

पुढारी ऑनलाईन डेस्क: 'बेबी डॉल' गाण्याने घरोघरी प्रसिद्ध झालेली गायिका कनिका कपूरने ( Kanika Kapoor ) नुकतेच काही दिवसांपूर्वी लग्नगाठ बांधली. कनिका आणि गौतम यांच्या लग्न सभारंभ लंडनमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला. दोघांच्या लग्नातील काही खास विधीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. तर सध्या कनिका आणि गौतम यांचा लिपलॉक करतानाचा एक फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
कनिका ( Kanika Kapoor ) आणि गौतम दोघांनी २० मे रोजी लंडनमध्ये सात फेरे घेतले.या लग्नात तिने पिंक कलरचा सुंदर लेहेंगा परिधान केला होता. ज्यामध्ये ती अप्रतिम सुंदर आणि ग्लॅमरस दिसत होती. तर फिकट गुलाबी रंगाच्या शेरवानीमध्ये गौतम खूपच सुंदर दिसत होता. कनिकाच्या लेहेंग्यावर व्हाईट एम्ब्रॉयडरी वर्क केले आहे. भारी दागिने आणि मेकअपने तिने तिचा लूक पूर्ण केला होता. याच दरम्यान कनिका आणि गौतम यांचा आणखी एक लिप लॉक करतानाचा फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. दोघांची जोडी चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे.
दोघांच्या लग्नातील फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी भरभरून कौतुक करत शुभेच्छा दिल्या आहेत. आधीही कनिका आणि गौतम याच्या मेंहदीचे आणि हळदीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
हेही वाचलंत का?