Latest
India-Pakistan Trade : भारतासोबत पुन्हा व्यापार सुरू करण्याची पाकची इच्छा
लंडन : पाकिस्तानातील व्यापारी वर्गाला भारतासोबत व्यापार पूर्ववत करायचा आहे. यासंदर्भात पाकिस्तान सरकार सर्व संबंधितांशी सल्लामसलत करून निर्णय घेईल, असे पाक परराष्ट्रमंत्री इसहाक दार यांनी लंडनमधील पाकिस्तानी उच्चायुक्तालयात झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
काश्मीरबाबतचे कलम ३७० भारत सरकारने रद्द केल्यानंतर पाकिस्तानने जमिनीवरून होणारी आयात-निर्यात एकतर्फी बंद केली होती. तथापि, फेब्रुवारी २०२४ मध्ये भारत सरकारने पाकिस्तानसोबत सागरी मार्गाने काही व्यापार सुरू असल्याचे स्पष्ट केले होते. पूर्वी अटारी-वाघा सीमेवरून तसेच कराची बंदरातून व्यापार होत असे. सध्या काही व्यापार समुद्र आणि हवाई मागनि होतो, असेही सांगण्यात आले होते.
हेही वाचा :

