

यावेळचा 'चकाकता हिरा' म्हणून 'टाटा कम्युनिकेशन्स' (TCOM) ची निवड केली आहे. या कंपनीच्या शेअरचा सध्याचा भाव १२८० रुपये आहे, तो वर्षभरात १५३० रुपये व्हावा. टाटा कम्युनिकेशन्स लिमिटेड या कंपनीचे पहिले नाव "विदेश संचार निमा लिमिटेड' (VSNL) असे होते. टाटा समूहात ती आल्यानंतर तिचे सध्याचे नामकरण केले आहे.
पूर्वी ही सरकारी क्षेत्रातील कंपनी होती. टाटा समूहाकडे ती आल्यानंतर ती खासगी क्षेत्रातील कंपनी झाली आहे. पुढील २, अडीच वर्षात म्हणजेच २०२४ अखेर ती ५० लाख स्त्रियांना कार्यरत करू शकेल. या कंपनीचे मध्यवर्ती कार्यालय मुंबईत आहे.
मार्च २०२२ च्या ४ थ्या तिमाहीत तिचा महसूल ४२११ कोटी रुपये आहे. मार्च २०२३ च्या शेवटच्या तिमाहीत (मार्च अखेर ) तिचा महसूल ४२६० कोटी रुपये असेल. व्याज, घसारा, कर, मुदती कर्जाचे हप्ते देण्यापूर्वीचा तिचा महसूल (EBITDA) आर्थिक वर्ष २०२२ च्या शेवटच्या तिमाहीत ९९४ कोटी रुपये होता. आर्थिक वर्ष मार्च २०२३ साठी तो १०३० कोटी रुपये व्हावा. शेअरगणिक उपार्जन आर्थिक वर्ष मार्च २०२२ व मार्च २०२३ साठी अनुक्रमे १२ व रुपये व १९ रुपये आहे/असेल.