अडचणींवर मात करत ग््राामीण भागातील विद्यार्थी डिजिटल शिक्षण स्वीकारताना दिसत आहेत. स्पर्धेच्या युगात फक्त पारंपरिक शिक्षण पुरेसे नसून डिजिटल कौशल्ये आवश्यक बनली आहेत. त्यामुळे ग््राामीण विद्यार्थ्यांमध्येही आधुनिक शिक्षणाची जाणीव निर्माण होत आहे. भविष्यात डिजिटल शिक्षणामुळे ग््राामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठ्या संधी उपलब्ध होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Digital Education
Adhik Maas Tradition: अधिकमासामुळे जावयाच्या वाणाची परंपरा उत्साहात; बाजारात अनारसे-चांदीच्या वस्तूंना मागणी

मोबाईलमुळे आम्हाला गावात राहूनही मोठ्या शिक्षकांचे ऑनलाईन मार्गदर्शन मिळते. त्यामुळे नवीन गोष्टी शिकणे सोपे झाले आहे.

मयूर सातपुते, विद्यार्थी

पूर्वी मुलांना शिकण्यासाठी शहरात पाठवावे लागायचे, पण आता गावात राहूनही ऑनलाइन चांगले शिक्षण मिळत आहे.

नाना ढोरे, पालक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news