Pawna Dam Water Storage: लोणावळ्यात पावसाचा जोर वाढला! पवना धरण 86% भरले; मागील वर्षाची सरासरीही पार

24 तासांत लोणावळ्यात 138 मिमी पावसाची नोंद; मावळातील धरणे वेगाने भरत असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन
Pawna Dam
Pawna DamPudhari
Published on
Updated on

लोणावळा: लोणावळा शहर व मावळ तालुक्यामध्ये पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. 21 जुलै रोजी 24 तासात पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये 54 मिमी पाऊस झाला असून धरणामध्ये आज अखेरपर्यंत 86% पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. लोणावळा शहरात देखील मागील 24 तासात 138 मिमी पावसाची नोंद झाली आहे. पावसाने मागील वर्षाची सरासरी ओलांडली आहे.

Pawna Dam
Mulshi Dam Water Discharge: मुळशी धरण ८१ टक्के भरले; मुळा नदीत १००० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू

विशेष म्हणजे 2025 या वर्षामध्ये मे महिन्यापासून पावसाला सुरुवात झाली होती. यावर्षी अवघ्या जुलै महिन्यात 21 दिवसात पावसाने मागील वर्षाची ही सरासरी ओलांडली आहे. सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर पुढील काही दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पवना धरणाने यावर्षी उन्हाळ्यामध्ये तळ गाठला होता पावसाळा सुरू होण्यापूर्वी अगदी जून महिन्याच्या अखेरपर्यंत धरणामध्ये केवळ 17 टक्के पाणीसाठा शिल्लक होता. त्यामध्ये मागील महिनाभरात 69 टक्क्याने वाढ झाली आहे.

Pawna Dam
Vallabhnagar NCMC Card Registration: वल्लभनगर एसटी आगारात एनसीएमसी कार्डसाठी तुफान गर्दी; ज्येष्ठ नागरिक, महिलांचे पाच-पाच तास हाल

जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये व मागील दोन-तीन दिवसापासून लोणावळा शहर व मावळ तालुक्याच्या घाटमाथ्यावर सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे मावळ तालुक्यातील बहुतांश धरणे ही तुडुंब भरली आहेत. पावसाचा जोर कायम राहिल्यास धरणांमधून पाण्याचा विसर्ग पाटबंधारे विभागाकडून केला जाऊ शकतो त्यामुळे नागरिकांनी सतर्क रहावे व काळजी घ्यावी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news