

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन डेस्क : Paytm Shares Buyback पेटीएमच्या (Paytm) संचालक मंडळाने शेअर्सची पुनर्खरेदी (buyback) करण्याचा निर्णय घेतला आहे. पेटीएमची पालक कंपनी वन97कम्युनिकेशन्सने मंगळवारी हा निर्णय घेतला आहे. एका शेअरसाठी ८१० रुपये इतकी रक्कम देऊन हे शेअर्स खरेदी केले जाणार आहेत.
स्टॉक एक्सचेंजला मंगळवारी ही माहिती देण्यात आली. पुनर्खरेदीची प्रक्रिया सहा महिन्यात पूर्ण होणार आहे. मंगळवारी कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक झाली, यामध्ये हा निर्णय घेण्यात आला.
८१०रुपये प्रतिशेअर दराने खरेदी केल्या जाणाऱ्या शेअर्सचे मूल्य ८५० कोटी रुपये इतके होते. शेअर्स खरेदीची रक्कम आणि त्यावरील कर यांचा विचार केला तर कंपनीला १,०४८ कोटी रुपये इतका खर्च कंपनीला येणार आहे. (Paytm Shares Buyback)
मंगळवारी पेटीएमचा शेअर ५३९.५ रुपयेला बंद झाला होता. त्यामुळे पुनर्खरेदीची रक्कम सध्याच्या दरापेक्षा ५० टक्केहून जास्त आहे. त्यामुळे शेअर्सधारकांना प्रतिशेअर जवळपास २७० रुपयांचा फायदा होणार आहे. पण ज्या गुंतवणुकदारांनी आयपीओमधून शेअर खरेदी केली होती, त्यांचे मात्र मोठे नुकसान होणार आहे.
पेटीएमने गेल्या नोव्हेंबरमध्ये आयपीओ बाजारात आणला होता. नोव्हेंबर २०२१ला शेअर बाजारात दाखल झाला होता. कंपनीने शेअर्स बाजारातून १८३०० कोटींचे भांडवल जमवले होते. पेटीएमची इश्य प्राईस एका शेअरसाठी २१५० रुपये इतकी होती. पण त्यानंतर आजपर्यंत पेटीएमचा शेअर या दराला कधीच पोहोचलेला नाही. याचाच अर्थ असा की ज्यांनी आयपीओतून पेटीएमचे शेअर्स घेतले ते नुकसानीत आहेत.
हेही वाचा