पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजले; १ फेब्रुवारीला प्रारूप आराखडा प्रसिद्ध होणार

पिंपरी-चिंचवड महापालिका
पिंपरी-चिंचवड महापालिका
Published on
Updated on

पिंपरी, पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठीचा प्रारुप प्रभाग रचनेचा आराखडा 1 फेब्रुवारी 2022 रोजी प्रसिद्ध होणार आहे. त्यावर 1 ते 14 फेब्रुवारी दरम्यान हरकती सूचना मागविल्या जाणार आहेत. प्राप्त हरकती 16 फेब्रुवारी रोजी आयोगाला सादर कराव्या लागणार आहेत. 26 फेब्रुवारी रोजी या हरकतीवर सुनावणी घेण्यात येईल. सुनावणीनंतर प्राधिकृत अधिकाऱ्यांनी केलेल्या शिफारसी 2 मार्च 2022 रोजी निवडणूक आयोगाला पाठवावे लागणार आहे. आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी हा कार्यक्रम महापालिकेला पाठविला आहे. त्यामुळे पालिका निवडणुकीचे बिगुल वाजले आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक तीनसदस्यीय पद्धतीने होणार आहे. महापालिका प्रशासनाने प्रारुप प्रभाग रचनेचा कागदोपत्री प्रस्ताव 13 जानेवारी 2022 रोजी आयोगाला सादर केला होता. सदस्यसंख्या व आरक्षणाची परिगणना, हद्दींची व्याप्ती व वर्णनाबाबत, निवडणूक प्रभागांमध्ये समाविष्ट प्रगणक गट व लोकसंख्या, प्रगणक गटनिहाय माहिती, अनुसूचित जातीचा प्रभागनिहाय उतरता क्रम, अनुसूचित जमातीचा प्रभागनिहाय उतरता क्रम, सदस्य संख्या व आरक्षणाचे एकत्रित विवरणपत्र, प्रगणक गटाचे विभाजन करताना द्यावयाचे प्रमाणपत्र, समितीने प्रारुप प्रभाग रचनेबाबत द्यावयाचे प्रमाणपत्र अशी सविस्तर कागदोपत्री माहितीचा प्रस्ताव पाठविला होता.

महापालिका निवडणुकीसाठी प्रभागरचना व आरक्षण सोडत एकाचदिवशी जाहीर केली जाते. परंतु, ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीची प्रक्रिया थंडावली होती. ओबीसींच्या आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचना अगोदर जाहीर करण्याचा निर्णय घेतला असून आरक्षण सोडत नंतर काढली जाणार आहे. 1 फेब्रुवारी रोजी प्रारूप आराखडा प्रसिध्द होणार आहे.

आराखडा प्रसिद्धीचा कार्यक्रम!

निवडणूक प्रभागांच्या सीमा दर्शवणारी प्रारूप अधिसूचना शासन राजपत्रात प्रसिद्ध करणे. त्यास प्रसिद्धी देणे 1 फेब्रुवारी 2022
प्रारुप अधिसूचनेवर हरकती व सूचना मागण्याचा कालावधी 1 ते 14 फेब्रुवारी 2022 प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांचे विवरणपत्र राज्य निवडणूक आयोगास सादर करणे. 16 फेब्रुवारी रोजी राज्य निवडणूक आयोगाने प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांमार्फत हरकती व सूचना यावर सुनावणी देण्याचा अंतिम दिनांक 26 फेब्रुवारी सुनावणीनंतर प्राधिकृत अधिकाऱ्यांनी केलेल्या शिफारशी विहित नमुन्यात नमूद करून विवरणपत्र राज्य निवडणूक आयोगास सादर करावयाचे आहे.

3 सदस्यांचे 45 तर 4 सदस्यांचा 1 प्रभाग असणार!

शहराची लोकसंख्या 17 लाख 27 हजार 692 आहे. त्यात अनुसूचित जाती (एससी)ची 2 लाख 73 हजार 810 आणि अनुसूचित जमाती (एसटी)ची 36 हजार 535 लोकसंख्या आहे. नगरसेवकांची संख्या 139 आहे. 139 नगरसेवकांपैकी 69 पुरुष तर 70 महिला नगरसेविका अशी वर्गवारी असणार आहे. 114 जागा खुल्या प्रवर्गासाठी असतील. त्यातील 57 जागा महिलांसाठी असतील. अनुसूचित जाती (एससी) साठी 22 जागा राखीव असतील. त्यात 11 महिला आणि 11 पुरुषांसाठी जागा असणार आहेत. 2 महिला आणि 1 पुरुषाकरिता अशा 3 जागा अनुसूचित जमाती (एसटी)साठी राखीव असणार आहेत. निवडणुकीत एकूण 46 प्रभाग असणार आहेत. त्यात 3 सदस्यांचे 45 आणि 4 सदस्यांचा 1 प्रभाग असणार आहे.

हे ही वाचलं का 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news