Pimpri Chinchwad Crime: चिंचवड बसथांब्यावर तरुणीसमोर अश्लील कृत्य; परिसरात खळबळ

एम्पायर इस्टेट बीआरटी थांब्यावर घडलेल्या प्रकारामुळे परिसरात खळबळ; पोलिसांकडून तपास सुरू
Assault
AssaultPudhari
Published on
Updated on

पिंपरी: चिंचवडमधील मदर तेरेसा उड्डाणपुलावरील एम्पायर इस्टेट बीआरटी बसथांब्यावर कंपनीच्या बसची वाट पाहत उभ्या असलेल्या 24 वर्षीय तरुणीसमोर एका अनोळखी व्यक्तीने अश्लील कृत्य केले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, संबंधित तरुणीने चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

Assault
Pimpri Chinchwad Traffic Problem: पिंपरी-चिंचवडमध्ये वाहतूक कोंडीचा कहर; खोदकाम व अतिक्रमणामुळे नागरिक हैराण

ही घटना बुधवारी (दि. 21) सकाळी साडेसातच्या सुमारास घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणी सकाळी कामावर जाण्यासाठी घरातून निघाली होती. तिने एम्पायर इस्टेट परिसरात आपली दुचाकी पार्क केली आणि कंपनीच्या बसची वाट पाहण्यासाठी बीआरटी बसथांब्यावर जाऊन थांबली.

Assault
Talegaon Gas Pipeline Project: तळेगाव दाभाडे येथे गॅस पाईपलाईन कामामुळे खोदकाम; रस्ते पुन्हा उकरल्याने नागरिक नाराज

सुरुवातीला बसथांब्यावर कोणीही नसल्याने ती एकटीच उभी होती. काही वेळाने एक अनोळखी व्यक्ती तेथे आला आणि तिच्यासमोर तिरप्या बाकावर बसला. संबंधित व्यक्ती वारंवार तरुणीकडे पाहत सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन करू लागला. हा प्रकार लक्षात येताच तरुणी घाबरली.

Assault
Pimpri Divyang Library Smart System: दिव्यांग भवन ग्रंथालयात स्मार्ट सॉफ्टवेअर; पुस्तके शोधणे झाले अधिक सोपे

मात्र, धाडस दाखवत तिने त्या व्यक्तीला जाब विचारला. त्याचवेळी तिने संपूर्ण प्रकार मोबाईलमध्ये रेकॉर्ड करण्यास सुरुवात केली. आपले चित्रीकरण होत असल्याचे लक्षात येताच संबंधित व्यक्ती तेथून पसार झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

Assault
Pimpri Vegetable Market Rates: पिंपरी भाजी मंडईत दर स्थिर; बिन्स तेजीत तर मेथी-कोथिंबीर स्वस्त

या घटनेनंतर तरुणीने पोलिसांकडे धाव घेत फिर्याद दिली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात भारतीय न्याय संहिता तसेच संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. चिंचवड पोलिस तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news