Clubfoot Treatment Success Pimpri Gurav: क्लबफूटवर मात; औंध जिल्हा रुग्णालयात चिमुकल्यांची धावण्याची शर्यत

वेळेवर उपचारांचे यश; कधीकाळी चालण्याची चिंता असलेली मुले आज आत्मविश्वासाने धावताना पाहून पालक भावूक
Clubfoot Treatment Success
Clubfoot Treatment SuccessPudhari
Published on
Updated on

पिंपळे गुरव: आपले मूल कधी चालेल का? या चिंतेत दिवस काढणाऱ्या पालकांसाठी औंध जिल्हा रुग्णालयात भरलेला स्नेहमेळावा आशेचा आणि आनंदाचा क्षण ठरला. जन्मतः पायात वाकडेपणा (क्लबफूट) असलेली मुले आज धावण्याच्या शर्यतीत उत्साहाने सहभागी होताना दिसली आणि उपस्थितांचे मन जिंकून घेतले.

Clubfoot Treatment Success
Kasarwadi Vikasnagar Road Work Delay: कासारवाडी विकासनगर रस्त्याचे काम तीन महिन्यांपासून रखडले; नागरिकांत संताप

25 मुले सहभागी

जिल्हा शीघ हस्तक्षेप केंद्र आणि क्युअर इंडिया संस्थेच्या वतीने सांगवी येथील जिल्हा रुग्णालयात हा आगळावेगळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 2 ते 18 वर्षे वयोगटातील 25 मुलांनी धावणे, सरळ रेषेत चालणे, बेडूक उड्या मारणे अशा खेळांमध्ये आनंदाने भाग घेतला. एकेकाळी उपचारासाठी रुग्णालयात येणारी हीच मुले आज आत्मविश्वासाने धावताना पाहून पालकांचे डोळे आनंदाश्रूंनी भरले.

Clubfoot Treatment Success
Pimpri Chinchwad Municipal Election Results: सत्तेत भाजप कायम; तरीही अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या मतांत 4.78 लाखांची वाढ

वेळेत उपचाराची गरज

या वेळी अस्थिरोग विभागप्रमुख डॉ. अनिल संतपुरे यांनी लवकर निदान आणि सातत्यपूर्ण उपचारांचे महत्त्व सांगितले. क्लबफूट हा जन्मजात आजार असला तरी योग्य वेळी उपचार सुरू केल्यास तो पूर्णपणे बरा होऊ शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले. पालकांचा संयम आणि वैद्यकीय पथकाचे प्रयत्न यामुळेच हे यश शक्य झाले, असेही त्यांनी नमूद केले. कार्यक्रमात डॉ. सुरेखा चावरिया, डॉ. सुचित्रा खेडकर, डॉ. संध्या सिसोदिया, डॉ. अनिल बिराडे, डॉ. अमित बनशेट्टीवार, डॉ. विठ्ठल शिंदे, मनीषा येडसे आणि डॉ. रवींद्र चौधरी यांची उपस्थिती होती. नूतन गायकवाड आणि डॉ. मिनाक्षी हबळे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. सर्व मुलांना भेटवस्तू आणि अल्पोपहार देण्यात आला.

Clubfoot Treatment Success
Maval Rose Export: व्हॅलेंटाईन डेच्या पार्श्वभूमीवर मावळच्या गुलाबांची जागतिक झेप; 70 लाख फुलांची निर्यात

156 मुलांना मिळाले नवे आयुष्य

औंध जिल्हा रुग्णालयातील जिल्हा शीघ हस्तक्षेप केंद्रात आतापर्यंत 156 क्लबफूटग््रास्त मुलांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. पोनसेटी पद्धतीने 5 ते 6 आठवड्यांचे कास्टिंग, त्यानंतर विशेष फूट अबडक्शन शूज आणि पालकांना समुपदेशन या सर्व सेवा येथे पूर्णपणे मोफत दिल्या जातात. सुरुवातीला आम्ही खचून गेलो होतो. पण आज डॉक्टरांच्या मार्गदर्शनामुळे आमचे मूल धावताना पाहून आमचा आनंद शब्दांत सांगता येत नाही, अशा भावना साक्षी विधाते आणि सुनिता वाले या पालकांनी व्यक्त केल्या.

Clubfoot Treatment Success
Dehuroad Cantonment Toilet Issue: देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे फायबर शौचालये आठ वर्षांपासून बंद; लाखो रुपयांचा अपव्यय

क्लबफूट हा बाळाच्या जन्मानंतर दिसणारा पायाचा विकार आहे. हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो. बाळ जन्माला आल्यानंतर दुसऱ्या दिवसापासूनच उपचार सुरू केले जातात. दर आठ दिवसांनी एक असे सहा ते आठ प्लास्टर करून पाय सरळ केला जातो. यानंतर बाळाला विशेष शूज दिले जातात. बाळ वाढत असताना शूजची साईज बदलत राहते. हा संपूर्ण उपचार पाच वर्षांपर्यंत विनामूल्य दिला जातो. वेळेवर उपचार केल्यास मुलाला भविष्यात अपंगत्व येत नाही आणि ते इतर मुलांप्रमाणे सामान्यपणे चालू धावू शकते.

डॉ. नागनाथ यमपल्ले, जिल्हा शल्य चिकित्सक, औंध जिल्हा रुग्णालय

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news