Dehuroad Cantonment Toilet Issue: देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे फायबर शौचालये आठ वर्षांपासून बंद; लाखो रुपयांचा अपव्यय

देखभालअभावी साहित्याची झीज; जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई व तातडीने शौचालये सुरू करण्याची मागणी
Dehuroad Cantonment Toilet
Dehuroad Cantonment ToiletPudhari
Published on
Updated on

देहूरोड: देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाने मुख्य बाजारपेठेजवळील अबूशेठ रोड परिसरात नागरिकांच्या सोयीसाठी 2018 साली लाखो रुपयांचा खर्च करून फायबर टॉयलेट्‌‍स बसवले होते. मात्र, या टॉयलेट्‌‍स मागील आठ वर्षांपासून आजपर्यंत एकदाही वापरासाठी खुल्या करण्यात आलेले नाहीत. ही सुविधा जनतेसाठी उपलब्ध न केल्याने सार्वजनिक निधीचा गैरवापर, प्रशासनाची निष्क्रियता आणि नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते व स्थानिक नागरिकांनी केला आहे.

Dehuroad Cantonment Toilet
Pimpri Railway Station Women Facilities: पिंपरी रेल्वे स्थानकात महिलांची मोठी गैरसोय; स्वच्छतागृह बंद, सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

देखभाल नसल्याने साहित्याची झीज

मागील आठ वर्षांपासून फायबर टॉयलेट्‌‍स बंद अवस्थेत असल्याने त्यांची कोणतीही नियमित देखभाल करण्यात आलेली नाही. परिणामी, या सार्वजनिक सुविधेच्या साहित्याची मोठ्या प्रमाणावर झीज झाल्याचे स्पष्टपणे दिसून येते.

Dehuroad Cantonment Toilet
Pimpri Property Tax Collection: पिंपरी-चिंचवडमध्ये 715 कोटींचा मालमत्ताकर जमा; 2 लाखांहून अधिक मिळकती थकबाकीत

टॉयलेट्‌‍सचे दरवाजे गंजलेले आहेत, कुलपे खराब झाली आहेत, फायबर संरचनेवर तडे पडले आहेत, पाण्याच्या टाक्या व फिटिंग्ज मोडकळीस आल्या आहेत. तसेच, आतील भागात धूळ, कचरा व कीटकांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे.देखभालीअभावी लाखो रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान होत असून, भविष्यात दुरुस्तीसाठी पुन्हा मोठा खर्च येण्याची शक्यता आहे.

नागरिकांच्या करातून खरेदी करण्यात आलेली ही सुविधा वेळेवर वापरात आणली असती तर, आज ही अवस्था ओढवली नसती, असा आरोप सामाजिक कार्यकर्ते मलीक शेख यांनी केला आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सार्वजनिक मालमत्ता वाया जात असल्याने ही बाब आर्थिक अपव्यय असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

Dehuroad Cantonment Toilet
Matrimonial Fraud Scam: लग्नाच्या आमिषाने सायबर फसवणूक; पिंपरीतील तरुणाचे 90 लाख लंपास

संबंधितांवर कारवाईची मागणी

आठ वर्षांपासून सार्वजनिक टॉयलेट्‌‍स बंद ठेवण्यास जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कठोर कारवाई करावी. तसेच, लवकरात लवकर हे टॉयलेट्‌‍स सुरू करावेत, अशी मागणी नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि व्यापारी संघटनांकडून केली जात आहे.

एकीकडे सरकार स्मार्ट सिटी योजना आणि स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून स्वच्छता, सार्वजनिक सुविधा आणि नागरिकांच्या आरोग्यावर भर देत असल्याचे सांगते. मात्र, प्रत्यक्षात देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत लाखो रुपये खर्चून उभारलेली टॉयलेट्‌‍स तब्बल आठ वर्षांपासून बंद अवस्थेत पडून आहेत. ही बाब सरकारी योजनांच्या अंमलबजावणीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करते.

रमेश जाधव, सामाजिक कार्यकर्ते

Dehuroad Cantonment Toilet
Pune Metro Line 3 Women Pilots: हिंजवडी–शिवाजीनगर मेट्रो महिलांच्या हाती; ‘पिंक लाईन’वर महिला ट्रेन पायलट

स्मार्ट सुविधा देण्याचे आश्वासन देणाऱ्या प्रशासनाकडून आधीच उपलब्ध असलेल्या मूलभूत सुविधांची देखभालही होत नाही, त्यामुळे स्मार्ट कारभार ही केवळ कागदोपत्री बाब ठरत आहे.

पंकज तंतरपाळे, सामाजिक कार्यकर्ते

संबंधित शौचालयाचे सेफ्टी टॅंक छोटे आहेत. त्यामुळे ते लवकर भरत असल्याने मैला साठतो. तसेच, अनेक समस्या निर्माण होत असल्यामुळे हे फायबर शौचालय बंद ठेवले आहेत.

किरण गोंटे, आरोग्य निरीक्षक, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news