Dehu Beej Sohala Traffic Diversion: देहू बीज सोहळा: 4 ते 6 मार्चदरम्यान विशेष वाहतूक बदल लागू

पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेचे आदेश; प्रमुख मार्ग बंद, पर्यायी रस्त्यांचा वापर करण्याचे आवाहन
Traffic Police
Traffic Police Pudhari
Published on
Updated on

देहूगाव: जगद्गुरू श्रीसंत तुकाराम महाराज यांच्या बीज उत्सवानिमित्त देहूगाव येथे 5 मार्च रोजी मोठ्या प्रमाणावर वारकरी, भाविक व नागरिक उपस्थित राहणार आहेत. यामुळे परिसरात होणारी गर्दी लक्षात घेऊन पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेकडून 4 ते 6 मार्चदरम्यान विशेष वाहतूक बदल लागू करण्यात आले आहेत. वाहतूक शाखेचे उपायुक्त विवेक पाटील यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.

Traffic Police
Dehu Tukaram Maharaj Beej Sohala: देहूनगरी सज्ज! संत तुकाराम महाराज बीज सोहळ्यासाठी कडेकोट सुरक्षा व व्यापक तयारी

जुना मुंबई-पुणे महामार्गावरील देहूगाव कमान ते देहूकडे जाणारा मार्ग (सार्वजनिक बसेस व दिंडीतील वाहनांव्यतिरिक्त) 4 ते 6 मार्चदरम्यान बंद राहणार आहे. महिंद्रा सर्कल ते फिजिक्स कॉर्नर, कॅनबे चौक, आयटी पार्क चौक, तळेगाव-चाकण रोडवरील देहूफाटा ते देहूगाव मार्ग, आयटी पार्क-कॅनबे चौक ते काळोखे पाटील चौक, त्रिवेणीनगर चौक (निगडी) ते तळवडे चौक, डायमंड चौक ते देहू मार्ग, तसेच 14 टाळकरी कमान ते भैरवनाथ चौक, काळोखे पाटील चौक ते देहू मुख्य कमान आणि परंडवाल चौक या मार्गांवरही वाहतूक निर्बंध लागू राहणार आहेत.

Traffic Police
Charholi Bridge Road Issue: रस्त्याचे काम अपूर्ण; तरीही चऱ्होलीचा पूल वाहतुकीस खुला, सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

जुना पालखी मार्ग (केंद पाटील चौक ते झेंडे मळा जकात नाका) हा ‌‘वन-वे‌’ करण्यात येणार असून, झेंडेमळ्याकडून केंद पाटील चौकाकडे प्रवेश बंद राहील. पर्यायी मार्ग म्हणून भक्ती-शक्ती चौक, मोशी फाटा, एच.पी. चौक, संविधान चौक, कृष्णानगर चौक, कुंडवडी सर्कल आदी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Traffic Police
ST NCMC Card Maharashtra: एसटीचे ‘एनसीएमसी’ कार्ड सक्तीचे; वल्लभनगर आगारात नोंदणीला अडथळे

वाहनतळांची विशेष सोय

आळंदी-तळवडे मार्गाने येणाऱ्या वाहनांसाठी माऊली वजनकाटा, काळोखे पाटील चौक व गायरान परिसरात पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. जुना पुणे-मुंबई महामार्गावरील देहू कमान येथून येणाऱ्यांसाठी राधाकृष्ण लॉन्सशेजारील सीओडी जागेत वाहनतळ उपलब्ध राहील. देहू फ ाटा मार्गाने येणाऱ्यांसाठी सप्तपदी लॉन्स, येलवडी शॉपिंग कॉम्प्लेक्स, भिगवडी लॉन्स तसेच साईराज चौक ते देहू फाटादरम्यानच्या मोकळ्या जागांमध्ये पार्किंगची सोय करण्यात आली आहे. संबंधित ठिकाणी पीएमपीएमएल बस पार्किंगचीही व्यवस्था असणार आहे.

Traffic Police
NAFIS Biometric System India: ‘एम्बिस’ला रामराम; राज्यात ‘नॅफिस’ची अंमलबजावणी, गुन्हे तपासाला राष्ट्रीय गती

भाविकांनी सार्वजनिक वाहतुकीला द्यावे प्राधान्य

देहू परिसरात वाढतीवस्ती आणि मर्यादित वाहनतळ लक्षात घेता भाविकांनी शक्यतो सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा. तसेच वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन उपायुक्त पाटील यांनी केले आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्गांचा अवलंब करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news