

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या दिव्यांग भवनातील ग््रांथालयात अत्याधुनिक सॉफ्टवेअर प्रणाली सुरू करण्यात आली असून, त्यामुळे दिव्यांग बांधवांना पुस्तके शोधणे अधिक सोपे आणि सुलभ झाले आहे. विशेषतः दृष्टीहिन, शारीरिकदृष्ट्या दिव्यांग तसेच हातांचा वापर मर्यादित असलेल्या व्यक्तींना या सुविधेचा मोठा फायदा होत आहे.
या नव्या तंत्रज्ञानामुळे ग््रांथालयातील सेवा अधिक आधुनिक आणि सर्वसमावेशक बनली आहे. ग््रांथालयात सुरू करण्यात आलेल्या या सॉफ्टवेअरमध्ये ऑडिओ कमांड सुविधा देण्यात आली आहे. वापरकर्त्याने आवाजाद्वारे पुस्तकाचे नाव सांगितल्यानंतर संबंधित पुस्तक कोणत्या रॅकमध्ये ठेवले आहे, याची माहिती संगणकाद्वारे त्वरित मिळते. त्यामुळे पुस्तके शोधण्यासाठी इतरांवर अवलंबून राहण्याची गरज कमी झाली आहे. याशिवाय, पुस्तकाबाबतची थोडक्यात माहितीही या प्रणालीद्वारे उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे वाचकांना पुस्तक निवडणे अधिक सोयीचे ठरत आहे. विशेषतः दृष्टीहिन, दिव्यांगांसाठी ही सुविधा उपयुक्त ठरत असून, त्यांना स्वयंपूर्णपणे ग््रांथालयाचा वापर करता येत आहे.
रॅकमधील पुस्तके शोधणे झाले सोपे
पूर्वी ग््रांथालयात पुस्तक शोधण्यासाठी कर्मचार्यांची मदत घ्यावी लागत होती. मात्र, आता सॉफ्टवेअरच्या मदतीने पुस्तक कोणत्या विभागात आणि कोणत्या रॅकमध्ये ठेवले आहे, हे काही क्षणांत समजत आहे. त्यामुळे वेळेची बचत होत असून, वाचकांचा आत्मविश्वासही वाढत आहे. ग््रांथालयातील कर्मचार्यांनाही या प्रणालीचा मोठा फायदा होत आहे. पुस्तक व्यवस्थापन, शोध प्रक्रिया आणि माहिती देणे या कामांमध्ये सुलभता आल्याने कामाचा ताण कमी झाला आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे ग््रांथालयाचे कामकाज अधिक गतिमान झाले असल्याचे कर्मचार्यांनी सांगितले.
दोन हजारांहून अधिक पुस्तकांचा खजिना
दिव्यांग भवनातील या ग््रांथालयात दोन हजारांहून अधिक पुस्तके उपलब्ध आहेत. विविध स्पर्धा परीक्षा, शैक्षणिक अभ्यासक्रम, साहित्य, आत्मचरित्रे तसेच प्रेरणादायी पुस्तकांचा यात समावेश आहे. दररोज सुमारे चाळीस ते पन्नास दिव्यांग बांधव या ग््रांथालयाला भेट देत असून, नव्या सॉफ्टवेअरमुळे त्यांच्या अभ्यासात आणि वाचनात अधिक सुलभता निर्माण झाली आहे. बेल लिपीमधील हजाराहून अधिक पुस्तके उपलब्ध आहेत.
दिव्यांगांसाठी आधुनिक सुविधा
महापालिकेकडून दिव्यांगांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून हे स्मार्ट सॉफ्टवेअर सुरू करण्यात आले आहे. भविष्यात आणखी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून दिव्यांगांसाठी वाचन संस्कृती अधिक सक्षम करण्याचा मानस प्रशासनाने व्यक्त केला आहे.
नव्या सॉफ्टवेअरमुळे पुस्तके शोधणे आता सोपी झाले आहे. आमच्यासह दिव्यांगांनादेखील याचा लाभ होत आहे. मशीन हाताळणीसाठी प्रशिक्षण दिले जाणार आहे. वाचनाची आवड जोपासता येणार आहे.
अश्विनी चिकटे, ग््रांथपाल