पिंपरी : प्रभाग रचनेचा आराखडा उद्या निवडणूक आयोगास पाठविणार | पुढारी

पिंपरी : प्रभाग रचनेचा आराखडा उद्या निवडणूक आयोगास पाठविणार

पिंपरी : पुढारी वृत्तसेव

महापालिकेच्या नव्या प्रभागरचनेेबाबत नगरसेवकांसह इच्छुकांना उत्सुकता

पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक 3 सदस्यीय प्रभागरचनेचा प्रारूप आराखडा अंतिम टप्प्यात आहे. त्यावर आयुक्त राजेश पाटील यांनी शिक्कामोर्तब गेल्यानंतर तो आराखडा मंगळवारी (दि.30) राज्य निवडणुक आयोगाकडे पाठविला जाणार आहे. नवी प्रभागरचना कशी असणार याची उत्सुकता नगरसेवकांसह इच्छुकांना लागली आहे.

नंदुरबार : तहसीलदारांनी वीजवितरणच्या कार्यालयाला ठोकले टाळे

एकूण 139 नगरसेवक संख्येनुसार तीन सदस्यीय पद्धतीने एकूण 46 प्रभागरचनेचा कच्चा आराखडा तयार करून तो 30 नोव्हेंबरपर्यंत पाठविण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने महापालिकेस 3 नोव्हेंबरला दिले. पालिकेच्या 25 अधिकार्‍यांच्या पथकामार्फत प्रभागरचनेचे काम केले जात आहे.
एकूण 139 जागांसाठी एकूण 46 प्रभाग होणार आहेत.

पिंपरी : मोरवाडीतील लिंगायत दफनभूमी होणार सुरू

त्यात 1 प्रभाग 4 सदस्यांचा असणार आहे. आराखडा रचनेचे काम अंतिम झाले आहे. आयुक्त पाटील यांच्या स्वाक्षरीनंतर त्यास अंतिम स्वरूप येणार आहे. त्यानंतर तो आराखडा पेनड्राईव्हमध्ये सेव्ह करून तो सील करून मुंबईतील राज्य निवडणूक आयोगाकडे मंगळवारी पाठविला जाणार आहे. दरम्यान, आयोगाने प्रारूप आराखड्यास मंजुरी दिल्यानंतर त्यावर हरकती व सुचना घेऊन सुनावणी होईल.

अभिनेत्री हेमांगी कवीच्या ‘त्‍या’ ऐवजाची चर्चा

त्यानंतर आयोगाने अंतिम आराखड्यास मान्यता दिल्यानंतर जाहीरपणे सवार्ंसमोर आरक्षणाच्या सोडती काढल्या जातील. दरम्यान, नवी प्रभागरचना कशी असणार, त्यात कोणता नवा भाग समाविष्ट केला आहे, वस्ती, झोपडपट्टी, चाळ, हाउसिंग सोसायटी असा कोणता भाग वगळला याची उत्सुकता इच्छुकांना लागली आहे. प्रभारचनेवरून अनेक इच्छुक निवडणुकीच्या मैदानात उतरायचे की नाही यांचा निर्णय घेणार आहेत.

Back to top button