Pillars of Creation : नासाच्या जेम्स वेब दुर्बिणीने टिपली ‘सृष्टीस्तंभ’ची छायाचित्रे

Pillars of Creation
Pillars of Creation
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन: नासाने बुधवारी दिलेल्या माहितीनुसर, जेम्स वेब टेलिस्कोप दुर्बिणीने 'पिलर्स ऑफ क्रिएशन' म्हणजेच सृष्टीस्तंभची (Pillars of Creation) नेत्रदिपक छायाचित्रे टिपली आहेत. या ठिकाणी वायू आणि धूळ यांच्या दाट ढगांत नवीन ताऱ्यांची निर्मिती होताना दिसते. जेम्स वेब टेलिस्कोप टिपलेले हे छायाचित्र संशोधकांच्या अपेक्षेपेक्षा भव्य आहे. या छायाचित्रात सृष्टीनिर्मितीच्या स्तंभासोबत हजारो तारे चमकताना दिसत आहेत. तसेच ब्रह्मांडाच्या मध्यभागी असलेले विशाल सोनेरी, तांबड्या अन् तपकीरी रंगाचे खांब प्रकाशित होताना दिसत आहे.

छायाचित्रात दिसणारे सृष्टीस्तंभ (Pillars of Creation) आपल्या आकाशगंगेच्या गरुड नेब्युलामध्ये पृथ्वीपासून 6,500 प्रकाशवर्षे अंतरावर आहेत. हबल स्पेस टेलिस्कोपने या खांबांचे छायाचित्रण केले आहे. यापूर्वी या दुर्बिणीने 1995 आणि 2014 मध्ये असे चित्र घेतले होते. परंतु एका वर्षापूर्वी अंतराळात प्रक्षेपित केलेल्या नवीन जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपच्या इन्फ्रारेड क्षमतेमुळे, स्तंभांच्या अस्पष्टतेतूनही अनेक नवीन तारे तयार होताना दिसत आहेत.

या छायाचित्रात दिसणारे त्रिमितीय स्तंभ (Pillars of Creation) हे भव्य खडकांच्या स्वरूपासारखे दिसतात, पण ते सतत झिरपत असतात. खडकांचे हे स्तंभ थंड ताऱ्यांमधील वायू आणि धूळ यांचे बनलेले असतात. जे कधीकधी प्रकाशात तर कधी अर्ध-पारदर्शक दिसतात. अनेक खांबांच्या टोकांवर चमकदार लाल, लावासारखे डाग दिसतात. यासंदर्भात नासाने एका निवेदनात म्हटले आहे की, "हे तार्‍यांमधून होणारे उत्सर्जन आहे, जे अजूनही त्यांच्यात वायू आणि धूळ तयार करतात. हे काही लाखोवर्षे जुने असल्याचेही नासाने म्हटले आहे. अमेरिकेच्या स्पेस एजिन्सीने म्हटले आहे की, हे तरूण तारे वेळोवेळी सुपरसॉनिक विमानासारखे बाहेर पडतात आणि या ढगांसारख्या दिसणाऱ्या या मोठ्या स्तंभाना धडकतात. त्यामुळे या स्तंभांना कधी कधी जोराचा धक्का बसतो. तर कधी पाण्यातून जाणाऱ्या बोटींसारख्या लहरी तयार होतात., असे या एजन्सीने म्हटले आहे.

स्पेस टेलिस्कोप सायन्स इन्स्टिट्यूटचे सायन्स प्रोग्राम मॅनेजर क्लॉस पॉन्टॉपिडन यांनी बुधवारी ट्विटरवरून सांगितले की, "सार्वजनिक मागणीमुळे, आम्हाला वेबसह पिलर्स ऑफ क्रिएशनचा फोटो शूट करावा लागला. तसेच येथे येथे बरेच तारे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. नासाचे खगोलभौतिकशास्त्रज्ञ अंबर स्ट्रॉन यांनी याविषयी बोलताना त्यांच्या ट्विटरवर फोटो शेअर करत "विश्व सुंदर आहे!" असे कॅप्शन लिहिले आहे.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news