‘गुप्‍त चिठ्ठी’मुळे इम्रान खान गोत्‍यात, आजीवन ‘अयोग्‍य’ ठरण्‍याची शक्‍यता

‘गुप्‍त चिठ्ठी’मुळे इम्रान खान गोत्‍यात, आजीवन ‘अयोग्‍य’ ठरण्‍याची शक्‍यता
Published on
Updated on

इस्‍लामाबाद : पुढारी ऑनलाईन : पाकिस्‍तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे सरकार अखेरच्‍या घटका मोजत आहे. त्‍यांच्‍याविरोधात दाखल अविश्‍वास प्रस्‍तावावर उद्‍या ( दि. ३) मतदान होणार आहे. दरम्‍यान, पाकिस्‍तानच्‍या राजकारणात खळबळ उडवून देणार्‍या गुप्‍त चिठ्ठीची चर्चा सुरुच आहे. परराष्‍ट्र मंत्रालयाची गोपनीय कागदपत्रे पत्रकार परिषदेत दाखविल्‍याचा ठपका पंतप्रधान इम्रान खान यांच्‍यावर ठेवण्‍यात आला आहे. इम्रान खान यांनी परराष्‍ट्र मंत्रालयाला प्राप्‍त झालेली'गुप्‍तचिठ्ठी' पत्रकारांना काही अंतरावरुन दाखवली होती. मात्र गोपनीय कागदपत्रे सार्वजनिक करण्‍याचे गंभीर परिमाण होवू शकतात. पाकिस्‍तान घटनेनुसार त्‍यांना राजकारणातून आजीवन अयोग्‍य म्‍हणून घोषित केले जावू शकते,असे मत देशातील कायदे तज्‍ज्ञ व्‍यक्‍त करीत आहेत.

पाकिस्‍तान घटनेतील कलम ६२ काय सांगते?

पाकिस्‍तानमधील मीडिया रिपोर्टनुसार, परराष्‍ट्र मंत्रालयाकडून मिळालेली "गुप्‍त 'वर इम्रान खान यांनी कायदेशीर
सल्‍ला मागितला आहे. एका देशाने पाकिस्‍तानमधील राजदूताच्‍या माध्‍यमातून धमकीचा संदेश असणारी 'गुप्‍त चिठ्ठी' पाठवली होती. कायदानुसार परराष्‍ट्र मंत्रालयाकडून प्राप्‍त कागदपत्रे ही गोपनीयता अधिनियम १९२३च्‍या कायदाखाली येतात. या नियमानुसार, परराष्‍ट्र मंत्रालयास प्राप्‍त झालेले कागदपत्रे सार्वजनिक करु नयते. पत्र पाठवणारा आणि घेणारा या दोघांचेही नाव गोपनीयच ठेवण्‍यात यावे, या नियमाचा भंग केल्‍यास शपथविधीचे उल्‍लंघन मानले जाईल. पाकिस्‍तान घटनेतील कलम ६२ नुसार पराराष्‍ट्र मंत्रालयातील गोपनीय कागदपत्र सार्वजनिक केल्‍यास संबंधिताला राजकारणातून आजीवन अयोग्‍य म्‍हणून घोषित करण्‍याची तरतूद आहे.

'त्‍या' गुप्‍त चिठ्ठीत नेमंक काय?

इम्रान खान यांच्‍या ७ मार्च रोजी झालेल्‍या पत्रकार परिषदेला उपस्‍थित असणार्‍या एका पत्रकाराने 'एवायआर' वृत्तसंस्‍थेला याबाबत सांगितले की, पंतप्रधान इम्रान खान यांनी एक  चिठ्ठीपत्रकार परिषदेत दाखवली. यातील काही बाबींचा उल्‍लेख त्‍यांनी केला होता. या गुप्‍त चिठ्ठीत म्‍हटलं होतं की, इम्रान खान यांच्‍या सरकारविरोधातील अविश्‍वास प्रस्‍ताव यशस्‍वी झाला तर आंतरराष्‍ट्रीय पातळीवरील पाकिस्‍तानच्‍या अनेक समस्‍या कमी होतील. इम्रान खान यांचे सरकार जिंकले तर पाकिस्‍तावरील काही बाबींबाबत दबाव वाढवावा लागेल.

पाकिस्‍तान लष्‍कर, आयएसआय प्रमुखांना होती माहिती

इम्रान खान यांनी दाखवलेल्‍या चिठ्ठीतील भाषा ही धमकीची होती. यासंदर्भात पत्रकार अरशद शरीफ यांनी सूत्रांनी दिलेल्‍या माहितीच्‍या आधारे दावा केला आहे की, ही चिट्ठी इम्रान खान यांनी मंत्रीमंडळासमोर सादर केली. यावेळी पाच ते सहा मंत्र्यांना रडू कोसळले. यावेळी पंतप्रधान इम्रान खान यांनी कोणत्‍याही देशाचे नाव घेतले नाही. मात्र या चिट्ठीबाबत पाकिस्‍तान लष्‍कर प्रमुख कमर जावेद बाजवा आणि आयएसआय प्रमुख फैज हमीद यांना माहिती होती, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले. तसेच याबाबत परराष्‍ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी संसदेत निवदेन सादर करतील, असेही ते म्‍हणाले होते.

रशिया-युक्रेन युद्ध आणि पाकिस्‍तानची भूमिका

यासंदर्भात माहिती देताना समा न्‍यूजचे पत्रकार इमरान रियाज खान यांनी सांगितले की, 'गुप्‍त चिठ्ठी'बाबत पंतप्रधान इम्रान खान यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. मात्र याची प्रत कोणालाही दिली नाही. यामध्‍ये पाकिस्‍तानमधील अधिकारी आणि अन्‍य देशातील अधिकार्‍यांच्‍या चर्चेचा तपशील आहे. इम्रान खान यांनी कोणत्‍याही अधिकार्‍यांची नाव घेतलेले नाही. सरकारने जाहीर केलेल्‍या निवेदनात म्‍हटले होते की, रशिया-युक्रेन युद्धाबाबत पाकिस्‍तानने घेतलेल्‍या भूमिकेवर अमेरिका आणि युरोपने तीव्र नाराजी व्‍यक्‍त केली आहे.

पाकिस्‍तानला थेट धमकीच..

पत्रकार काशिफ अब्‍बासी यांनी दिलेल्‍या माहितीनुसार, पाकिस्‍तान सरकाराच्‍या परराष्‍ट्र धोरणावर नाराज असणार्‍या देशानेच आपली नाराजी व्‍यक्‍त केली. इम्रान खान यांनी केलेल्‍या रशिया दौर्‍यावरही या देशाने तीव्र नापसंती व्‍यक्‍त केली होती. पाकिस्‍तान सरकारविरोधातील अविश्‍वास प्रस्‍ताव मंजूर झाल्‍यास आम्‍ही सर्व काही विसरुन जावू. जर पाकिस्‍तानमधील इम्रान खान यांचे सरकार तरले तर या देशाला मोठ्या समस्‍यांचा सामना करावा लागेल, अशी धमकीही देण्‍यात आली आहे. ही चिठ्ठी सरकारने केवळ लांबूनच दाखवली. गोपनीयता कायदाचा हवाला देत यासंदर्भात अधिक माहिती देण्‍यास इम्रान खान यांनी नकार दिला होता, असा दावाही अब्‍बासी यांनी केला आहे.

हेही वाचलं का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news