Pimpri Chinchwad tender fraud: फसवणूक करणाऱ्या पालिका कर्मचाऱ्यांचे निलंबन

सेवानिलंबन करून विभागीय चौकशी करण्याचे आदेश आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत.
PCMC
PCMCPudhari
Published on
Updated on

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उद्यान विभागामध्ये निविदा (टेंडर) मिळवून देण्याच्या बहाण्याने आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी उद्यान विभागातील मजूर असलेल्या अभिजित संतोष गायकवाड याला अटक करण्यात आली होती. त्याचे सेवानिलंबन करून विभागीय चौकशी करण्याचे आदेश आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत.

विभागीय चौकशीचे आदेश

उद्यान विभागातील मजूर असलेल्या अभिजित गायकवाड याने भोसरी येथील एका व्यक्तीला उद्यान विभागात टेंडर मिळवून देण्याचे आमिष दिले. त्यासाठी आर्थिक देवाण-घेवाण केली. पैसे दिल्यानंतरदेखील टेंडर मिळाले नसल्याने संबंधित व्यक्तीने भोसरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

PCMC
Smart Parking System: कोंडीमुक्त करण्यासाठी नवीन पार्किंग पॉलिसी; स्थायी समितीचे अध्यक्षा अभिषेक बारणे यांची माहिती

त्यानंतर पोलिसांनी गायकवाडला अटक केली. त्याला तीन दिवस पोलिस कोठडी देण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती.

महापालिका कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल झाल्याने सामान्य प्रशासन विभागाने महापालिका अधिनियमांचा भंग केला असल्याचा ठपका गायकवाड याच्यावर ठेवला आहे. त्याचे सेवानिलंबन केले असून, विभागीय चौकशी सुरू करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.

महिला सफाई कर्मचारी 571 दिवस गैरहजर

महापालिकेच्या ड क्षेत्रीय कार्यालयातील सफाई कर्मचारी राणी राहुल कांबळे या कोणतीही पूर्वकल्पना न देता त्या 8 मार्च 2024 ते 29 सप्टेंबर 2025 या कालावधीत तब्बल 571 दिवस गैरहजर राहिल्या आहेत. त्या विनापरवाना गैरहजर राहिल्याचे क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी सामान्य प्रशासन विभागाच्या निदर्शनास आणून दिले आहे.

त्यांना कारणे दाखवा नोटीस दिली असता त्यांनी त्याचाही खुलासा केला नाही. त्यानुसार त्यांना महापालिका सेवेत राहण्याची आवश्यकता भासत नसल्याचा निष्कर्ष प्रशासनाने काढला आहे. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1979 च्या नियम 8 नुसार विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे.

सफाई कर्मचारी 1 हजार 246 दिवस गायब

पालिकेत अनुकंपा वारस तत्वावर काम करत असलेला चेतन एकनाथ गोरगेल हा सफाई कर्मचारी तब्बल 1 हजार 246 दिवस विनापरवाना गैरहजर आहे. वेळेवेळी संधी देऊनही त्याच्या वर्तनात कोणतीही सुधारणा झालेली नाही. त्यानुसार ड क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी त्याची विभागीय चौकशीची शिफारस केली आहे. त्यानुसार आयुक्तांनी त्या सफाई कर्मचाऱ्याची विभागीय चौकशी लावली आहे.

PCMC
Pimpri Rain: पहिल्याच पावसात दाणादाण; अवघ्या तासाभरात शहर जलमय

तुरुंगाची हवा खाल्ल्याची बाब लपवून ठेवणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई

खुनाच्या आरोपात न्यायालयाने आजीवन कारावासाची शिक्षा सुनावलेल्या महापालिकेच्या अ क्षेत्रीय कार्यालयातील आरोग्य विभागाचा वाहनचालक अनिल लक्ष्मण सपकाळ याला सेवेतून कमी करण्यात आले आहे. त्याच्यावर निगडी पोलिस ठाण्यात 13 डिसेंबर 2014 ला गुन्हा दाखल होऊन अटक झाली होती.

दुसऱ्या प्रकरणात पालिकेच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्या फुगेवाडी शाळेत शिपाई असलेला जितेंद्र मधुकर मोरे याच्यावर सासवड पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, मोरे याने आजारी असल्याचे तसेच, चुलते वारल्याचे चुकीचे कारण दिले. त्याची विभागीय चौकशी सुरू केली आहे.

गुन्हा दाखल केल्याची बाब ठेवली लपवून

तिसऱ्या प्रकरणात उद्यान विभागातील उद्यान सहाय्यक भरत रामभाऊ पारखी याच्यावर बावधन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. ब क्षेत्रीय कार्यालयात सफाई कर्मचारी माणिक गणपत राऊत याच्यावर वालचंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. अ क्षेत्रीय कार्यालयाच्या आरोग्य विभागातील सफाई कर्मचारी अलका सोनबा राऊत याच्यावर पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानी ती माहिती महापालिकेपासून लपवून ठेवली. त्यामुळे त्याची विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news