Marathwada Water Crisis :उन्हाच्या तीव्र झळा…मराठवाडा विभागातील केवळ ७ शहरांनाच नियमित पाणी पुरवठा !

Marathwada Water Crisis :उन्हाच्या तीव्र झळा…मराठवाडा विभागातील केवळ ७ शहरांनाच नियमित पाणी पुरवठा !
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : उन्‍हाळ्याच्‍या तीव्र झळा राज्‍यातील मराठवाडा विभागाला बसू लागल्‍या आहेत. (  Marathwada Water Crisis ) येथील नागरिकांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. या विभागातील ७६ शहरांपैकी केवळ ७ शहरांनाच नियमित पाणी पुरवठा होत आहे, अशी माहिती औरंगाबाद विभागीय आयुक्‍त कार्यालयाच्‍या अहवालात नमूद केली आहे, असे वृत्त 'पीटीआय'ने दिले आहे. जालना जिल्‍हातील बदनापूर शहरात भीषण पाणी टंचाई असून येथे तब्‍बल १५ दिवसांच्‍या अंतराने पाणी पुरवठा होत आहे.

मराठवाड्यातील ७६ नगरपालिका व नगर पंचायत असणार्‍या शहरांमधील पाणी पुरवठ्या संदर्भात सर्वेक्षण करण्‍यात आले. या अहवालनुसार, सध्‍या मराठवाडा विभागातील केवळ ७ शहरांमध्‍ये नियमित पाणी पुरवठा होत आह. यामध्‍ये नांदेड
जिल्‍ह्यातील कुंडलवाडी, किनवट, धर्माबाद, बिलोली, अर्धापूर आणि हिमायतनगर या शहरांचा समावेश आहे. तर औरंगाबद जिल्‍ह्यातील एकमेव पैठण शहराला नियमित पाणी पुरवठा होत आहे.

Marathwada Water Crisis : लातूरमधील ८ शहरांत ३ ते १० दिवसांच्‍या अंतराने पाणी पुरवठा

२०१६ मध्‍ये मराठवाड्याने भीषण पाणीटंचाई अनुभवली. यावर्षी रेल्‍वे वॅगनव्‍दारे लातूर जिल्‍ह्याला पाणी पुरवठा करण्‍यात आला होता. या वर्षीही जिल्‍ह्यातील एकाही शहरात नियमित पाणीपुरवठा होत नाही. केवळ निलंगा शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. जिल्‍ह्यातील अन्‍य

आठ शहरांमध्‍ये तीन ते १० दिवसांच्‍या अंतराने पाणी पुरवठा होत असल्‍याचेही या अहवालात नमूद केले आहे.

पाणी पुरवठ्याची सर्वात भीषण परिस्‍थिती ही जालना जिल्‍ह्यातील बदनापूर शहराची आहे. येथे तब्‍बल १५ दिवसांतून एकदाच पाणी पुरवठा होतो. लातूर जिल्‍ह्यातील  औसा येथे ११ दिवसांनी तर देवणी शहरात १० दिवसांतून एकदाच पाणी पुरवठा होत असल्‍याचे या अहवाल म्‍हटलं आहे.

औरंगाबाद शहरातील नागरिकांना आठ दिवसांतून एकदा पाणीपुरवठा होत आहे. पाणी टंचाईच्‍या निषेधार्थ नुकताच भाजपने औरंगाबादमध्‍ये विरोधी पक्ष देवेंद्र फडणवीस यांच्‍या नेतृत्‍वाखाली जलआक्रोश मोर्चा काढला होता.राजकीय नेते आणि मोठ्या प्रमाणावर झालेले शहरीकरणामुळे मराठवाडा विभागास भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे, असे मत जल अभ्‍यासक प्रदीप पुरंदरे यांनी व्‍यक्‍त केले आहे.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news