Pimpri Chinchwad Water Supply: बिजलीनगर सबस्टेशनच्या स्फोटाचा पाणीपुरवठ्यालाही फटका; पिंपरी-चिंचवडकरांची दुहेरी कोंडी

रावेत जलउपसा केंद्राचा वीजपुरवठा खंडित; वल्लभनगरसह शहरातील भागांत पाणी उशिराने, कमी दाबाने येण्याची शक्यता
Water Supply
Water SupplyPudhari
Published on
Updated on

पिंपळे गुरव: बिजलीनगर येथील महावितरणच्या सबस्टेशनमध्ये मोठा स्फोट झाल्याने पिंपरी चिंचवड शहरातील बहुतांश भागातील वीजपुरवठा खंडित झाला. शिवाय रावेत येथील जल उपसा केंद्रावरील वीजपुरवठा देखील खंडित झाल्याने दुपारपासूनच शहरातील विविध भागांत पाणीपुरवठा विस्‍कळीत झाल्याने नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

Water Supply
Pimpri Vegetable Market Rates: पिंपरी भाजी मंडईत लसूण-आल्याचे दर कडाडले; चायना लसूण २८० रुपये किलो

बिजलीनगर येथील घटनेचा थेट फटका पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा यंत्रणेलाही बसला असून, वल्लभनगर परिसरातील नियमित पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे नागरिकांना पाणी उशिराने आणि कमी दाबाने मिळण्याची शक्यता आहे. EHV रहाटणी आणि चिंचवड स्टेशन येथे तांत्रिक बिघाड झाल्याने रावेत येथील पंप हाऊस सेक्टर २३ जलशुद्धीकरण केंद्र तसेच काही महत्त्वाच्या पंप हाऊसचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. परिणामी महापालिकेची पंपिंग यंत्रणा ठप्प झाली असून, पाणी उपशावर परिणाम झाला आहे.

Water Supply
Chinchwad Power Outage: चिंचवड सबस्टेशनमध्ये स्फोट; पिंपरी-चिंचवडसह पुण्यातील ३.१० लाख ग्राहक अंधारात

वल्लभनगर परिसरात दररोज साधारणपणे सायंकाळी पाच वाजता पाणीपुरवठा केला जातो. मात्र, वीजपुरवठा खंडित झाल्याने आजच्या पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडले आहे. वीजपुरवठा पूर्ववत झाल्यानंतर पंपिंग सुरू करण्यात येईल. त्यामुळे पाणीपुरवठा उशिराने होण्याबरोबरच कमी दाबाने पाणी येण्याची शक्यता आहे. एकीकडे सबस्टेशनमधील स्फोटामुळे वीजपुरवठा विस्कळीत झाला तर दुसरीकडे त्याचा परिणाम पाणीपुरवठ्यावर झाल्याने नागरिकांची दुहेरी कोंडी झाली आहे. पाणीपुरवठ्याच्या वेळेवर अवलंबून असलेल्या नागरिकांना या अचानक निर्माण झालेल्या परिस्थितीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

Water Supply
PCMC Live Streaming: पिंपरी-चिंचवड महापालिका सभेचे लाईव्ह प्रक्षेपण पुन्हा सुरू; पारदर्शक कारभाराला मिळणार बळ

वीज यंत्रणा दुरुस्त करून पुरवठा सुरळीत झाल्यानंतर पाणी उपसा पूर्ववत करण्यात येणार आहे. तोपर्यंत नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन महापालिकेच्‍या वतीने करण्यात आले आहे. महावितरणचा तांत्रिक बिघाड आणि त्याचा पाणीपुरवठ्यावर झालेला परिणाम लक्षात घेता दोन्ही यंत्रणांनी समन्वयाने युद्धपातळीवर काम करून वीज व पाणीपुरवठा तातडीने सुरळीत करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Water Supply
Hinjewadi Traffic Master Plan: हिंजवडीची वाहतूक कोंडी सुटणार? पीएमआरडीएचा २,१८२ कोटींचा मास्टर प्लान

बिजलीनगर येथे सबस्टेशनला आग लागल्यामुळे रावेत येथील वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे काही काळ पाणीपुरवठा बंद होता. आता पाणीपुरवठा पुन्हा सुरू करण्यात आला आहे. मात्र, यंत्रणा पूर्ववत करण्यासाठी काही वेळ लागणार असल्याने आज आणि उद्या पाणीपुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी सहकार्य करावे.

महेश बरीदे, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग, पिंपरी-चिंचवड

logo
Pudhari News
pudhari.news