ST NCMC Card Maharashtra: एसटीचे ‘एनसीएमसी’ कार्ड सक्तीचे; वल्लभनगर आगारात नोंदणीला अडथळे

सवलतींसाठी स्मार्ट कार्ड अनिवार्य; 100 रुपयांचा किमान बॅलन्स बंधनकारक, प्रवाशांची नाराजी
ST
STPudhari
Published on
Updated on

पिंपरी: महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन (एसटी) महामंडळाच्या प्रवाशांना रोख व्यवहारांच्या पलीकडे जाऊन पारदर्शकता आणि सोयीस्कर सेवा देण्याच्या उद्देशाने एस. टी. प्रशासनाने नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (एनसीएमसी) प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, पिंपरी-चिंचवड शहरातील वल्लभनगर आगारातील या कार्डच्या नोंदणीप्रकियेत अडथळे येत असल्याने नोंदणीसाठी नाहक हेलपाटे मारावे लागत आहेत. त्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

ST
NAFIS Biometric System India: ‘एम्बिस’ला रामराम; राज्यात ‘नॅफिस’ची अंमलबजावणी, गुन्हे तपासाला राष्ट्रीय गती

एस.टी महामंडळाच्या सर्व गाडयांमध्ये, महिला सन्मान योजनेअंतर्गत महिलांना तिकीट दरात 50 टक्के सवलत देण्यात आली आहे; तसेच 65 ते 75 वर्षे वयोगटातील 50 टक्के सवलत आणि 75 वर्षांवरील नागरिकांना अमृत जेष्ठ नागरिक योजना अंतर्गत मोफत प्रवास उपलब्ध आहे. दिव्यांगासह विविध घटकांनाही एसटीत तिकीट दरात सवलत देण्यात आलेली आहे. त्यामुळे प्रवाशांचा ओढा एसटीकडे वाढतो. मात्र आता एसटी महामंडळाने नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (एनसीएमसी) प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

ST
Charholi Holi Market: चऱ्होली बाजारपेठेत रंगोत्सवाची धूम; पिचकारी-गनना मोठी मागणी

पिंपरी-चिंचवड शहरातील वल्लभनगर आगारातमध्येही स्मार्ट कार्डची नोंदणी सुरू झाली आहे; मात्र, नोंदणीप्रकियेत विविध समस्या येत असल्यामुळे प्रवाशांना नाहक हेलपाटे मारण्याची वेळ येत आहे. आगाराच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली आहे. तसेच होळीनतंर नोंदणी प्रकिया सुरू होणार आहे.

ST
Pimpri Chinchwad Linear Garden Controversy: लिनियर गार्डनमध्ये झाडांची मोडतोड; जेसीबी कामावरून नागरिकांचा संताप

सवलतीचा लाभ घेण्यासाठी एनसीएमसी कार्ड बंधनकारक:

विद्यार्थी, जेष्ठ, नगारिक तसेच 75 वर्षावरील महिला, दिव्यांग, स्वातंत्र्यसैनिक, त्यासह राज्यस्तरीय पुरस्कार विजेते यांना सवलतीसाठी एमसीएमसी कार्ड बंधनकारक करण्यात आलेले आहे.

एनसीएमसी कार्डमध्ये 100 रुपये बॅलन्स अनिवार्य

एसटी महांमडळाच्या या उपक्रमाचा मुख्य उद्देश सवलतीची अचूक नोंद, पारदर्शक प्रतिपूर्ती, रोख व्यवहार करणे हा आहे. हे कार्ड फक्त ओळखपत्र नसून प्री-पेड वॉलेट म्हणून काम करते. यावर टॅप करुन तिकीट काढता येते. तसेच विद्यार्थ्यांचे कार्ड सरल क्रमाकांशी, ज्येेष्ठ महिलांचे आधार आणि दिव्यागांचे यूडीआयडी क्रमाकांशी लिंक केले आहे. तसेच नवीन कार्डसाठी 199 जुने कार्ड जमा केल्यानतंर 149 या किंमतीत नवीन कार्ड प्राप्त होते. या कार्डमध्ये किमान 100 रुपयांचा बॅलन्स आनिवार्य आहे. 50 रुपयांच्या पटीत रिचार्ज करण्यात येईल.

ST
Pavnathadi Jatra 2026: पवनाथडी जत्रेचा विक्रम; पाच दिवसांत 1.75 कोटींची उलाढाल

येत्या काही दिवसांत कार्ड नोंदणीसंदर्भातील समस्यांचे निराकरण करण्यात येईल.

वैशाली कांबळे, वाहतूक अधीक्षक, वल्लभनगर आगार

एमसीएमसी कार्डचा प्रवाशांना वापरणे सोयीचे ठरणार आहे. तसेच ह्या कार्डमुळे खोटया ओळखपत्राचा वापर थांबण्यात मदत होणार आहे. योग्य लाभार्थी प्रवाशांना त्याचा लाभ मिळण्यास मदत होणार आहे.

अरुण सिया, विभाग नियंत्रक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news