Talegaon Gas Pipeline Project: तळेगाव दाभाडे येथे गॅस पाईपलाईन कामामुळे खोदकाम; रस्ते पुन्हा उकरल्याने नागरिक नाराज

पाण्याच्या पाईपलाईन फुटल्याने पुरवठा विस्कळीत; नियोजनशून्य विकासावर नागरिकांचा विरोध
Talegaon Gas Pipeline Project
Talegaon Gas Pipeline ProjectPudhari
Published on
Updated on

तळेगाव दाभाडे: सुमारे दोन वर्षांपूर्वी प्रशासकीय काळात मंजूर झालेले गॅस पाईपलाईनचे काम सध्या लिंब फाटा ते जिजामाता चौक येथे सुरू आहे. या कामाला दबक्या आवाजात विरोध होत असला तरी एम.एन.जी.एल. या गव्हर्नमेंट कंपनीतर्फे युद्ध पातळीवर हे काम सुरू आहे.

Talegaon Gas Pipeline Project
Pimpri Divyang Library Smart System: दिव्यांग भवन ग्रंथालयात स्मार्ट सॉफ्टवेअर; पुस्तके शोधणे झाले अधिक सोपे

प्राप्त माहितीनुसार, दोन वर्षांपूर्वीच या कामाला नगरपालिका प्रशासनाकडून मंजुरी मिळाली होती. त्यानुसार जिजामाता चौक ते खांडगे पेट्रोल पंप हे काम पहिल्या टप्प्यात पूर्ण झाले असून, लिंब फाटा ते जिजामाता चौक हे काम सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच या रस्त्यालगत पाण्याच्या पाईपलाईनचे काम करण्यात आले होते.

Talegaon Gas Pipeline Project
Pimpri Vegetable Market Rates: पिंपरी भाजी मंडईत दर स्थिर; बिन्स तेजीत तर मेथी-कोथिंबीर स्वस्त

त्यावेळी मोठ्या प्रमाणात खोदकाम झाले होते व आता गॅस पाईपलाईनसाठी पुन्हा त्याच ठिकाणी खोदकाम करण्यात येत आहे. या खोदकामामुळे पाण्याच्या पाईपलाईन फुटून मस्करनेस कॉलनी एक येथे चार ते पाच दिवस तसेच राव कॉलनी, तुकारामनगर येथे प्रत्येकी एक दिवस पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. स्थानिक नगरसेवक सागर बोडके यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित राहून पाण्याच्या पाईपलाईनचे काम करून पाणीपुरवठा सुरळीत केला.

Talegaon Gas Pipeline Project
Pawana Water Pipeline Project: पवना जलवाहिनी प्रकल्प 15 वर्षांपासून रखडलेला; खर्च 400 कोटींवरून 1700 कोटींवर

नियोजनशून्य विकासाला नागरिकांचा विरोध

अत्यंत वर्दळीच्या या रस्त्यावर खोदकामामुळे वाहतूक कोंडी होत आहे. तसेच गॅस पाईपलाईनचे काम संपूर्ण तळेगाव दाभाडे शहरात होणार असल्याने नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. गेली अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्याची कामे अलीकडच्या काळात पूर्ण झाली आहेत व गॅस पाईपलाईनसाठी पुन्हा रस्ता खोदावा लागणार असल्याने स्थानिक नागरिकांचा या कामास विरोध होत आहे. तसेच विकास व्हावा ही आमचीही इच्छा आहे. विकासकामांना आमचा विरोध नाही. परंतु विकासकामे करत असताना क्रम लक्षात घेणे गरजेचे आहे. वारंवार पाठपुरावा करून तयार झालेले रस्ते वर्षाच्या आत गॅस पाईपलाईन, पाणी पाईपलाईन तसेच ड्रेनेजलाईन याकरिता खोदले जातात यामध्ये आमच्यासारख्या करदात्यांचा पैसा वापरला जातो. त्यामुळे असा विकास आम्हाला नकोय. शहराचा विकास करताना लाईट, पाणी, रस्ते, ड्रेनेजलाईन याचे योग्य नियोजन व्हावे, अशी अपेक्षा नागरिकांनी बोलून दाखवली.

Talegaon Gas Pipeline Project
Pune Metro Solar Engery Project: हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पात सौरऊर्जा वापर; दरवर्षी 20 कोटींची बचत

दोन वर्षांपूर्वी मंजूर झालेले काम सध्या तळेगाव दाभाडे शहरात सुरू आहे. या कामादरम्यान पाण्याच्या लाईन किंवा रस्त्याचे होणारे नुकसान हे संबंधित गॅस पाईपलाईनचे काम करणाऱ्या कंपनीमार्फत भरून दिले जात आहे. पावसाळ्यापूर्वी लिंब फाटा ते जिजामाता चौक हे काम पूर्ण होईल. उर्वरित कामासाठी पावसाळा संपेपर्यंत थांबावे लागणार आहे. तसेच ज्या भागातील रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत अशा भागात खोदकामाला परवानगी दिली जाणार नाही. आगामी काळात लिंब फाटा ते स्टेशन चौक व मंत्रा सिटी रस्त्याच्या संदर्भात कॉमन डिझाईन पास करून त्याद्वारे काम केले जाईल.

गिरीश दापकेकर, मुख्याधिकारी, तळेगाव

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news