धक्‍कादायक...'आयएस' संबंध प्रकरणी IIT गुवाहाटीच्या विद्यार्थ्याला अटक | पुढारी

धक्‍कादायक...'आयएस' संबंध प्रकरणी IIT गुवाहाटीच्या विद्यार्थ्याला अटक

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : इस्‍लामिक स्‍टेट (आयएस) या दहशतवादी संघटनेची संबंध असल्‍याच्‍या आरोपाखाली IIT गुवाहाटीचा विद्यार्थी तौसिफ अली फारुकी याला अटक करण्‍यात आली आहे. बेकायदेशीर कारवाया (प्रतिबंधक) कायदा (UAPA) अंतर्गत अटक करण्यात आली आहे. तीन दिवसांपूर्वी आयएसआयएसचा दहशतवादी हरिस फारुकी उर्फ ​​हरीश अजमल फारुकी याला अटक करण्यात आली होती. यानंतर ISIS मध्ये सामील होण्याच्या मार्गावर असलेला IIT विद्यार्थी तौसिफ अली फारुकी याला पोलिसांनी ताब्‍यात घेतल्‍याचे वृत्त ‘पीटीआय’ने दिले आहे. ( IIT student on way to join ISIS detained in Assam: Police )

चौकशीत सापडलेले अनेक वस्‍तुनिष्‍ठ पुरावे

संशयित आरोपी तौसिफ अली फारुकी हा आयआयटी गुवाहाटीमध्ये बायोसायन्सचा चौथ्या वर्षाचा विद्यार्थी आहे. त्‍याला (UAPA) अंतर्गत शनिवारी अटक करण्यात आली होती. या प्रकरणी आसाम पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सचे (एसटीएफ) महानिरीक्षक पार्थसारथी महंत यांनी माहिती दिली की, तौसिफ अली फारुकी त्याची चौकशी करण्‍यात आली. त्याचे ISIS शी संबंध असल्याचे विश्वसनीय पुरावे मिळाले आहेत. त्याआधारे त्याला अटक करण्यात आली. ( IIT student on way to join ISIS detained in Assam: Police )

10 दिवसांची पोलीस कोठडी

या प्रकरणाची माहिती देताना पोलीस अधिकारी पार्थसारथी महंत यांनी सांगितले की, आम्ही तौसिफ अली फारुकी याला न्यायालयात हजर केले, न्यायालयाने त्याला 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आम्ही आयआयटी-गुवाहाटी कॅम्पसमध्ये त्याच्या वसतिगृहाची खोलीची झडती घेतली आहे. ISIS इंडियाचा म्‍होरक्‍या हरीश फारुकी उर्फ ​​हरीश अजमल फारुकी आणि त्याचा साथीदार अनुराग सिंग उर्फ ​​रेहान यांना बांगलादेशातून ओलांडल्यानंतर धुबरी जिल्ह्यात अटक केल्यानंतर तीन दिवसांनी आरोपी तौसिफ याला अटक करण्यात आली आहे. ( IIT student on way to join ISIS detained in Assam: Police )

हेही वाचा : 

 

Back to top button