

इस्लामाबाद; पुढारी ऑनलाईन : पाकिस्तानमधील पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांचे सरकार पायउतार होणार हे जवळपास निश्चित आहे. तरीही आमच्या सरकारला कोणताही धोका नसल्याचा दावा इम्रान खान यांच्या मंत्र्यांकडून केला जात आहे. रविवारी मोठा गौप्यस्फोट करणार असल्याचा इशारा इम्रान खान यांनी दिला आहे. इम्रान खान रविवारी इस्लामाबादमध्ये रॅली काढणार आहेत.
एकीकडे राजधानी इस्लामाबाद सुरक्षा व्यवस्थेसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. दुसरीकडे इम्रान खान सरकारविरोधात अविश्वास ठराव दाखल होण्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान संसदेच्या सुरक्षा व्यवस्थेत मोठी वाढ करण्यात आली आहे. विरोधी पक्षनेते शहबाज शरीफ यांनी राजधानी इस्लामाबाद ते देशातील खासदारांच्या सुरक्षेची खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. शाहबाज शरीफ यांचीही सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. (Imran Khan)
दरम्यान अविश्वास ठरावावेळी नाराज पाकिस्तान-तहरिक- ए-इंसाफ या पक्षाच्या खासदारांनी मतदान प्रक्रियेत सहभागी होणार नसल्याचे सांगितले आहे. अविश्वास ठराव मंजूर करण्यासाठी आवश्यक ते संख्याबळ असल्याचा दावा विरोधकांनी केली. रविवारी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधात अविश्वास ठरावापूर्वी मोठ्या व खळबळजनक राजकीय हालचाली होणार आहेत. इम्रान खान यांनी शुक्रवारीच ते 'संडे सरप्राईज' (रविवारचा धक्का) देणार असल्याचे धमकावून ठेवलेले आहे.
अमेरिका आणि विरोधी पक्षांनी मिळून माझे सरकार पाडण्याचा रचलेला आहे. आता पाकिस्तानी जनतेने तो हाणून पाडण्यासाठी रस्त्यावर येण्याची वेळ येऊन ठेपलेली आहे.
– इम्रान खान, पंतप्रधान, पाकिस्तान
शनिवारी रात्री विरोधी पक्षांतील सर्व नेत्यांना अटक होईल, अशी शक्यता यातून वर्तविली जात आहे. तत्पूर्वी या सर्व नेत्यांविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची पूर्वतयारी आटोपलेली आहे.
इम्रान खान (Imran Khan) रविवारी इस्लामाबादेत मोर्चा काढणार आहेत. लष्कर त्याविरोधात आहे. अविश्वास ठरावानंतर मोर्चा निघेल की आधी, तेही अद्याप स्पष्ट झालेले नाही. इम्रान या प्रस्तावात पराभूत झाले तर इस्लामाबादेतील त्यांचे समर्थक हिंसाचार करू शकतील, असा धोका वर्तविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर अविश्वास प्रस्तावावरील मतदानापूर्वी राष्ट्रीय संसदेच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली असून इस्लामाबादेत रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.
हे ही वाचलं का ?