

पुढारी ऑनलाईन डेस्क – हॉलीवूड अभिनेते एलन आर्किन यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले. (Alan Arkin) त्यांच्या तीन मुलांनी एक स्टेटमेंट जारी करून वडिलांच्या निधनाची माहिती दिलीय. एलनच्या निधनाच्या वृत्ताने चाहत्यांमध्ये शोककळा पसरलीय. अनेक लोकांनी एलन यांना श्रद्धांजली वाहिलीय. (Alan Arkin)
लिटिल मिस सनशाइन, द कमिंस्की मेथड यासारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी मुख्य भूमिका साकारली होती. त्यांनी नेटफ्लिक्सच्या वेबसीरीजमध्येही काम केले होते. त्यांनी अनेक कलाकारांसोबत काम केलं होतं. ते मायकल डग्लससोबत वेब सीरीजमध्येही दिसले होते.
त्यांना ॲकेडमी ॲवॉर्ड, बाफ्टा ॲवॉर्ड, गोल्डन ग्लोब ॲवार्ड आणि टोनी ॲवार्डने सन्मानित करण्यात आलं होतं. सदाबहार चित्रपटात काम करणारे एलन यांची मुले म्हणाली "आमचे वडील खूप प्रतिभाशाली होते. ते एक चांगले व्यक्ती आणि कलाकार होते. ते खूप चांगले वडील आणि पती होते. याशिवाय ते खूप चांगले आजोबादेखील होते. आम्ही त्यांची खूप आठवण करू."
एलन आर्किनने आपला हॉलीवूड डेब्यू १९५७ मध्ये कॉल्पो हीट वेवमधून केले होते. याशिवाय त्यांना लिटिल मिस सनशाइन साठी ऑस्कर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.