Dehuroad Crop Damage: देहूरोडमध्ये अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान; शेतकरी हवालदिल

20-25 हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान; शेतकऱ्यांकडून मदत व कर्जमाफीची मागणी
Dehuroad Crop Damage
Dehuroad Crop DamagePudhari
Published on
Updated on

देहूरोड: मावळ तालुक्यात सलग तीन दिवस झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतीचे मोठे नुकसान झाले असून, देहूरोड परिसरातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. अचानक आलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे रब्बी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

Dehuroad Crop Damage
Pawana Dam Water Level: पवना धरणात 46.55% पाणीसाठा; पिंपरी-चिंचवडला पावसाळ्यापर्यंत पुरेसा

भाजीपाल्याचे नुकसान

अवकाळी पावसामुळे देहूरोड व आसपासच्या गावांमधील अंदाजे 20 ते 25 हेक्टर क्षेत्रावरील गहू, ज्वारी, कांदा, विविध भाजीपाला तसेच फळपिके पूर्णपणे उद्ध्‌‍वस्त झाली आहेत. विशेषतः काढणीच्या टप्प्यावर आलेली पिके जमिनीवर आडवी पडल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी गारपिटीमुळे पिकांची पाने गळून पडली असून, उभी पिकेही सडण्याचा धोका निर्माण झाला आहे.

Dehuroad Crop Damage
Pimpri Chinchwad Gas Shortage Hotels: पिंपरी-चिंचवडमध्ये गॅस तुटवड्याचा हॉटेल व्यवसायावर फटका

नुकसान भरपाई देण्याची मागणी

या अवकाळी पावसामुळे शेतीत पाणी साचल्याने पिकांच्या मुळांनाही फटका बसला आहे. कांदा आणि भाजीपाल्यासारख्या नगदी पिकांचे सर्वांधिक नुकसान झाले असून, शेतकऱ्यांनी घेतलेले कर्ज फेडण्याची चिंता वाढली आहे. काही शेतकऱ्यांनी पीकविमा घेतला असला तरी नुकसानभरपाई मिळण्याबाबत अनिश्चितता असल्याने त्यांच्यात नाराजी व्यक्त होत आहे.

Dehuroad Crop Damage
Pimpri Chinchwad Property Tax Collection: पिंपरी-चिंचवडमध्ये मालमत्ताकरातून 961 कोटींची वसुली; ऑनलाईन भरण्याकडे नागरिकांचा कल

कृषी अधिकाऱ्यांकडून पाहणी

दरम्यान, या परिस्थितीची गंभीर दखल घेत महसूल व कृषी विभागाने पंचनामे करण्यास सुरुवात केली आहे. कृषी अधिकाऱ्यांनी बाधित भागांना भेट देत शेतकऱ्यांशी संवाद साधला असून, प्रत्यक्ष शेतावर जाऊन नुकसानाची पाहणी केली आहे. प्रशासनाकडून लवकरात लवकर अहवाल सादर करून शासनाकडे मदतीचा प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

Dehuroad Crop Damage
Bhosari Bullock Cart Race: भोसरीत बैलगाडा शर्यतींचा थरार; भैरवनाथ उत्सवात ‘घाटाचा राजा’ ठरला

कर्जमाफी देण्याची शेतकऱ्यांची मागणी

शेतकरी वर्गाने शासनाकडे तातडीने आर्थिक मदत, पीकविम्याची त्वरित अंमलबजावणी आणि कर्जमाफीसह दिलासा देण्याची मागणी केली आहे. नैसर्गिक आपत्तीच्या या फटक्यामुळे मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा संकटाचे सावट आले असून, तातडीच्या मदतीशिवाय त्यांना सावरणे कठीण असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news