Kasarwadi Garbage Problem: कासारवाडीत कचऱ्यामुळे नागरिक हैराण; दुर्गंधी, अपघात आणि वाहतूक कोंडी

कचरा वाहनांची रस्त्यावर उभी राहणे, सांडपाणी आणि अस्वच्छतेमुळे आरोग्याचा धोका; कारवाईची मागणी
Kasarwadi Garbage Problem
Kasarwadi Garbage ProblemPudhari
Published on
Updated on

पिंपळे गुरव: पिंपरी-चिंचवड शहरातील महत्त्वाचे उपनगर आणि दळणवळणाचे केंद्र असलेल्या कासारवाडी परिसरात स्वच्छतेच्या समस्येने गंभीर स्वरूप धारण केले असून, याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर आणि दैनंदिन जीवनावर होत आहे. कचरा संकलन केंद्राजवळील परिस्थितीमुळे दुर्गंधी अस्वच्छता आणि वाहतुकीतील अडथळे वाढले आहेत.

Kasarwadi Garbage Problem
Unseasonal Rain Impact Cold Drink Business: नवलेख उंबरेत थंड पेय व्यवसाय कोलमडला; अवकाळी पावसाचा फटका

अपघाताचा धोका

येथील कचरा वाहतूक करणारे डंपर आणि घंटागाड्या अनेकदा केंद्राच्या आवाराबाहेरच उभ्या राहत असल्याने रस्त्यावर गर्दी होते. काही वाहनांतून ओला कचरा आणि सांडपाणी (लीचेट) रस्त्यावर सांडत असल्याने रस्ते अत्यंत निसरडे झाले आहेत. परिणामी दुचाकीस्वारांचे घसरून अपघात होण्याचे प्रमाण वाढल्याची नागरिकांची तक्रार आहे.

दुर्गंधीने नागरिक त्रस्त

कासारवाडी रेल्वे स्थानक परिसरातून दररोज हजारो प्रवासी ये-जा करतात. मात्र, परिसरात पसरलेल्या दुर्गंधीमुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत असून, अनेकांना नाकाला रुमाल लावूनच प्रवास करावा लागत आहे. याशिवाय साचलेल्या कचरा आणि सांडपाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढून साथीचे आजार पसरण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.

Kasarwadi Garbage Problem
Maval ZP Committee Chairperson: मावळला जिल्हा परिषद सभापतीपदाचा मान; दीपाली हुलावळे यांची निवड

संबंधितांवर कारवाईची मागणी

वाहतुकीच्यादृष्टीनेही परिस्थिती चिंताजनक बनली आहे. कचरा केंद्राच्या आत जागा उपलब्ध असतानाही काही वाहनचालक डंपर रस्त्यावरच उभे करतात. त्यामुळे आधीच वर्दळीच्या रस्त्यावर वाहतुकीचा वेग मंदावून दररोज कोंडी निर्माण होत आहे. स्थानिक नागरिकांनी या समस्येकडे गांभीर्याने लक्ष वेधत तातडीच्या उपाययोजनांची मागणी केली आहे. कचरा वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनांचे पार्किंग संकलन केंद्राच्या आवारातच करणे, रस्त्यांची नियमित स्वच्छता राखणे आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणे या प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.

Kasarwadi Garbage Problem
Bhama Askhed Project Controversy: भामा-आसखेड योजनेवरून वाद; बडतर्फ ठेकेदारालाच पुन्हा काम देण्याचा प्रयत्न

रस्त्यावर सांडणाऱ्या घाण पाण्यामुळे वाहन चालवणे धोकादायक झाले आहे. प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून वाहनांचे पार्किंग केंद्राच्या आतच बंधनकारक करावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. स्वच्छतेत मानांकन मिळवणाऱ्या महापालिकेसाठी कासारवाडीतील ही परिस्थिती निश्चितच चिंतेची बाब मानली जात आहे. परिसरातील स्वच्छता, सुरक्षितता आणि नागरिकांचे आरोग्य यासाठी प्रशासनाने त्वरित आणि प्रभावी पावले उचलण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Kasarwadi Garbage Problem
PCMC RTO Environment Tax: पिंपरी-चिंचवडमध्ये आरटीओची धडक मोहीम; पर्यावरण कर न भरल्यास कडक कारवाई

कचरा संकलनासाठी वापरण्यात येणारे डंपर संबंधित कचरा संकलन केंद्राच्या आवारातच उभे करणे आवश्यक आहे. याबाबत संबंधित कंपनीला यापूर्वी अनेक वेळा सूचना देण्यात आलेल्या आहेत. तथापि काही वेळा कंपनीकडून वाहने नादुरुस्त असल्याचे किंवा इतर कारणे सांगून या सूचनांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येते.

सचिन जाधव, आरोग्य निरीक्षक, क्षेत्रीय कार्यालय, महापालिका

कचरा संकलन केंद्रात डंपर वाहनांच्या पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. मात्र, सध्या उपलब्ध जागा अपुरी पडत आहे. अधिकाधिक डंपर वाहने केंद्राच्या आत उभी राहू शकतील यासाठी महापालिकेशी पत्रव्यवहार सुरू आहे. आवश्यक ती जागा उपलब्ध झाल्यानंतर रस्त्यावर कचरा वाहने उभी राहणार नाहीत.

अंकुश वाळके, प्रोजेक्ट मॅनेजर, ए जी एनवायरो कंपनी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news