NASA Discovers New Island : नासाने शोधले अनोखे बेट; फक्त सात दिवसात ६ पटीने वाढला आकार | पुढारी

NASA Discovers New Island : नासाने शोधले अनोखे बेट; फक्त सात दिवसात ६ पटीने वाढला आकार

पुढारी ऑनलाईन डेस्क : ऑस्ट्रेलियाजवळील नैऋत्य पॅसिफिक समुद्रात ज्वालामुखीचा (Volcano) उद्रेक झाल्यानंतर काही तासांनंतर यूएस स्पेस एजन्सी अर्थात नासाने (NASA) एक लहान बेट शोधले (NASA Discovers New Island) आहे. या महिन्याच्या सुरुवातीला, टोंगा मध्य बेटावरील होम रीफ ज्वालामुखीने (Home Reef volcano) लावा, राख आणि धूर सोडण्यास सुरुवात केली. त्यामुळे आजूबाजूच्या पाण्याचा रंग बदलला होता. पण, या ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर केवळ 11 तासांनंतर पाण्याच्या पृष्ठभागावर एक नवीन बेट दिसू लागल्याची माहिती नासाच्या पृथ्वी मॉनिटरिंग वर्कशॉपने दिली. या निरीक्षण कार्यशाळेत उपग्रहाद्वारे या बेटाची छायाचित्रेही घेण्यात आली आहेत.

नासाने प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून दिलेल्या माहितीनुसार, नव्याने तयार झालेल्या बेटाचा आकार पटकण वाढला. 13 सप्टेंबर रोजी, टोंगाच्या भूगर्भीय संशोधकांनी बेटाचे क्षेत्रफळ 4000 चौरस मीटर जवळपास सुमारे 1 एकर पर्यंत असल्याचे सांगितले आणि त्याची उंची समुद्रसपाटीपासून 10 मीटर (सुमारे 33 फूट) असल्याचे सांगितले. मात्र, यानंतर 20 सप्टेंबर रोजी संशोधकांनी या बेटाचा आकार 24000 चौरस मीटर म्हणजे जवळपास 6 एकर इतका वाढला असल्याची माहिती दिली. (NASA Discovers New Island)

नासाने म्हटले आहे की हे नवीन बेट सेंट्रल टोंगा बेटांमधील होम रीफ सीमाउंटवर तयार झाले आहे. पण त्याचवेळी हे छोटेसे बेट इथे कायमचे राहणार नाही असेही सांगण्यात आले. नासाने पुढे म्हटले आहे की, “हे बेट समुद्रात बुडलेल्या ज्वालामुखीमुळे तयार झाले आहे आणि अशी बेटे थोड्या काळासाठीच अस्तित्वात येतात. काहीवेळा ती अनेक वर्षे राहतात.” (NASA Discovers New Island)

NASA कडून अधिक माहिती देण्यात आली आहे की जवळच्या लाटेइकी ज्वालामुखीच्या (nearby Late’iki Volcano) 12 दिवसांच्या उद्रेकामुळे 2020 मध्ये एक बेट तयार झाले होते. परंतु, नंतर ते दोन महिन्यांत वाहून गेले. तर 1995 मध्ये या ज्वालामुखीमुळे तयार झालेले बेट 25 वर्षे राहिले.


अधिक वाचा :

Back to top button